समय निरामय दिनदर्शिका – आपल्या मराठी संस्कृतीचा आणि हिंदू शास्त्राचा समग्र दर्शन.
भारतीय संस्कृती ही कालगणनेवर आधारलेली आहे. आपल्या पूर्वजांनी वेळ, घटिका, ग्रह, तिथी, आणि नक्षत्रांचा विचार करून कालगणना विकसित केली. हिंदू कालगणनेनुसार नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याला होते, आणि म्हणूनच समय निरामय दिनदर्शिका ही तिथीनुसार सुरू होणारी खरी भारतीय दिनदर्शिका आहे!
हिंदू कालगणना आणि आपली संस्कृती
ऋषिमुनींनी तयार केलेली सनातन कालगणना – केवळ दिवस मोजण्यासाठी नव्हे, तर योग्य वेळी योग्य कार्य करण्यासाठी.
आपले सण, उपवास, व्रतं आणि शुभ कार्ये ही तिथीनुसारच ठरवली जातात.
प्राचीन शास्त्रानुसार दिनचर्या आणि आरोग्य – आयुर्वेद व योगशास्त्र सांगतं की तिथीनुसार आहार-विहार, दिनचर्या आणि साधना केल्यास ते अधिक फलदायी ठरतं.
जर आपली मराठी आणि हिंदू संस्कृती याच तिथीवर आधारित आहे, तर
मग आपल्या जीवनाचं नियोजनही तिथीनुसार का नसावं?
समय निरामय दिनदर्शिका आपल्या घरात असलीच पाहिजे, कारण
✅ गुढीपाडव्यापासून सुरू होणारं तिथीनुसार कॅलेंडर
✅ पंचांग, सण, योगशास्त्र, आणि शुभ मुहूर्त यांचा संपूर्ण समावेश
✅ मराठी परंपरांना अनुसरून तयार केलेलं खास दिनदर्शिकेचं स्वरूप
✅ अष्टांग योगशास्त्राचा आधार – शारीरिक व मानसिक संतुलनासाठी मार्गदर्शन
समय निरामय दिनदर्शिकेत सांगितलेल्या आपल्या संस्कृतीनुसार जीवनाचं योग्य नियोजन करा! 🚩
Reviews
There are no reviews yet.