मुद्राशास्त्र

Mudra

तर्जनी आणि अंगठा या दोन्हींची अग्रे किंचित दाब देऊन जुळवावी आणि बाकीची बोटे सरळ ठेवावीत. अंगठा अग्नतित्वाचे तर तर्जनी वायुतत्त्वाचे प्रतनिधित्वि करते. अंगठा बुद्धीचे केंद्र मानले
जाते आणि तर्जनी मनाचे. या मुद्रेमुळे मनशांती लाभते. मज्जासंस्थेवर उत्तम परिणाम होतो. ताण
नष्ट होतो, राग शांत होतो. आनंदाची भावना नर्मिाण होते. स्मरणशक्ती सुधारते, एकाग्रता वाढते. नसा बळकट होतात. कंपवात, चेहऱ्याचा पक्षाघात, अर्धांगवायूसारख्या विकारांमध्ये चांगला फायदा होतो. मन, भावनांवर नियंत्रण येते. अंतःस्रावी ग्रंथीची संपूर्ण रचना नियंत्रित होते. पिट्‌यूटरी
ग्रंथी, थायरॉईड ग्रंथी सक्षम होतात. मानसिक मरगळ, विस्मरण, अस्वस्थता, भीती, न्यूनगंड आणि नैराश्यासारख्या मानसिक आजारांमध्ये ही मुद्रा हितकर ठरते. शांत झोपेसाठी या मुद्रेचा फायदा होतो.

आकाश मुद्रा

मधलं बोट म्हणजे मध्यमा व अंगठा यांचा अग्रभाग जुळवावा व थोडा दाब द्यावा. बाकी सर्व बोटे सरळ ठेवावी. ही मुद्रा कितीही वेळ केली तरी चालते. मध्यमा आकाशतत्त्वाचे प्रतीक असल्याने शरीरातील आकाशतत्त्वाच्या असंतुलनामुळे होणारे रोग म्हणजे शरीर पोकळीतील भागांच्या आजारांवर या मुद्रेने परिणाम होतो. ही मुद्रा ध्यानात मदत करते. भावना आणि विचार शुद्ध करते. अर्धशिशी किंवा कवटीच्या पोकळीमधील वेदना या मुद्रेमुळे दूर होतात. कानातील आणि छातीतील संसर्गदोष, दमा इ. बरे होण्यास मदत होते. हाडे बळकट होतात. हृदयविकारात होणाèया वेदना दूर करते, हृदयाच्या ठोक्यांचे नियमन करते, तसेच उच्च रक्तदाब नियंत्रित करते. (हृदय प्रसरण पावलेल्या व्यक्तींनी मात्र ही मुद्रा करू नये.)

02 आकाश मुद्रा gif
03 पृथ्वी मुद्रा gif

अनामिका आणि अंगठा याची टोके जुळवून किंचित दाब द्यावा. बाकीची बोटे सहज सरळ ठेवावी. अंगठा अग्नितत्त्वाचे तर अनामिका पृथ्वी तत्त्वाचे प्रतिनिधित्व करते. पृथ्वीतत्त्वाचे अस्तित्त्व मुख्यत्वे हाडे, स्नायू, कुर्चा, त्वचा, चरबी इ.मध्ये असते. पृथ्वी मुद्रेमुळे शरीरास बळकटी मिळते. ही मुद्रा शरीरातील पृथ्वीतत्त्व आणि अग्नितत्त्व संतुलित करते. याला अग्निशामक मुद्राही म्हणतात. जीवनशक्ती वाढवणारी मुद्रा. हातापायांचा अधूपणा, अर्धांगवात यांसारख्या आजारांमध्ये कमजोर झालेल्या अवयवांत पुन्हा ताकद येते. अस्थिवेष्टन झिजले असेल तर दुरुस्त होण्यास मदत होते. हाड मोडल्यास हाडांची जुळणी लवकर होते. जखमा भरून येण्यास फायदेशीर. वजन वाढते. सहनशक्ती वाढते. त्वचा निरोगी आणि कांतिमान होते. केस गळणे, अकाली केस पिकणे या साठीही उपयुक्त ठरते.

