पुरस्कार

निरामय वेलनेस सेंटर लोकमत 'धन्वंतरी २०२३' पुरस्काराने दुसऱ्यांदा सन्मानित

मागील एक तपाहून जास्त काळ समग्र आरोग्यसेवेच्या मार्गावर निरामय वेलनेस सेंटर अखंडपणे कार्यरत आहे. आत्तापर्यंत एक लाखाहून अधिक रुग्णांना सूक्ष्म देहातील वैश्विक ऊर्जेवर काम करणाऱ्या स्वयंपूर्ण उपचारांच्या माध्यमातून रोगमुक्त करण्यात आले आहे. सशक्त समाजाच्या दिशेने केलेल्या या महत्त्वपूर्ण कार्याची दाखल घेऊन श्रीमती अमृता चांदोरकर, संचालक, निरामय वेलनेस सेंटर, यांना आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘लोकमत धन्वंतरी’ पुरस्कार २०२३ प्रदान करण्यात आला. त्या ह्या प्रतिष्ठित पुरस्काराच्या दुसऱ्यांदा मानकरी ठरल्या आहेत.

दिनांक १ फेब्रुवारी २०२३ रोजी पुण्यातील जे डब्ल्यु मॅरीयट हॉटेलमध्ये झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात श्रीमती चांदोरकर यांना हा पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

IMG 20230128 190549

कर्म व मृत्यू यांचे रहस्य

कर्म हा आशयघन असा संस्कृत शब्द अलीकडच्या काळात पुन्हा एकदा सर्वपरिचित झालाय. तसेच मृत्यू हा शब्द सोबत भीती व गुढता घेऊन येतो. या दोन्हीही संज्ञा तसे पाहिले तर सामान्य लोकांना रहस्यमय भासतात. अलीकडेच दिनांक २८ जानेवारी २०२३ रोजी पुण्यातील बाणेर येथील परांजपे स्किम्स यांच्या अथश्री या ज्येष्ठ नागरिक वसाहतीमध्ये श्रीमती अमृता चांदोरकर यांचे याच विषयांवर व्याख्यान झाले.

व्याख्यानाचा केंद्रबिंदू होता मृत्यू व कर्म. साधारण १३० ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या व्याख्यानात श्रीमती चांदोरकर म्हणाल्या, “भारतीय परंपरेत मानवी जीवनाचे सार म्हणजे कर्म असे म्हणता येईल. आपले विचार, भावना व कृती आणि पुढे जाऊन त्यांचे होणारे चांगले-वाईट परिणाम म्हणजेच आपले कर्म. सूक्ष्म असलेला आत्मा हा अमर असून तो प्रत्येक जन्मात नवे शरीररूपी वस्त्र परिधान करतो हे वैश्विक सत्य किंवा रुत भारतीय परंपरेत प्रतिपादित केलेले आहे. आपल्या आत्ताच्या जन्मातील कर्मावरून ठरते की आपला पुढील जन्म व त्यातील अनुभव कसे असतील. म्हणजेच आपले आजचे कर्म हे खरेतर पुढील वाटचालीची गुंतवणूक असते. म्हणूनच संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित केल्यास तात्कालिक आनंद व समाधान तर मिळेलच, पण पुढच्या अनंत प्रवासाची पायाभरणी सुद्धा होईल.”

उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना सदर व्याख्यान अतिशय भावले. अथश्री वसाहतीतर्फे श्रीमती चांदोरकर यांचा सत्कार करून त्यांना गौरविण्यात आले. व्याख्यानासोबतच सर्वांनी श्रीमती चांदोरकर यांच्याबरोबर केलेले ध्यान अतिशय उपयुक्त ठरले. सत्राच्या शेवटी झालेली प्रश्नोत्तरे सर्वांसाठी उद्बोधक होती. एकंदरीतच भारतीय तत्वज्ञानातील लाखमोलाचे विचार हे ज्येष्ठ नागरिकांना अंतर्मुख करीत स्फूर्तीदायी आणि मानवी जीवनाचे व्यापक ध्येय व स्वरूप उलगडवून दाखविणारे ठरले!

आफळे स्मृती महोत्सवात

ऐहिक व आध्यात्मिक ध्येयांचा सुंदर संगम भारतीय संस्कृतीत दिसून येतो आणि या काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेल्या तत्त्वांचा अंगीकार करणाऱ्या संस्था व लोकांच्या कामात ते प्रतिबिंबित होते. सर्वांच्या कल्याणासाठी शाश्वत भारतीय परंपरांचा पुरस्कार निरामय वेलनेस करत असते आणि रंजक व प्रेरणादायी पद्धतीने जनजागृती करण्यासाठी कीर्तन हा उत्तम पर्याय आहे. या कामी अनेक स्वयंसेवी संस्था उत्तम कार्य करीत आहेत. पुण्यातील आफळे अकॅडमीतर्फे दर वर्षी राष्ट्रीय कीर्तनसम्राट कै. गोविंदस्वामी आफळे स्मृती महोत्सव आयोजित केला जातो.

