नेहमी विचारले जाणारे प्रश्न

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

निरामय गेल्या 12 वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणारी एक नामांकित संस्था आहे. कोणताही शारीरिक किंवा मानसिक आजार मुळापासून नष्ट करण्यासाठी येथे ‘स्वयंपूर्ण ऊर्जा उपचार’ दिले जातात.

‘स्वयंपूर्ण उपचार’ म्हणजे ऊर्जेद्वारे पंचतत्त्व संतुलित करणारे उपचार. शरीरातील ऊर्जेच्या असंतुलनातून रोग निर्माण होतो. सप्तचक्रं आणि पंचतत्त्वं संतुलनातून ऊर्जा संतुलित करता येते. ‘स्वयंपूर्ण उपचार’ ही ऊर्जा उपचारप्रणाली असून, शरीराला कमी पडणारी ऊर्जा वातावरणातून देणे व अतिरिक्त साठलेली ऊर्जा वातावरणात उत्सर्जित करण्याचे कार्य करते.

स्वयंपूर्ण उपचार घेण्यासाठी रुग्णाने निरामयमधील उपचारकांस फोनद्वारे कळविणे गरजेचे असते. सांगितलेल्या मुद्रास्थितीत ध्यानस्थ बसून निरोगी होण्याचा संकल्प करायचा असतो. ही ‘विनास्पर्श, विनाऔषध’ अशी उपचारपद्धती असल्याने रुग्ण दूरस्थ पद्धतीने जगाच्या पाठीवर कुठूनही हे उपचार घेऊ शकतो.

योगशास्त्रानुसार माणसाचे अस्तित्व पंचकोशामध्ये असते. अन्नमय कोश (शरीर), प्राणमय कोश (ऊर्जा),  मनोमय कोश (मन), विज्ञानमय कोश (ज्ञान) आणि आनंदमय कोश (आनंद). यातील पहिले तीन कोश शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात. कोणतीही गोष्ट ऊर्जेच्या माध्यमातूनच शरीरातून मनामध्ये आणि मनातून शरीरामध्ये परिवर्तित होत असते. यातील ऊर्जेचे प्रमाण कमी-अधिक झाल्यास शारीरिक व्याधी किंवा मानसिक दोष उद्भवतात. स्वयंपूर्ण उपचारांनी तीनही कोशांतील ऊर्जा संतुलित करून शरीर आणि मन संतुलित करण्याचा प्रयत्न केला जातो. परिणामस्वरूप कोणताही शारीरिक किंवा मानसिक आजार बरा होऊ शकतो.

कोणतेही आध्यात्मिक उपचार हे शरीरातील चक्रं व ऊर्जेवर आधारित असतात. प्राचीन उपचारांचा मूळ आधार ‘ऊर्जा’ हाच आहे. मात्र स्वयंपूर्ण उपचारांद्वारे चराचर सृष्टी आणि मानवी देह ज्या पंचतत्त्वांपासून बनलेले आहेत, त्या पंचऊर्जेचे संतुलन केले जाते. यामध्ये योगशास्त्र आणि निसर्गोपचारांची सांगड घातलेली असून, सप्तचक्रांतील असंतुलित तत्त्वांचे संतुलन करण्यासाठी मुद्रांचा व विशिष्ट हस्तक्रियांचा प्रयोग केला जातो. आवश्‍यकतेनुसार समुपदेशनाचाही अंतर्भाव यात असतो. स्वयंपूर्ण उपचारांचा केंद्रबिंदू पंचतत्त्वांचे संतुलन हाच आहे. त्यामुळे स्वयंपूर्ण उपचार हे इतर उपचारपद्धतीपेक्षा वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरतात.

