मणक्याच्या असाध्य आजारांसाठी अस्तित्वात असलेली एकमेव स्वयंपूर्ण उपचार पध्दती !

माणूस हा सवयीने घडत असतो. सवयीचे रूपांतर पुढे संस्कारांमध्ये होते. संस्कारांचा चांगला-वाईट परिणाम त्या माणसावर होत असतो. अशाच चुकीच्या सवयींमुळे माणसाचे शरीर आजारी पडत असते. आणि त्यावरचा सर्वात रूजलेला संस्कार म्हणजे गाठा डॉक्टर आणि खा गोळी ! त्यामुळेच डॉक्टर आणि औषधांशिवाय आपण बरे होऊ शकतो, हे माणसाच्या पचनीच पडत नाही. बरं ! हे मॉडर्न मेडिकल सायन्स तरी परिपूर्ण आहे का? हे सायन्स संशोधनातून अनेक रोग शोधून काढतं. हे जरी खरं असलं तरी या रोगांवर आधुनिक वैद्यकशास्त्राकडे इलाज असेलच असंही नाही. त्यांनीच शोधून काढलेली लॉर्डोसिस, स्कोलिओसिस, अँकिलॉसिस ही काही नावं आहेत. पण यावर त्यांच्याकडे इलाज आहे का? अजून तरी नाही.

तर वर दिलेली नावे म्हणजे मणक्यांचे काही नवीन आजार आहेत. सायटिका हा त्यातलाच एक कॉमन आजार. ज्यामध्ये पाय खूप दुखतात. चालणं-उभं रहाणं अवघड होऊन जातं. पण त्याचा संबंध मणक्याशी असतो. आपल्या मानेपासून टाचेपर्यंत एक शीर गेलेली असते, जी मणक्यामध्ये विभागली जाते. आता काही कारणाने जर मणक्याला दणका बसला तर ही शीर आखडते आणि त्याचा त्रास पायाला भोगावा लागतो. यासाठी मॉडर्न सायन्सकडे अजूनही औषध नाही. बरं हा आजार जर टोकाचा वाढला तर पायाची उंचीही कमी होऊ शकते.

ह्यातला एकच प्रकार म्हणजे अँकिलॉसिस स्पॉन्डिलायसिस. ह्याला बांबू स्पाईन असंही म्हटलं जातं. ह्यामध्ये मणका अगदी बांबूसारखा ताठरतो. सगळ्या हालचाली एकदम बंद. पुढे हे दुखणे वाढले तर त्या रूग्णाला मान हलविण्यास सांगितले तर तो फक्त डोळे हलवू शकतो. आणि यात डॉक्टर एकच सल्ला देतात की… पाठीला जपा. कारण पाठीला जरा धक्का बसला तर मणका काडीसारखा मोडलाच म्हणून समजा. आता अशा रोगांवर मॉडर्न सायन्सने हात वर केलेत तर पेशंटनी काय करावं?

त्यासाठीच आम्ही म्हणतो की, तुमचा विश्‍वास असो वा नसो, निरामयमध्ये या. आम्ही तुमचा मणका ठीक करू. कसं? तर त्यासाठी आपल्या प्राचीन आरोग्यशास्त्रातील पंचतत्व व चक्रांचे कार्य, संतुलन याद्वारे आम्ही उपचार करतो. यातलं सगळं तुम्हांला ठाऊक असण्याची गरज नाही. तुमच्यात फरक पडला की नाही, एवढंच फक्त तुम्ही सांगा.

63 वर्षांच्या नेहा पेठे ह्या पूर्वी शिक्षिका होत्या. सतत उभे राहणार्‍यांना टाचा-पावले आणि गुडघेदुखीही होतेच होते. पेठे आजींचे दुखणे इतके वाढले की त्यांना जिने उतरणेही जमत नव्हते. पण शिक्षिकेचा पेशा असल्याने निरामयच्या लाँग डिस्टन्स ट्रीटमेंटवर विश्‍वास नाही. तरीही मिस्टरांच्या आग्रहामुळे कशाबशा निरामयमध्ये आल्या पण पटत नसल्यामुळे उपचार घेण्यात हलगर्जी दाखवू लागल्या. त्यामुळे एक महिना झाला तरी फरक पडेना. तेव्हां डॉ. चांदोरकरांनी त्यांना कडक भाषेत समजावून सांगितलं. त्यानंतर त्या सीरियसली उपचार घेऊ लागल्या. आणि काही दिवसातच त्यांना जाणवलं की, होय ! आपलं दुखणं कमी होतंय. आणि त्याबरोबर इतर आजारही दूर होऊ लागले. त्यांच्या व्हेरिकोज व्हेन्सच्या गाठी कमी होऊ लागल्या. त्यांना दम्याचा त्रास होता. दर पावसाळ्यात इंजेक्शन घ्यायची वेळ यायची. तो त्रासही काही न करता कमी झाला. ज्यांचा निरामयवर विश्‍वास नव्हता, त्या शिक्षिका आता डॉ. चांदोरकरांचा जयजयकार करतात. यातच सगळं आलं.

म्हणून तर आम्ही सांगतो, अनुभव घ्या. डॉक्टरांवर विश्‍वास ठेवताच ना. मग ह्या उपचारांवरही विश्‍वास ठेवून तर बघा. बरं, ह्यात औषधं नाही, इंजेक्शनं नाहीत म्हणजे कुठले साईड इफेक्ट्सही नाहीत. फक्त पॉझिटिव्हीटी ठेवा. कारण आम्ही उर्जा देतोय, ती तुम्ही ग्रहण करणंही तितकंच महत्वाचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, मॉडर्न सायन्समध्ये एका रोगासाठी एक किंवा अनेक औषधे. पण ते दुसर्‍या रोगाला नाही. या उलट निरामयमध्ये. जे मुख्य आजारांवर उपचार करून घेण्यासाठी त्यांचे इतर आजारही बरे होतात. आता हे कसे घडते? तर शरीराचे, मनाचे आणि उर्जा शरीराचे एकमेकांशी असलेले लागेबांधे. घरात एखादं माणूस आजारी असेल तर संपूर्ण घर आजार नाही पडत का? तसंच हे, पंचतत्वं, चक्र आणि अवयवांचे नेटवर्क आहे. याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तेही आम्ही तुम्हांला व्यवस्थित स्पष्टपणे सांगू.

फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, एक वेळ तुमचं मॉडर्न सायन्स उपचाराला ‘नाही’ म्हणेल पण निरामयमध्ये कोणताही असाध्य आजार घेऊन या, आम्ही तो दूर करून दाखवू. कारण विज्ञान जिथं पोहचलेलं नाही, तिथे आपलं प्राचीन आरोग्यशास्त्र अजूनही कार्यरत आहे.

सायटिका विषयी जाणून घेण्यासाठी ही मुलाखत अवश्य पाहा.

Share this post

Facebook Comments: Please enter a valid URL
Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!