या वर्षी पुण्यातील श्री. नारद – व्यास मंदिर, सदाशिव पेठ येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला. निरामयच्या श्रीमती अमृता चांदोरकर यांचे ‘निरामय जीवन’ या विषयावर व्याख्यान २९ ऑक्टोबर रोजी, तर नागपूरचे कीर्तन चुडामणी श्री. मुकुंदबुवा देवरस यांचे कीर्तन ३० ऑक्टोबर रोजी झाले. कीर्तनसम्राट श्री. चारुदत्त आफळे यांचे कीर्तन ३१ ऑक्टोबर रोजी झाले.

दर वर्षी महोत्सवात विविध क्षेत्रात कार्यरत अशा दिग्गज लोकांचे सत्कार करण्यात येतात. या वर्षी श्री. देवरस यांचा कीर्तन क्षेत्रातील कामासाठी, तर पुण्याचे श्री. पीयूष शाह व मुंबईतील निवृत्त पोलीस अधिकारी श्री. राजेंद्र भोसले यांचा सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी सत्कार करण्यात आला.

Aphale smurti 02
Excellence in Naturopathy Winner of the Award for 2022 02

झी २४तास - एक्सेलेन्स इन नेचरोपथी पुरस्कार २०२२

निरामय ने आज आरोग्य क्षेत्रामध्ये अजून एक पायरी सर केली आहे. २६ जून, रोजी ताज प्रेसिडेंट हॉटेल, मुंबई येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यामध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री सौ. भारती पवार , अभिनेत्री उषा नाडकर्णी, अभिनेते भारत गणेशपुरे यांचे हस्ते डॉ. योगेश आणि डॉ. अमृता चांदोरकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. निरामयचे यश हे नक्कीच सर्व हितचिंतकांचे आहे.

Global Achievers Award

ग्लोबल अचीव्हर्स अवॉर्ड २०२२

आज आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने निरामयची जगभर ओळख निर्माण झालेली आहे. निरामय वेलनेस सेंटरच्या वैश्विक भावनेने केलेल्या या कामाची दखल, आज विश्व स्तरावर घेण्यात आलेली आहे.

बुधवार, दिनांक ८ जून रोजी दुबई येथे साम पुरस्कृत ग्लोबल अचिव्हर्स अवॉर्ड 2022 या पुरस्काराने डॉ. योगेश सर व डॉ. अमृता मॅम यांना सन्मानित करण्यात आले. या दिमाखदार सोहळ्यात सोनाली कुलकर्णी व श्रेयस तळपदे यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संपूर्ण निरामय परिवार, सर्व पेशंट, उपचारक, हितचिंतक यांचे हे यश आहे.

award pic 2

निरामय वेलनेस सेंटरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

‘निरामय वेलनेस सेंटर’ला आज सकाळ समूहातर्फे “ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र” हा किताब देऊन गौरवण्यात आले. निरामयचे संचालक डॉ. योगेश व डॉ. अमृता चांदोरकर यांना हा पुरस्कार महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात सकाळ समुहाचे अध्यक्ष मा. श्री. प्रतापराव पवार तसेच देशाचे माजी कृषीमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. श्री. शरदचंद्रजी पवार, मा. श्री. सुशीलकुमारजी शिंदे, मा. श्री. पृथ्वीराजजी चव्हाण, मा. श्री. नारायणजी राणे हे उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये बहुमूल्य योगदान दिलेल्या १५० पेक्षा जास्त वर्षे कार्यरत असलेल्या दिग्गज संस्थांच्या बरोबरीने हा सन्मान निरामय वेलनेस सेंटरला मिळाला याचा आम्हास सार्थ अभिमान आहे.

award f

डॉ अमृता चांदोरकर - न्यूज18 लोकमत मुक्त सन्मान 2022 ने सन्मानित

८ मार्च महिला दिनाचे औचित्य साधत निरामय वेलनेस सेंटरच्या संचालिका डॉ. अमृता चांदोरकर यांना त्यांच्या आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी यावर्षीचा लोकमत न्यूज 18 मुक्ता सन्मान देऊन नुकतेच गौरवण्यात आले. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात कॅबिनेट मिनिस्टर श्रीमती. यशोमती ठाकूर आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. व्हिडीओ नक्की पाहा आणि परिचित व्यक्तींना पाठवा.

लोकमत धन्वंतरी पुरस्कार 2022

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत

या वर्षी आपण सगळे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. याचे औचित्य साधत ‘स्वर्णिम भारत’ कडे वाटचाल या उपक्रमाद्वारे ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, यांच्या रविवार पेठ शाखेद्वारे आयोजित – महिला सशक्तीकरणाद्वारे समाज परिवर्तन या कार्यक्रमामध्ये डॉ. अमृता चांदोरकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. अमृता यांनी सर्वांना संबोधित केले.

