Sakal Swasthaym 5

Patanjali Yog Sutras & psychological wellbeing

मानसिक स्वास्थ्य व पातंजल योगसूत्रे

कालातीत अशा प्राचीन भारतीय ज्ञानाचे आरोग्यरक्षण व सर्वांगीण प्रगतीतील महत्त्व अलीकडच्या काळात पुन्हा एकदा लोकांच्या लक्षात यायला लागले आहे. सकाळ वृत्त समूहाच्या स्वास्थ्यम् उपक्रमांतर्गत दीर्घकालीन आरोग्यरक्षणासाठी व्याख्यानांची एक मालिका जून २०२३ पासून पुण्यात सुरू करण्यात आली आहे. निरामय वेलनेस सेंटरची यामध्ये ‘ऊर्जा पार्टनर’ म्हणून महत्त्वाची भूमिका आहे. या मालिकेतील दुसरे व्याख्यान २८ जुलै रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे झाले. या वेळी डॉ. मन्मथ घरोटे, अध्यक्ष, दि लोणावळा योग इन्स्टिटयूट (इंडिया), यांनी ‘मानसिक स्वास्थ्यासाठी पातंजल योगसूत्राचे योगदान’ या विषयावर मार्गदर्शन केले. डिसेंबर २०२३ पर्यंत अशी एकूण १४ व्याख्याने अपेक्षित आहेत.

या प्रसंगी श्री. योगेश व सौ. अमृता चांदोरकर, संचालक, निरामय वेलनेस सेंटर यांचा सत्कार करण्यात आला. सौ. चांदोरकर यांनी उपस्थितांना धारणा व ध्यान करण्यासाठी प्रत्यक्ष मार्गदर्शन केले आणि आपले अनुभव नोंदवून पुढील भेटीत कथन करण्यासाठी उद्युक्त केले. संपूर्ण स्वास्थ्य खऱ्या अर्थाने कसे मिळविता येईल, या विषयावर त्यांनी संवाद साधला. स्थूल शरीरावर उपचार करण्यासोबत जर प्राणमय व मनोमय कोशांवर काम केले, तर अंतर्बाह्य स्वास्थ्याची अनुभूती होऊ शकते हे त्यांनी रोजच्या उदाहरणांतून स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या वेळी निरामयची भारतीय पंचांगावर आधारित ‘समय निरामय’ ही वैशिष्ट्यपूर्ण दिनदर्शिका वितरित करण्यात आली.

Gallery

Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!