जल मुद्रा

करंगळी व अंगठा यांची टोके जुळवून बाकीची तीन बोटे सहज सरळ ठेवावी. ही मुद्रा जलतत्त्वाचे प्रतीक आहे. त्यामुळे शरीरातील मलद्रव्य बाहेर टाकण्याच्या क्रियेसंबंधित इंद्रिये व्यवस्थित कार्यरत होऊन मलनिस्सारण चांगले होते. ही मुद्रा केव्हाही, कुठेही व कितीही काळ केली तरी चालते. कोरडी त्वचा, भेगा, भाजणे तसेच कोणतेही त्वचाविकार बरे होतात. पित्त कमी होते, तोंडाची गेलेली चव परत येते. मूत्र विसर्जन व्यवस्थित होते. वंगण कमी झाल्यामुळे निर्माण झालेली सांधेदुखी, हाडांची झीज भरून येते. रक्तशुद्धीसाठी फायदेशीर आहे. डोळे कोरडे पडणे, कोरडा खोकला, पचनमार्ग शुष्क होणे या त्रासांवर गुणकारी ठरते. गॅस्टड्ढोसारख्या रोगात उपयुक्त.

04 वरुण मुद्रा gif
Pran Mudra

पंचप्राणांपैकी प्राण हा वायू स्वस्यंत्राखाली व डायफ्रामच्या वरील छातीच्या भागात कार्यरत असतो. हृदय, फुप्फुसे यांना सक्रिय ठेवतो. कनिष्ठिका आणि अनामिकांची टोके अंगठ्याच्या टोकाला जोडावी. पृथ्वी, जल आणि अग्नी एकत्र आल्यामुळे ही मुद्रा एक जोमदार ऊर्जाप्रवाह निर्माण करते. जुनाट थकवा, अशक्तपणा, असहनशीलता दूर होते. प्रतिकारशक्ती वाढते. मानसिक ताण, राग, अस्वस्थता, मत्सर, गर्व, चिडचिड दूर होते. मूत्रविसर्जन करताना अडणे आणि दाह होणे. आग होणारे लाल शुष्क डोळे, मोतीबिंदू, डोळ्यांच्या सर्व तक्रारी दूर होऊन डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी हितकर. शुष्क लाल, दाह करणारी सुरकुतलेली त्वचा, पुरळ, लाल चट्टे पडणे, महारोग यांसाठी अत्यंत परिणामकारक. रक्तवाहिन्यांतील अडथळे, अशुद्धता दूर होऊन रक्ताभिसरण सुधारते.

अपान मुद्रा

पंचप्राणांपैकी अपान हा वायू नाभीच्या खाली ओटीपोटाच्या भागात कार्यरत असतो. मोठे आतडे, मूत्रपिंड, गुदद्वार आणि जननेंद्रियांना ऊर्जा देतो. यामुळे शरीरातील त्याज्य पदार्थांचे उत्सर्जन होते. कृती – मध्यमा आणि अनामिकेचे टोक अंगठ्याला सली जोडून ही मुद्रा होते. मध्यमा म्हणजे आकाशतत्त्व अनामिका म्हणजे पृथ्वीतत्त्व आणि अंगठा म्हणजे अग्नीतत्त्व. या तीन तत्त्वांचा समन्वय येथे साधला जातो. लाभ : १ अपान मुद्रेमुळे मल, मूत्र, रज/शुक्र, पोटातील वात विसर्जनाचा प्रवाह नियमित होतो. २ पोटात दुखणे, उलट्या, उचक्या, अस्वस्थता यांसारख्या पोटाच्या तक्रारी नियंत्रित होतात. ३ दातांचे दुखणे थांबते. दातांचे आरोग्य टिकते. ४ मधुमेहाचा विकार या मुद्रेच्या सरावाने नियंत्रित होतो. (अपान मुद्रा आणि त्यानंतर प्राण मुद्रा करावी.)