NewIndia img 07
Bramhan mahasangh award 01
Bramhan mahasangh award 10

डॉ. अमृता चांदोरकर यांना ब्राम्हण महासंघ, पुणे यांचेतर्फे उत्सव स्त्रीत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा

आज दि. १२ मार्च रोजी डॉ. अमृता चांदोरकर यांना ब्राम्हण महासंघ, पुणे यांचेतर्फे उत्सव स्त्रीत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा हा सन्मान देऊन गौरविण्यात आले.

Arogya Sampada Sanman 2021

Arogya Sampada Sanman-2021

डॉ योगेश चांदोरकर, संस्थापक, निरामय आणि डॉ अमृता चांदोरकर, माननीय राजेश टोपे, आरोग्य मंत्री, महाराष्ट्र यांच्याकडून ‘आरोग्य संपदा सन्मान-2021’ प्राप्त करताना; मा.बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री, महाराष्ट्र; आणि श्रीमती सोनाली कुलकर्णी, प्रख्यात अभिनेत्री, आरोग्य सेवा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल

Karhade Sanman 01
img 05

कऱ्हाडे सन्मान- 2020

कऱ्हाडे ब्राह्मण संघ, मुंबई तर्फे देण्यात आलेला ‘कऱ्हाडे सन्मान’ पुरस्कार श्री सच्चिदानंद शेवडे यांच्या हस्ते निरामयच्या संचालिका डॉ. अमृता चांदोरकर यांना प्रदान करण्यात आला.

img 19 1
yogesh sir aadishakti foundation award 2019.1

आदिबंध-२०१९

आदिशक्ती फौंडेशन, यांच्या वतीने आरोग्यक्षेत्रातील भरीव योगदानासाठी श्री योगेश चांदोरकर यांना ‘आदिबंध२०१९’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी मा. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना श्री योगेश चांदोरकर आणि सौ अमृता चांदोरकर.

Play Video

ॲग्रोवन स्मार्ट अवॉर्ड्स 2019

‘निरामय’ आणि ‘अग्रोवन’ यांच्या वतीने शेतीक्षेत्रात उत्तम काम करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना निरामयचे संस्थापक डॉ. योगेश आणि डॉ. अमृता चांदोरकर.

lokmat one women award amruta chandorkar 02

लोकमत वन वूमन– 2018

लोकमत ‘वन वूमन– 2018’ पुरस्कार स्वीकारताना ‘निरामय’ च्या डॉ. अमृता चांदोरकर, सोबत पुण्यनगरीच्या महापौर मा. मुक्ता टिळक.

img 11
Amruta Madam Pune ICON

लोकमत आयकॉन्स ऑफ पुणे

श्रीमती अमृता चांदोरकर, निरामयच्या संचालिका, 20 मार्च 2016 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती जया बच्चन यांच्याकडून ‘लोकमत आयकॉन्स ऑफ पुणे’ पुरस्कार स्वीकारताना

img 12
heritage art club 03

संगीताचा कार्यक्रम

श्री.संतोष पोतदार गेल्या तीन दशकांहून अधिक काळ छायाचित्रण क्षेत्रात कार्यरत आहेत. गेल्या दोन दशकांपासून इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. रसिकांना भुरळ घालणाऱ्या ‘पाडवा पहाट’ या कार्यक्रमाची त्यांनी संकल्पना मांडली आणि ‘गीतरामायण’ हा पौराणिक कार्यक्रम पुन्हा सादर केला.

डॉ. योगेश चांदोरकर आणि डॉ. अमृता चांदोरकर गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ त्यांच्या ‘निरामय वेलनेस सेंटर’ या संस्थेच्या माध्यमातून ऊर्जा आणि आरोग्य यांच्या समन्वयातून अनेकांना निरोगी जीवनशैली प्रदान करत आहेत.

भारतीय कला अक्षय आहे. श्री. संतोष पोतदार, डॉ. योगेश चांदोरकर आणि डॉ. अमृता चांदोरकर यांनी एकत्र येऊन ‘हेरिटेज द आर्ट लेगसी’ या जागतिक दर्जाचे कला प्रशिक्षण देणारी अकादमी स्थापन केली.

त्याचे पुढचे पाऊल म्हणजे… ‘हेरिटेज आर्ट क्लब’!

आदिशक्ती

सकाळ च्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘आदिशक्ती – स्त्रीशक्तीचा गौरव’ या कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना गौरविण्यात आले. याप्रसंगी निरामय च्या डॉ अमृता चांदोरकर (दि. १० मार्च २०१६)

img 13 2
img 08

निरामय आयोजित गीतरामायण कार्यक्रम

निरामय आयोजित गीतरामायण कार्यक्रमाच्या वेळी डॉ. योगेश चांदोरकर आणि डॉ. अमृता चांदोरकर यांची एक प्रसन्न मुद्रा.
निरामय आयोजित गीतरामायण कार्यक्रमाच्या वेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या समवेत डॉ. योगेश चांदोरकर आणि डॉ. अमृता चांदोरकर.

Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!