हालचाल प्रतिबंधित करणाऱ्या पाठ, कंबरदुखीला उर्जाउपचारांनी करा रामराम

औषधं न घेताही कोणतेही दुखणे तुमची पाठ कायमची सोडू शकते. त्यासाठी जेव्हा काही दुखतं तेव्हां ‘माझं काय चुकलं?’ हा प्रश्‍न आपण सर्वात आधी स्वतःला विचारायला हवा. खूप वेळ बसणार्‍यांची पाठ दुखणारच, जास्त वेळ उभं राहणार्‍यांची कंबर दुखणारच. पण त्यातही पोकही काढून बसणं, जड वस्तू उचलणं किंवा अचानक कसंही वाकणं या चुका आपण सर्रास करत असतो. त्याचा त्रास आपल्यापेक्षा शरीराला जास्त होत असतो. आता तुम्ही म्हणाल, मग काय कामं करणं सोडून द्यावीत का? पोटाला दोन घास कोण देईल? पण त्यावेळी हेही लक्षात घ्या की, आपण म्हणजे तुम्ही-आम्ही सगळे जे अन्न खातो, जे बाजारात उपलब्ध आहे, ते गहू, तांदूळ जे काही असेल ते रासायनिक खतांनी पिकवलेलं आहे. त्यातून शरीराचे पुरेसे पोषण होत नाही. पोषण नाही म्हणून स्नायूंमध्ये ताकद नाही. ताकद नाही म्हणून जरा चाललो की लागले पाय दुखायला. जरा बसलो की पाठ दुखणारच आणि सतत उभं राहून कंबर तर धरणारच. पण यावर उपाय काय? पेनकिलर की कंबरेचा पट्टा?
आता पेनकिलरचं तर तुम्हांलाही माहितीये, ते जरा वेळ गुंगी आणतं. तेवढ्यात आपण चार कामं करून घेतो आणि मग गुंगी उतरली की परत जास्तच दुखतं. मग परत एक पेनकिलर. अ‍ॅक्चुअली पेन किल होतच नाही. हे दुखणं असह्य झालं की आणा नवा दागिना आणि तो म्हणजे कंबरेचा पट्टा. आता हा कंबरेचा पट्टा बाहेरून शरीराला फक्त आधार देतो. त्यामुळे आपल्या हालचालींवर थोडं फार नियंत्रण येतं. पण हा उपाय म्हणजे आतून घर खिळखिळं होतंय आणि आपण बाहेरून टेकू लावतोय. मूळ दुखण्याचा आणि पट्ट्याचा काही संबंधच नाही. शेवटी येतो तो ऑपरेशनचा पर्याय – पण तो म्हणजे खर्चिक आणि मुख्य म्हणजे भीतीदायक ! माणसानं करावं तरी काय?

यासाठीच आम्ही सांगतो, माणसानं आपल्या आतमध्ये बघावं. म्हणजेच आत्मपरिक्षण करावं. आपल्या शरीराचं दुखणं समजून घ्यावं. आपलं काय चुकतं हे तपासावं. पोषक आहाराकडे लक्ष द्यावं. निरामयमध्ये येणार्‍या प्रत्येकाला आम्ही ह्या आत्मपरिक्षणाची सवय लावतो. कारण आम्ही बाहेरून मलमपट्टी करत नाही. तर दुखण्याचं मूळ शोधतो. शरीरातला कुठला स्नायू कमकुवत झाला आहे, कोणत्या उर्जा नाड्यांमध्ये अशुध्द उर्जा साठलेली आहे हे आम्ही सर्वात आधी तपासतो. त्यानंतर ही अशुध्द उर्जा बाहेर काढून त्या स्नायूंवर उर्जा उपचार करतो. तुमचा कदाचित विश्‍वास बसणार नाही पण दुखणं कसं चट्दिशी कमी होतं, याचा थेट अनुभव तुम्ही घेऊ शकता. असाच एक अनुभव नंदा कोत्तियान या मध्यमवयीन गृहिणीचा आहे. कंबरदुखीमुळे नंदा ताई तब्बल दोन वर्षे बेडवर झोपून असायच्या. जरा काम केलं की आडवं व्हायलाच लागायचं. त्यांनाही डॉक्टरांनी पेनकिलर, व्हिटॅमिन वगैरे दिलं. पण ते तेवढ्यापुरतंच. पुढे डॉक्टरही म्हणाले की, नंदाताई आता पेनकिलर बास करा. त्यात त्रासदायक बाब म्हणजे या आजारामुळे त्यांच्या लेकीचं बाळंतपणही त्यांना करता आलं नाही. पण प्रत्येक त्रासालाही शेवट असतोच. एकदा नंदाताई त्यांच्या मैत्रिणीसोबत निरामयमध्ये आल्या आणि त्यांनी उपचार घेतले. त्यांना जागेवर थोडं बरं वाटलं. विश्‍वास बसला. पुढे नियमित उपचार सुरू झाले. 15 दिवसातच त्यांचे निम्मे दुखणे कमी झाले. त्यानंतर त्यांनी पेनकिलरच्या गोळ्या फेकून दिल्या. कंबरेचा पट्टा माळ्यावर टाकला. पुढे या उपचारांनी त्या इतक्या बर्‍या झाल्या की, नातीला उचलून घेऊ शकल्या. एवढंच नव्हे तर लेकीबरोबर चक्क अंधेरी ते दादरचे सिध्दिविनायक अशी पायी वारी केली, तीही कुठली गोळी न घेता, पट्टा न लावता !

नंदाताईंच्या बाबतीत जे घडलं ते तुमच्याही बाबतीत घडू शकतं. कारण निरामय पेन मॅनेज करत नाही तर मुळापासून दुखणे दूर करते आणि तेही स्वयंपूर्ण उपचारपध्दतींद्वारे ! आता ही पाठदुखी-कंबरदुखी तरूणांच्या नव्हे तर लहान लहान मुलांमध्येही दिसू लागलीये. आता कोणतंही औषध न घेता आपण बरे होऊ शकतो यावर तरूण पिढीचा यावर विश्‍वास बसणं जरा अवघडच. असाच सोलापुरचा एक तरूण व्यावसायिक पाठदुखीसाठी आमच्याकडे आला. त्याचा निरामयवर विश्‍वास अजिबात नव्हता. पण पहिल्या उपचारातच त्याला जो फरक जाणवला, पठ्ठयाने पुढे 6 महिने उपचार घेतले आणि त्याची पाठदुखी कायमची थांबली. बाय दि वे, त्याला डॉक्टरांनी मणक्यात गॅप सांगितली होती. आता तुम्ही त्याला भेटलात तर तोही म्हणेल, निरामयमध्ये जा !

विचार करा, पूर्वी कुठे होते डॉक्टर आणि कुठली इंजेक्शनं? आपल्याला औषधं, इंजेक्शन यांची सवय लागलीये. औषधं न घेता आपण कायमचे बरे होऊ शकतो, यावर विश्‍वास बसणं जड जातंच. पण वरच्या तरूणामध्ये एक गोष्ट चांगली होती आणि ती म्हणजे ‘करून तर बघू’ हा अ‍ॅप्रोच. या अ‍ॅप्रोचने जरी तुम्ही निरामयमध्ये आलात तरी तुमचं दर्दभरं आयुष्य आनंदात नक्कीच बदलू शकतं. त्यासाठीच आमचा हा खटाटोप !

पाठ व कंबरदुखीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ आवर्जून पाहा.

Share this post

Facebook Comments: Please enter a valid URL
Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!