Apan Mudra
Saman Mudra

पंचप्राणांपैकी समान हा वायू हृदय व नाभी यामध्ये कार्यरत असतो. यकृत, आतडे, स्वादुपिंड आणि पोट यांस ऊर्जा पुरवितो. पाचकप्रणाली सक्रिय आणि नियंत्रित करणे, शारीरिकदृष्ट्या पोषक द्रव्याचे समाकलन आणि वितरण करणे ही याची मुख्य कार्ये आहेत. हाताच्या पाचही बोटांची टोके एकत्र जुळवावी व ती आकाशाच्या दिशेने करावी. यामुळे पंचत्त्वांचे संतुलन होते. मनातील क्रोध नष्ट होतो. मन शांत होते. स्वादुपिंड, यकृत, प्लीहा यांची कार्ये सुरळीत झाल्याने पचनक्रिया चांगली राहते. आतड्यांमधून पोषक द्रव्यांचे शोषण आणि वितरण सुरळीत झाल्यामुळे शरीराचे योग्य पोषण होते. सर्वसमावेशक आरोग्य मिळते. दुखावलेल्या भागावर ही मुद्रा ठेवल्यास त्वरीत आराम मिळतो. लचक बरी होते.

उदान मुद्रा

पंचप्राणांपैकी उदान हा वायू डोक्यापासून गळ्यापर्यंतच्या भागात कार्यरत असतो. येथे ऊर्जादेहातीलआज्ञा आणि विशुद्धी चक्राचे स्थान आहे. उदान वायू डोळे, जीभ, नाक आणि कान या ज्ञानेंद्रियांना आणि मनाला सक्रिय करतो. तर्जनीचे टोक हुलकेच दाब देऊन अंगठ्याच्या टोकावर जोडावे. मध्यमेचे टोक तर्जनीच्या नखावर ठेवावे. अनामिक आणि कनिष्ठिका सरळ ठेवावी. तर्जनी म्हणजे वायूतत्त्व, मध्यमा म्हणजे आकाशतत्त्व आणि अंगठा म्हणजे अग्रीतत्त्वाचे प्रतीक. मध्यमा तर्जनीवर ठेवल्यामुळे आकाश तत्त्वाने भारीत वायूतत्त्व अग्रीने उत्तेजित होऊन शरीरातील पोकळ अवयवांना कार्यक्षम करते. स्वर रज्जू म्हणजेच आवाजासाठी लाभदायक आहे. आवाजातील कंप किंवा घोगरेपणा जातो. वास न येणे, श्वसनास त्रास इ. मध्ये गुण येतो. थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुरळीत करते.

Udan Mudra
Vhyan Mudra

पंचप्राणांपैकी व्यान हा वायू संपूर्ण शरीर व्यापून टाकतो. सर्व नसांमधून, धमन्यांमधून वाहणारा हा वायू संपूर्ण शरीराच्या हालचाली नियमित आणि नियंत्रित ठेवतो. शरीरातील व्यान वायूच्या गतीवर रक्तदाब अवलंबून असतो. कृती – तर्जनी आणि मध्यमेची टोके टोकाशी जोडून ही मुद्रा होते. अंगठ्याच्या वायू आणि आकाशतत्त्वातून वात निर्माण होतो असे आयुर्वेद सांगते. या मुद्रेमुळे शरीरातील वात संतुलित होतो. उच्च अथवा कमी रक्तदाब नियंत्रित आणि संतुलित होतो. कोणत्याही गोष्टीसाठी पुढाकार न घेणे, उत्साह नसणे, विचारप्रक्रिया मंद होणे आणि आकलन न होणे इ. मानसिक विकारांना ही मुद्रा सुधारते. ग्लानी किंवा अतिझोपेवर मात करता येते..

वायू मुद्रा

अंगठ्याच्या तळाला तर्जनीचे टोक ठेवावे आणि तर्जनीवर अंगठा हलकेच टेकवावा. बाकीची बोटे ताठ ठेवावीत. शरीरातील वात जेव्हा एकाच भागात अडकतो, तेव्हा तिथे तीव्र वेदना होतात. अडकलेला वायू रक्ताभिसरणात अडथळे निर्माण करतो. वायू मुद्रेमुळे शरीरातील अतिरिक्त वायुतत्त्वाचा नाश होतो. रक्ताभिसरण सुरळीत होऊन वेदना शमतात. कंपवात, अर्धांगवायू, मानेचा स्पॉन्डिलिसिस, पाठ आणि पायातील वेदना आणि गुडघेदुखीसारख्या वायुदोषांवर, वायू मुद्रेच्या नियमित सरावाने मात करता येते. संधिवातावर या मुद्रेच्या सरावाने उपचार करता येतो. (वायू मुद्रा त्यानंतर वरुण मुद्रा आणि शेवटी प्राण मुद्रा करावी.)