मानवी शरीर हे निसर्गातील पंचतत्त्वांपासून बनलेले आहे. पंचतत्त्वामधील असंतुलन दोष निर्माण करते. कोणताही आजार हे लक्षण असून असंतुलन हे त्याचे मूळ असते. पंचतत्त्वांच्या संतुलनातून कोणताही शारीरिक तथा मानसिक आजार संपूर्ण बरा होऊ शकतो. स्वयंपूर्ण उपचार हे लक्षणांवर नव्हे तर मुळावर काम करतात, म्हणजे खूप काळापासून साठलेली रोगऊर्जा (अतिरिक्त तत्त्वं) मुक्त करून तिथे आरोग्यऊर्जा (आवश्‍यक तत्त्वं) प्रस्थापित करतात. ज्यामुळे पंचतत्त्वांचे संतुलन साधून पूर्णपणे आरोग्य मिळू शकते.

संपूर्ण रोगमुक्ती ही रोगाची तीव्रता म्हणजे रोगऊर्जेचा किती संचय आहे, यावर आणि तो संचय सोडून देण्याच्या रुग्णाच्या मनाच्या दृढ संकल्पावर अवलंबून असते. बरे होण्याची तीव्र इच्छा रुग्णास जलद रोगमुक्त करते. एकाच स्वरूपाच्या आजारात दोन रुग्णांना निरोगी होण्यासाठी लागणारा कालावधी वेगवेगळा असतो. एका ट्रीटमेंटमध्ये बरे  झालेले देखील अनेक रुग्ण आहेत. सकारात्मकता व सातत्य यावर रोगमुक्तीचा कालावधी अवलंबून असतो.

आजाराच्या तीव्रतेनुसार दिवसातून किती वेळा उपचार घ्यायचे, हे निरामयचे तज्ज्ञ ठरवितात. प्रत्येक वेळी सेंटरमध्ये येऊन किंवा ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष उपचारांचे मूल्य रुपये 200/- आकारले जाते. तर दैनंदिन पद्धतीने फोन करून घेतल्या जाणाऱ्या दूरस्थ उपचारांचे शुल्क रुपये 50/- प्रत्येकी (प्रत्येक फोन उपचाराचे) आकारले जाते. तुम्ही कुठेही असलात, तरी तिथून फोन करून उपचार घ्यायचे असतात. दर 15 दिवसांनी रुग्णाचे परीक्षण गरजेचे असते. तोवर घेतलेल्या दूरस्थ उपचारांचे शुल्क तेव्हा जमा करणे अपेक्षित असते. जसा आजार कमी होतो, उपचारही कमी होतात आणि आजार पूर्ण बरा झाला की, उपचार थांबवले जातात.

वैश्‍विक ऊर्जा संपूर्ण चराचरामध्ये व्याप्त आहे. ज्याप्रमाणे आपण गुरुत्वाकर्षणामुळे जमिनीशी बांधलेले असतो, त्याचप्रमाणे आपण वैश्‍विक ऊर्जेद्वारे एकमेकांशी जोडलेले असतो. यामुळेच मोबाईल नंबर डायल केला की, वातावरणातून ध्वनीलहरींचे प्रक्षेपण होऊन काही सेकंदांत जगात कुठेही संपर्क साधला जातो. या वैश्‍विक ऊर्जेच्या माध्यमातूनच स्वयंपूर्ण उपचार कार्य करतात. त्यामुळे रुग्ण जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी तेथून ऊर्जेशी जोडला जाऊ शकतो. मात्र यासाठी रुग्णाच्या किंवा नातेवाइकांच्या परवानगीची आवश्‍यकता असते व त्यासाठी त्यांनी फोन करणे गरजेचे असते.

निरामय वेलनेस सेंटरच्या चार ठिकाणी शाखा आहेत. पुणे, चिंचवड, मुंबई आणि कोल्हापूर. तसेच आपण ऑनलाईन पद्धतीनेदेखील उपचार घेऊ शकता.

