मानसिक आजारांसाठी ऊर्जा उपचार

जीवनातील रस संपला असेल तर हे करा…

सध्याच्या काळात कोरोनामुळे सगळं जग संकटात सापडले आहे. आर्थिक गणित कोलमडले आहे. भविष्याची चिंता सतावत आहे. दैनंदिन जीवन विस्कळीत झालेले आहे. त्यामुळे नैराश्य आले आहे. नैराश्यामुळे माणसाची वागणूक बदलली आहे. ही वाढत चाललेली नकारात्मकता वेळच्या वेळी काढून टाका.

नकारात्मकता काढण्यासाठी मनाची स्वच्छता करा.

संपूर्ण शरीर शिथील करा. सावकाश दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश सोडा. शांत आणि एका लयीत श्वास सुरू ठेवा. मनात विचार करा, मला माझ्यातील सगळी नकारात्मकता सोडून द्यायची आहे. सगळी भीती, सगळी दडपणं, सगळा ताणतणाव, सगळा संताप, अपराधीपणाची भावना, भविष्याची चिंता मी प्रत्येक उच्छवासावाटे बाहेर फेकत आहे. माझ्यातील सर्व नकारात्मकता नष्ट होते आहे. प्रत्येक श्वासागणिक शांतता, सकारात्मकता, आंतरिक ताकद मला मिळत आहे. मी संपूर्णपणे शांत होत आहे, कणखर होत आहे. या स्वयंसूचनेने आपणास शांततेचा अनुभव येर्इल. मात्र यासाठी नियमीतता आवश्यक आहे. जर यात सातत्य नसेल तर बोलते व्हा. अशा व्यक्तीशी बोला, जी आपल्याला योग्य मार्ग दाखवू शकेल.

गेली 10 वर्षे अनेक रूग्णांनी ‘निरामय’कडे मन मोकळे केले आहे आणि सकारात्मकता घेऊन आज स्वतःच्या आयुष्यात यशस्वी झाले आहेत. आयुष्याला कंटाळलेली कला शाखेमध्ये शिकणारी एक विद्यार्थीनी जेव्हा निरामय वेलनेसमध्ये आली तेव्हा तिच्या डोळ्यात टोकाची निराशा आणि मनात निरनिराळ्या विचारांचा झंझावात होता. कुणीतरी बळजबरीने तिला निरामयमध्ये आणले होते. तिच्याकडे शब्दांच्या जागी केवळ अश्रु होते. जवळच्या व्यक्तिंच्या तिरस्कारामुळे निर्माण झालेली प्रचंड एकटेपणाची भावना, तिला जीवनाच्या शेवटचा टोकावर घेऊन आली होती. तिच्या मनावरचे ओझे निरामयच्या ऊर्जा उपचारांनी हलके झाले. ज्यामुळे नातेसंबंध सुधारले. पुढे तिने पदवी मिळवीली. तिचे लग्न झाले. आज ती एका बाळाची आई आहे.

एक उच्चशिक्षीत तरूण मुलगा शिक्षणानंतर परदेशी नोकरीसाठी गेला. काही महिन्यातच नोकरी सोडून भारतात परतला आणि त्यानंतर जगण्याची उमेदच हरवून बसला. तिथे नक्की काय घडले कुणालाच सांगितले नाही. त्याची आर्इ निरामय वेलनेसमध्ये हे दुःख घेऊन आली. निरामयच्या ऊर्जा उपचारांनी त्याच्यामध्ये शारीरिक व मानसिक बदल घडत गेले. तो मुलगा आज नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत आहे. हे आणि यासारखे अनेक जण निरामयच्या स्वयंपूर्ण उपचारांमुळे आज आनंदी आयुष्य जगत आहेत.

jase vichar 02 1

आत्महत्येसाठी प्रवृत्त करणारी ही नकारात्मकता येते कुठून?

बरेचदा भूतकाळातील काही घटनांमुळे, आपल्याला वर्तमानकाळ आनंदात घालवता येत नाही. सगळं काही असूनही उपभोगता येत नाही. आपल्याकडून कधीतरी काहीतरी चुकीचं घडलेलं असतं ज्याची बोच आपल्याला सतत असते किंवा काहीतरी करायचं राहून गेलेलं असतं ज्यामुळे आपण आयुष्यात मागे पडलेले असतो, ज्यासाठी आपण स्वतःला सतत दूषणं देत असतो. काहीजण आपल्याशी वाईट वागलेले असतात. आपली फसवणूक झालेली असते. अशा घटनांमुळे आपला सगळ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत जातो. प्रत्येकाकडे आपण त्याच चष्म्यातून पाहतो व सतत दुःखी होत राहतो. स्वतःबद्दलची चीड किंवा तिरस्कार, अपराधीपणाची भावना मनात घर करते. अपेक्षाभंग, अपयश, आर्थिक अडचणी, जबाबदाऱ्यांचे ओझे यातून अस्तित्वाविषयी शंका निर्माण होतात. स्वभाव अतिशय भावनाप्रधान किंवा संतापी होत जातो. आपण अबोल किंवा चिडचीडे होतो. मनात सतत चुकीचे विचार करत राहतो. हेच विचार आपल्यातील नकारात्मकता वाढवतात.

नकारात्मकता नष्ट कशी होते ?

आपला प्रत्येक विचार काही स्पंदने निर्माण करतो. ही स्पंदने म्हणजेच ऊर्जा मनोमय कोशामध्ये साठून रहाते. ‘स्वयंपूर्ण उपचार’ हे शरीर व मन दोन्हीचे ऊर्जा संतुलन करतात. नको असलेली अनावश्यक ऊर्जा जी विचार व आचारांनी आपण साठवून ठेवतो ती या उपचारांद्वा मुक्त केली जाते. जी आवश्यक ऊर्जा शरीरास कमी पडत असते ती शरीरास पुरविली जाते. हे उपचार फोनवरून घेता येतात. ज्यामुळे शरीरिक आरोग्य मिळते व मनही सकारात्मक होते. असाध्य आजारही बरे होतात.

ही ऊर्जा कशी असते? कुठे असते? शरीरावर व मनावर कसा प्रभाव पाडते? स्वयंपूर्ण उपचारांनी ती कशी नियंत्रीत होते? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आणि रूग्णांना आलेले अनुभव पहाण्यासाठी उद्या (शुक्रवार दि. ११ सप्टेंबर) साम टीव्हीवर दुपारी 4.30 वाजता जरून बघा ‘साम संजीवनी.’

निरामय वेलनेस सेंटर
संपर्क : 020-67475050
Email : niraamaywellness@gmail.com

Share this post

Facebook Comments: Please enter a valid URL
Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!