05 वायू मुद्रा gif
14 अपान वायू मुद्रा gif

कोणाही व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येण्यापासून वाचविणारी ही मुद्रा आहे. अपानवायू मुद्रा वायू मुद्रा आणि अपान मुद्रा या दोन मुद्रांचा मिलाफ आहे. अंगठ्याच्या तळाला तर्जनीचे टोक टेकवावे आणि मध्यमा आणि अनामिकेच्या टोकाला अंगठ्याचे टोक जोडावे. ही मुद्रा केली असता वायू मुद्रा आणि अपान मुद्रा या दोन्हींचाही एकत्रित लाभ होतो. शरीरात मुख्यत्वे छातीत दाटलेला वायू मुक्त होतो आणि हृदयाकडील रक्ताभिसरण सुरळीत होते. यामुळे वेदना त्वरीत नष्ट होतात आणि हलकेपणा येतो. पोटातील अतिरिक्त वायू कमी होतो. हृदयाचे स्नायू बलवान होऊन हृदयक्रिया सुधारते. छातीत दुखणे, घाम आणि थकवा दूर होतो. हृदयाचे अनियमित ठोके नियमित होतात. रक्ताभिसरणातील अडथळे दूर होतात. पित्तामुळे होणारी जळजळ शांत होते. मलावरोधावर उपयुक्त मुद्रा.

शून्य मुद्रा

अंगठ्याच्या तळाशी मध्यमेचे टोक टेकवावे आणि मध्यमेवर अंगठा हलकेच टेकवावा. या मुद्रेमुळे शरीरातील अतिरिक्त आकाशतत्त्वाचा नाश होतो. कानातून आवाज येणे, कान दुखणे, बहिरेपणा तसेच मुकेपणा बरा होतो. झोप न येण्यावर उपयुक्त. डोके, छाती, पोट यातील बधिरपणा दूर होतो. शून्य मुद्रा केल्याने भोवळ थांबते.

06 शून्य मुद्रा gif
15 शून्य वायू मुद्रा gif

तर्जनी आणि मध्यमा दोन्हीची टोके अंगठ्याच्या तळाशी टेकवावीत आणि अंगठा हलकेच दोन्ही बोटांवर ठेवावा. शून्य मुद्रा आणि वायू मुद्रा यांच्या मिलाफाने शून्य वायू मुद्रा होते. शून्य मुद्रेमुळे अतिरिक्त आकाशतत्त्व आणि वायुतत्त्वाचे प्रमाण घटते. निद्रानाशात उपङ्मोगी ‘ुद्रा. मनाची ताकद वाढते. सांध्यातील करकर आवाज, सांधेदुखी बरी होते. पार्किन्सन्स, तोल जाणे, गिडिनेस, व्हर्टिगो, ‘ज्जासंस्थेशी निगडित आजारां‘ध्ङ्मे गुणकारी. अनियमित मासिक पाळी, स्पॉन्डीलाङ्मसिस, सततच्ङ्मा शारीरिक ताणा‘ुळे निर्‘ाण होणारी अकडन, स्नाङ्मूंचा कडकपणा इ. विकारांवर ही मुद्रा उपयुक्त ठरते. कर्कश आवाज, तोतरेपणा, तीव्र डोकेदुखी, कानदुखी, दातदुखी, घसादुखी, सांधेदुखी या सर्व दुखण्यांसाठी शून्य वायू मुद्रा लाभदायी ठरते.