रुग्ण परगावी किंवा परदेशात राहत असेल किंवा रुग्णास सेंटरला येणे शक्य नसल्यास तो ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनही निरामयच्या डॉक्टरांना भेटून उपचार सुरू करू शकतो. उपचार सुरू करण्यासाठी रुग्णाने पुढील लिंकवर जाऊन फॉर्म भरावा. https://niraamay.com/contact-us/ या फॉर्मसोबत रुग्णास उपचार शुल्क रुपये 200/- भरावे लागते. त्यासाठी पुढे दिलेल्या पर्यायांचा वापर करावा. त्यानंतर आपली अपॉइंटमेंट नोंदविली गेल्याचा मेसेज आपणास येतो. ऑनलाईन भेटीची लिंक आपणास पाठविली जाते. पूर्वनियोजित वेळेनुसार उपलब्ध डॉक्टरांची भेट होऊन, उपचार केले जातात. पुढील उपचार दूरस्थ पद्धतीने फोन करून घ्यावयाचे असतात. वेळोवेळी ऑनलार्इन फॉलो-अपही देणे गरजेचे असते.

स्वयंपूर्ण उपचारामध्ये रुग्णाच्या ऊर्जादेहाचे परीक्षण करून उपचार केले जातात. हे उर्जापरीक्षण करण्यासाठी प्रत्यक्ष रुग्ण किंवा रुग्णाचा सध्याच्या काळातील फोटोची आवश्‍यकता असते. रुग्णाचा फोटो हा रुग्णाचे प्रतिनिधित्व करतो. त्यावरून रुग्णाची शारीरिक स्थिती समजते आणि त्याच्या ऊर्जादेहाचे परीक्षणही करता येते.

निरामयचे डॉक्टर्स हे निसर्गोपचारतज्ज्ञ असून कोणताही वैद्यकीय सल्ला देत नाहीत किंवा औषधोपचारामध्ये हस्तक्षेप करत नाहीत. शरीर किंवा मनाच्या बिघडलेल्या स्थितीत औषध हे आधार असते. स्वयंपूर्ण उपचार हे शरीर व मनास ऊर्जा म्हणजेच ताकद प्रदान करतात. त्यातून शारीरिक व मानसिक स्थितीत सुधारणा दिसून येते. रुग्णाचे तपासणी अहवाल (रिपोर्टस्‌‍) देखील सुधारतात. ऊर्जेत होणाऱ्या सुधारणांनुसार स्वयंपूर्ण उपचार कमी होत जातात. तर रिपोर्टस्‌‍ चांगले आल्याने डॉक्टरी सल्ल्याने वैद्यकीय उपचार व औषधेदेखील कमी होत बंद झाल्याचा अनेक रुग्णांचा अनुभव आहे.

आजाराच्या स्वरूपानुसार, आवश्‍यकता असल्यास पथ्ये सुचविली जातात.

स्वयंपूर्ण उपचार ही संपूर्ण आरोग्य देणारी उपचारपद्धती आहे. रुग्णामध्ये जसजशी सुधारणा दिसू लागते, तसे उपचार हळूहळू कमी केले जातात आणि रुग्ण पूर्ण बरा झाल्यावर उपचार बंद केले जातात. निरामयशी असलेले नाते मात्र आयुष्यभर टिकते.

उपचारापेक्षाही रुग्णाचा स्वतःवर विश्‍वास असणे महत्त्वाचे आहे. ‘मला बरे व्हायचे आहे’ हा विचार रुग्णाने दृढ ठेवणे गरजेचे असते. स्वयंपूर्ण उपचारांच्या माध्यमातून रुग्णाला आवश्‍यक ऊर्जा मिळतच असते. ही ऊर्जा म्हणजे रुग्णाच्या शरीराला किंवा मनाला कमी पडत असलेली ताकद असते. मन जसा विचार निर्माण करते, तशीच कृती शरीराकडून घडते. त्यामुळे बरे होण्याचा दृढ विचार असल्यास, शरीर दिलेली ऊर्जा ग्रहण करते. मात्र शंका असल्यास किंवा बरे होणार नाही याची खात्री मनात असल्यास, दिलेल्या ऊर्जेचा स्वीकार केला जात नाही.

Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!