मधुमेहावरही होतात प्रभावी उपचार…

कार्यालयीन कामकाजात असो किंवा घरगुती जीवनात; आज प्रत्येकालाच ताणतणावाचा सामना करावा लागतो आहे. आणि हे करत असताना मनुष्यप्राणी आपल्या मनावरचा ताबा हळूहळू गमवू लागला आहे. परिणामी मधुमेह, उच्च रक्तदाबासारख्या आजारांनी मनुष्याला ग्रासले आहे.

अशा आजारांचे निदान होण्याचा वयोगटही आज तारुण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. या सगळ्याला आपण ‘लाईफ स्टाईल बदलल्याचे’ एक गोंडस कारण पुढे केले जाते आणि आजीवन गोळ्या-औषधांचा डोस सुरू होतो. या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी निरामयचे स्वयंपूर्ण ऊर्जा उपचार अत्यंत उपयुक्त ठरतात.

‘स्वयंपूर्ण’ म्हणजे प्रत्येकातील ‘स्वयं’ला पूर्णत्त्वाकडे नेण्याची प्रक्रिया… पूर्णत्त्व म्हणजे केवळ रोगमुक्ती नाही तर ती आहे आनंदाची अनुभूती. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा शरीर व मन दोन्हीही सशक्त व निरोगी असेल. या उपचारांच्या साहाय्याने स्वयंव्याधीनिवारण व स्वयंसुधारणांचा वेग वाढून व्याधीमुक्ती होते व मनाची सकारात्मकता वाढीस लागते. स्वयंपूर्ण उपचार ही औषधरहित संपूर्ण नैसर्गिक ऊर्जा उपचारपद्धती आहे.

‘निरामय’मध्ये आजपर्यंत 1 लाखांपेक्षाही अधिक रुग्णांनी या उपचारपद्धतीचा लाभ घेतलेला आहे. अगदी लहान दवाखान्यांपासून देशातील मोठ्या रुग्णालयात गेल्यावरही आजार बरा न झालेले अनेक पेशंट एक शेवटची आशा म्हणून ‘निरामय’मध्ये येतात व या उपचारपद्धतीचा त्यांच्या आजारामध्ये ‘संजीवनी’सारखा उपयोग होतो असा अनेकांचा अनुभव आहे.

प्राचीन शास्त्र, ग्रंथ संपदा, वेद आणि उपनिषदे यांचा अभ्यास व अनेक प्रयोगांअंती या स्वयंपूर्ण ऊर्जा उपचारपद्धतीचा विकास झाला आहे. याच्या उपयोगामुळे मनुष्याच्या शरीरातील चैतन्यशक्ती किंवा जीवनप्रवाह सुरळीत होऊन शरीर व मन क्रियाशील व निरोगी होण्यास मदत होते. संपूर्ण नैसर्गिक ऊर्जेच्या माध्यमातून रुग्णांना विनाऔषध रोगमुक्त करण्यासाठी या उपचारपद्धतीचा अविष्कार केला आहे.

याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पहा.

Share this post

Facebook Comments: Please enter a valid URL
Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!