सूर्य मुद्रा (लठ्ठपणा घालवणारी मुद्रा)

सूर्य मुद्रा सूर्याप्रमाणे आपल्या शरीरात उष्णता निर्माण करते. या मुद्रेमुळे आपल्या शरीरातील पृथ्वीतत्त्व घटते आणि अग्नितत्त्व वाढते. यामुळे शरीरातील चयापचय क्रिया उत्तेजित होते. कृती – अनामिकेचे टोक अंगठ्याच्या तळाला टेकवा आणि अंगठा अनामिकेवर हलकेच टेकवावा. सूर्य मुद्रेमुळे शरीरात वाढलेले अनावश्यक पृथ्वीतत्त्व कमी होते, अग्नितत्त्व वाढते. अग्नितत्त्व हे दृष्टीशीही संबंधित आहे. (अशक्त व्यक्तींनी ही मुद्रा करू नये.) अनावश्यक थंडी वाजणे किंवा कुडकुडणे थांबून शरीराचे तापमान संतुलित होते. खोकला, नाक चोंदणे, फुप्फुसांमध्ये पाणी किंवा संसर्ग, दमा इ. दूर होतात. भूक न लागणे, अपचन आणि मलावरोध यासारखे त्रास बरे होतात. चयापचय क्रिया सुधारल्यामुळे वजनवाढीला आळा बसतो. रक्तातील कोलेस्टड्ढॉल पातळी घटवण्यास मदत होते. मोतीबिंदू विकारात उपयुक्त मुद्रा.

07 सूर्य मुद्रा gif
08 जलोदरनाशक मुद्रा gif

अंगठ्याच्या तळाशी करंगळीचे टोक ठेवावे आणि अंगठा करंगळीवर हलकेच टेकवावा. कनिष्ठिका जलतत्त्वाचे प्रतिनिधित्व करते. पोटातील अतिरिक्त जलतत्त्वाचे नियंत्रण जलोदरनाशक मुद्रा करते. शरीरातील अतिरिक्त जलतत्त्वाचा नाश या मुद्रेमुळे होतो. ‘जलोदरङ्क म्हणजे ‘लिव्हर सिरॉसिसङ्क या आजारात लिव्हरचे कार्य व्यवस्थित होत नसल्यामुळे चयापचय क्रिया मंदावते. पोटात अती प्रमाणात पाणी साठते. जलोदरनाशक मुद्रेमुळे या आजारात आराम पडतो. संसर्गामुळे फुप्फुसांमध्ये किंवा सांध्यांमध्ये पाणी होणे बरे होते. शरीराच्या कोणत्याही भागात आलेली सूज बरी होते. हत्तीरोग बरा होतो. डोळ्यातून तसेच नाकातून पाणी वाहणे, जुलाब होणे, लघवीला वारंवार होणे इ. नियंत्रित होते. मासिक पाळीच्या वेळी होणारा अतिरिक्त रक्तस्राव आटोक्यात येतो.

लिंग मुद्रा

ही मुद्रा अग्नीतत्त्वाला प्रभावित करून शरीराचे तापमान वाढविण्याचे काम करते. जर व्यक्ती पित्ताप्रकोप, ताप, पोटातील अल्सर यांनी ग्रस्त असेल तर ही मुद्रा करू नये. कृती – दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये अडकवावित आणि एक अंगठा (डावा किंवा उजवा) ताठ उभा ठेवावा. ही मुद्रा शरीरातील अग्नी प्रज्वलित करते. 43 विरामय weriness Center (लिंग मुद्रेमुळे शरीरातील तापमान वाढते. त्यामुळे ही मुद्रा 15 मि. पेक्षा जास्त वेळ करू नये. आजार बरा झाल्यावर या मुद्रेचा सराव थांबवावा.) लाभ : 1. हायपो थर्मिया, हवेने होणारी सर्दी आणि कुडकुडणे लिंग मुद्रा ताबडतोब नियंत्रित करते. 2. ओला खोकला, सर्दी, कफ, नाक चोंदणे यांसारखे अतिरिक्त स्राव पाझरल्यामुळे निर्माण झालेले आजार बरे होतात. 3. दमा, अस्थमा, कफाने छाती भरणे, क्षयरोग, फुफ्फुसांमध्ये पाणी साचणे यांसारखे आजार बरे होतात. फुफ्फुसे कार्यक्षम होतात. 4. वातानुकूलित खोलीत येणारा अस्वस्थपणा, अति थंडी वाजणे, कापरे भरणे, जड होणे बरे होते. 5. शरीरात उष्णता निर्माण होऊन रोगनिवारण होते. 6. अनावश्यक चरबी कमी होते. 7. कफ प्रवृत्तीच्या मंडळींनी ही मुद्रा साधारणपणे थंडीच्या दिवसात करावी. सर्दी झाली असता सकाळ-संध्याकाळ पंधरा मिनिटे करावी. 8. नाभी केंद्र हलल्यास अपचनाचे, जुलाबाचे त्रास उद्भवतात. या मुद्रेने नाभीकेंद्र जाग्यावर येते.

