Root Chakra

मूलाधार चक्र

मूलाधार चक्र मेरुदंडाच्या तळाशी गुदद्वाराजवळच्या शिवणीवर असून याचे तोंड जमिनीच्या दिशेने असते. हे चक्र आभामंडलामधील ऊर्जेवर प्रक्रिया करून पृथ्वीतत्त्व शरीरास पुरविते. निसर्गातील सर्व टणक भागांमध्ये प्रमुख तत्त्व हे पृथ्वी असते. पृथ्वीतत्त्वामुळे कुठल्याही वस्तूला आकार मिळतो. शरीरातील कठीण भाग जसे की, हाडे, अस्थिबंध, स्नायुबंध, त्वचा, केस, दात, कूर्चा तसेच पेशी/शिरा/वाहिन्यांचे आवरण, मज्जातंतू इत्यादीमध्ये पृथ्वीतत्त्वाचा मुख्य कार्यभाग असतो.

मूलाधार चक्र हे शरीरातील आधार चक्र आहे. याचा रंग लाल आहे. स्थिरता हा याचा सूक्ष्म गुणधर्म आहे. शारीरिक व मानसिक कार्यक्षमता या चक्रावर अवलंबून असते. शरीराची प्रतिकारशक्ती, नवीन पेशींची निर्मिती, अनावश्यक गोष्टींचे उत्सर्जन तसेच रक्तोत्पादन व रक्ताची गुणवत्ता राखणे ही महत्त्वाची कार्ये मूलाधार चक्र करते. सर्व कर्मे स्मृतीस्वरूप मूलाधार चक्रात साठविली जातात. माणसाचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व, आपले विचार मांडण्याची हातोटी, धाडसी व क्षमाशील वृत्ती मूलाधार चक्रात स्थित शक्तींमुळे मिळते. मूलाधार चक्र सक्षम असणारी व्यक्ती कणखर, काटक, निर्णयक्षम व व्यवहारी असते. मूलाधार चक्र कमकुवत झाल्यास, शरीराला पृथ्वीतत्त्व कमी पडू लागते. हाडे ठिसूळ होणे, हाडांची झीज, स्नायू व शिरा कमकुवत होणे, आत्मविश्वासाची कमतरता, नैराश्य इत्यादी समस्या उद्भवतात. तर मूलाधार चक्र अतिसक्रिय झाल्यास हाडे किंवा स्नायू कडक होणे, शिरा ताठ होणे, हाड वाढणे, अतिआत्मविश्वास, अव्यवहारी वृत्ती अशा व्याधी उद्भवू शकतात.

ध्यान - मूलाधार चक्र

सर्व धान्ये (उदा. तांदूळ, गहू, डाळी इ.), सर्व जमिनीत येणाऱ्या भाज्या/कंद (उदा. गाजर, बटाटा इ.), घट्ट आणि गोड गर असणारी फळे यातून शरीरास पृथ्वीतत्त्व मिळते. बैठका (दोन पायांत अंतर ठेवून उठाबशा काढणे) किंवा अर्ध बैठका मारणे या व्यायामानेदेखील मूलाधार चक्र सशक्त होण्यास मदत होऊ शकते.

मूलाधार चक्राच्या कार्यकारिणीमधील दोष

ज्या वेळी मूलाधार चक्राच्या कार्यकारिणीमध्ये दोष उत्पन्न होतात, तेव्हा शरीराचा आधार कोसळतो आणि मग, पाठ-कंबर-गुडघेदुखी, सांधेदुखी, संधिवात, आमवात, स्नायू आखडणे, सायटिका, सांधे निखळणे, पाठीची दुखणी, स्पॉन्डीलायटिस, खांदेदुखी, स्लिप डीस्क, बाम्बू स्पाईन, फ्रोजन शोल्डर, टेनिस एल्बो, टाचदुखी, अशक्तपणा, मूत्रपिंडाचे आजार, उंची खुंटणे, प्रतिकारशक्ती कमी होणे, रक्ताचा कर्करोग इ. शारीरिक व्याधी उद्भवू शकतात.

तसेच, नैराश्य, आत्मघातकी प्रवृत्ती, चुळबुळा स्वभाव, निर्णयक्षमतेचा अभाव, निद्रानाश, ठरवलेल्या गोष्टींची अंमलबजावणी न करता येणे तसेच अव्यवहारी वृत्ती अशा मानसिक व्याधी उद्भवू शकतात.

आपल्याकडून केली जाणारी सर्व कर्मे, स्मृतिस्वरूप येथे साठविली जातात. माणसाचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व, मीपणा किंवा त्याच्यातील अहं भाव येथूनच प्रकटतो. आपले विचार मांडण्याची हातोटी, धाडसी व क्षमाशील वृत्ती मूलाधार चक्रातील स्थित शक्तींमुळे मिळते.

ज्याचे मूलाधार चक्र सक्षम असते, ती व्यक्ती निर्णयक्षम व व्यवहारी असते. शरीरातील सर्व कठीण/घन भाग जसे की, अस्थी, मांस, त्वचा, नाडी व रोम हे पृथ्वी तत्त्वाच्या अधीन आहेत. रक्तोत्पादन व रक्ताची गुणवत्ता राखण्याचे महत्त्वाचे कार्य मूलाधार चक्राच्या आधिपत्याखाली येते. तसेच मूत्रपिंडावरील ॲड्रीनल ग्रंथीवरही या चक्राचा ताबा असतो.

Sapt Chakras

Root Chakra

Muladhar Chakra

This lies at the base of the spinal cord and is represented by red colour. ..

Sex Chakra

Swadhishthan Chakra

It is located near the reproductive organ. It is represented by...

Navel Chakra

Manipur Chakra

It is located on the navel and is represented by orange-yellow...

Heart Chakra

Anahat Chakra

It is located in the centre of the chest near the heart. It is represented by green colour...

Throat Chakra

Vishuddh Chakra

It is located in the throat and is represented by blue colour...

Third Eye Chakra

Adnya Chakra

It is located in between the two eyebrows. It is the centre of the power of the mind...

crown chakra final

सहस्रार चक्र

It is located at the Brahmarandhra or above the top of the head.

Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!