17 लिंग मुद्रा 4
17 शंख मुद्रा gif

कृती – डाव्या हाताच्या अंगठ्याभोवती उजव्या हाताची चारही बोटे गुंडाळावीत. त्यावर डाव्या हाताची चार बोटे सरळ ताठ ठेवावीत. उजव्या हाताच्या अंगठ्याचे वरचे पेर, डाव्या हाताच्या तर्जनीवर टेकवावे. या मुद्रेचा आकार शंखासारखा दिसतो म्हणून या मुद्रेला शंख मुद्रा म्हणतात. लाभ : 1. या मुद्रेमुळे आद । सुधारतो. ज्यांना सतत बोलावे लागते अशांसाठी उपयुक्त. 2. अन्नपचन व्यवस्थित होते. 3. बद्धकोष्ठतेचा त्रास बरा होतो. शौचास सुलभ होते. 4. थायरॉईड ग्रंथींचे कार्य सुधारते.
सहज शंख मुद्रा
कृती – दोन्ही हात जोडून बोटे एकमेकात गुंतवा आणि हाताचे तळवे एकमेकांवर दाबावेत. दोन्ही अंगठे एकमेकांशी समांतर ठेवावेत. अंगठ्यांनी तर्जनीवर दाब द्यावा. ही आहे सहज शंख मुद्रा. ही मुद्रा करताना वज्रासनात बसावे. योगिक शरीरशास्त्रानुसार शरीरातील दहा मुख्य नाड्या प्रभावित होतात. या मुद्रेमुळे शरीर बलशाली बनते. दहा मुख्य म्हणजे सुषुम्ना, इडा, पिंगला, गांधारी, हस्तिजिव्हा, पूषा, यशस्विनी, आलंबुसा, कुहू आणि शंखिनी. लाभ : 1. पाठीचा कणा ताठ होऊन त्यात लवचिकता येते. स्लिपडीस्कसारख्या त्रासांमध्ये प्रभावी. 2. प्रजनन संस्थेशी संबंधित विकार नष्ट होतात. 3. उतारवयात अंग बाहेर येणे, लघवी किंवा शौचावर नियंत्रण नसणे अशा तक्रारी बळावतात, त्यासाठी उपयोगी मुद्रा. यामुळे गुदाचे स्नायू बळकट होतात. 4. जीभ जड असणे, बोलताना अडखळणे, पहिला शब्द बाहेर न पडणे अशा तक्रारी दूर होतात.

सहज शंख मुद्रा

कृती – दोन्ही हात जोडून बोटे एकमेकात गुंतवा आणि हाताचे तळवे एकमेकांवर दाबावेत. दोन्ही अंगठे एकमेकांशी समांतर ठेवावेत. अंगठ्यांनी तर्जनीवर दाब द्यावा. ही आहे सहज शंख मुद्रा. ही मुद्रा करताना वज्रासनात बसावे. योगिक शरीरशास्त्रानुसार शरीरातील दहा मुख्य नाड्या प्रभावित होतात. या मुद्रेमुळे शरीर बलशाली बनते. दहा मुख्य म्हणजे सुषुम्ना, इडा, पिंगला, गांधारी, हस्तिजिव्हा, पूषा, यशस्विनी, आलंबुसा, कुहू आणि शंखिनी. लाभ : 1. पाठीचा कणा ताठ होऊन त्यात लवचिकता येते. स्लिपडीस्कसारख्या त्रासांमध्ये प्रभावी. 2. प्रजनन संस्थेशी संबंधित विकार नष्ट होतात. 3. उतारवयात अंग बाहेर येणे, लघवी किंवा शौचावर नियंत्रण नसणे अशा तक्रारी बळावतात, त्यासाठी उपयोगी मुद्रा. यामुळे गुदाचे स्नायू बळकट होतात. 4. जीभ जड असणे, बोलताना अडखळणे, पहिला शब्द बाहेर न पडणे अशा तक्रारी दूर होतात.

18 सहज शंख मुद्रा gif
19 मेरुदंड मुद्रा gif

मेरुदंड म्हणजे पाठीचा कणा. ही मुद्रा केली असता पाठीत या मुद्रेत दोनही हातांनी जाणवणारा ताण नष्ट होतो. वेगवेगळ्या पद्धतीने या मुद्रा केल्या जातात. कृती – उजवा हात – अंगठा, मध्यमा आणि कनिष्ठिका या तीनही बोटांची टोके एकमेकांना जोडावीत. तर्जनी आणि अनामिका ही बोटे सरळ ठेवावीत. डावा हात – तर्जनीच्या नखावर अंगठ्याचा मधला जोड बिंदू ठेवावा. इथे लक्षात घ्यावे की अंगठ्याचे टोक नाही. अवकाश आणि जलतत्त्वाची योग्य संतुलन साधले जाते. त्यामुळे पाठीच्या कण्यातील मणके वायूतत्त्वाच्या मदतीने लवचीकरीत्या हलू शकतात. मुद्रा करताना जेव्हा तर्जनीचे टोक अंगठ्याच्या जोड बिंदूवर ठेवले जाते तेव्हा वायूतत्त्वाची पातळी योग्य प्रमाणात कमी केली जाते. लाभ : 1.साफसफाई, बागकाम, वजन उचलणे तसेच संगणकावर खूप वेळ काम केल्याने पाठीवर ताण येतो. मेरुदंड मुद्रेमुळे पाठीवरील ताण दूर होऊन वेदनामुक्ती होते. 2.मणक्यात गॅप, गादी सरकणे (स्लिपडीस्क), नस दाबली जाणे (सायटिका) इ. मुळे पाठ, कंबरेत वेदना होतात. सातत्याने मेरुदंड मुद्रा करीत राहिल्यास दुखण्यातून मुक्ती मिळते. दररोज 30 मिनिटे मेरुदंड मुद्रा आणि त्यानंतर 10 मिनिटे प्राण मुद्रा करावी.

ध्यान मुद्रा

कृती
ध्यान मुद्रा करायला पद्मासन, सुखासन किंवा सिद्धासनासारखी ध्यानाची आसने योग्य आहेत. ह्यापैकी एका आसनात बसून हातावर हात ठेवावा. दोन्ही हातांचे तळवे वरच्या दिशेला असावेत. जेव्हा आपण डावा तळवा ठेवतो त्याला भैरवी मुद्रा म्हणतात आणि जेव्हा डाव्या तळव्यावर उजवा तळवा ठेवतो त्याला भैरव मुद्रा म्हणतात. हाताच्या तळव्यावर हृदयाशी संबंधित नाडी दाबबिंदू आहेत आणि हाताच्या मागच्या भागात पाठीच्या कण्याशी संबंधित नाडी दाबबिंदू आहेत. त्यामुळे मुद्रा करताना आपण जेव्हा हाताचे तळवे एकावर एक ठेवतो तेव्हा हृदय, फुफ्फुसे, पॅनक्रियाज आणि मूत्रपिंडाशी संबंधित नाडी दाब बिंदू उद्दीपित होतात आणि दुसर्या हातावरील पाठीच्या कण्याशी संबंधित नाडी दाबबिंदू उद्दीपित होतात.

लाभ :
1. व्यक्तीच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी ध्यान मुद्रा मदत करते आणि ध्यान साधनेमुळे व्यक्तीला शुद्ध विचारांचा आणि मनःशांतीचा लाभ होतो.
2. स्नायू मजबूत करते आणि रक्ताभिसरण नियमित होते.
3. रक्तदाब आणि हृदयविकारापासून मुक्त होण्यास मदत होते.
4. चिंता, भ्रामकपणा, वाईट स्वप्ने, स्मृती गमावणे, चिडचिडेपणा आणि मानसिक उदासीनता जाते.
5. आनंददायक शांती आणि आत्मविश्वासाची स्थिती गाठण्यास मदत होते.

20 ध्यान मुद्रा gif
Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!