’फेल’ झालेली किडनी देखील स्वयंपूर्ण उपचारांनी कार्यक्षम होऊ शकते.

मुळात आपली किडनी कधी ‘फेल’ होऊच शकत नाही. आपलं मॉडर्न सायन्स जरी असं मानत असलं तरी ते खरं नाही. कारण आपल्या प्राचीन आरोग्यशास्त्रात स्पष्ट सांगितलं की, शरीराला जो अवयव नको असतो तो भाग शरीर स्वतःहूनच काढून टाकतं. म्हणजे बघा, मधुमेहींमध्ये जेव्हां पायाला जखम होऊन ती चिघळते आणि रक्त साकळत जातं, तेव्हां शेवटी तो पाय किंवा पायाचा भाग कापून काढावा लागतो. कारण शरीराला ते नकोय. पण किडनीच्या बाबतीत तसं अजिबात नाही.

आता ही किडनी करते तरी काय? तर शरीरातील रक्ताची, जलाची पातळी योग्य राखणं आणि शरीरातील विषद्रव्य मूत्राद्वारे शरीराबाहेर फेकणं हे किडनीचं मुख्य कार्य. आता आपण उगीच कोणाचे ऐकून खूप पाणी प्यायला लागलो तर ह्या किडनीवरचा लोड हा वाढत जातो. कारण पाणी शरीराला खूप कमी लागतं आणि ते पचायलाही जड असतं. त्यामुळे जेव्हां आपण घटाघटा पाणी पितो तेव्हां शरीर त्याच्याकडे अन्न म्हणून बघतं आणि ते पचविण्यासाठी त्यामध्ये अनेक रसायनं घालू लागतं आणि शेवटी ते काही पचत नाही तेव्हा किडनीकडे पाठवून देतं. आता किडनीवरचा कार्यभार वाढला की तिची कार्यक्षमता कमी होते. काही वेळा त्यामध्ये इतके अडथळे निर्माण होऊ लागतात तिचं काम करणं जवळपास बंद होतं. अशावेळी तुम्ही रिपोर्ट काढला तर क्रिएटीनाईन लेव्हल ही बरीच वाढलेली दिसते. तसेच पाणी पिऊन त्वचा उजळते असा एक गैरसमज विशेषतः तरूणींमध्ये दिसतो. पण त्यात तथ्य नाही. उलट आपण किडनीवरचा भार वाढवतोय हे लक्षात घ्यायला हवं.

आता किडनीची कार्यक्षमता कमी झाली की, शरीरातलं पाण्याचं प्रमाण वाढू लागतं. मग मॉडर्न सायन्स काय म्हणतं, करा डायलेसिस. म्हणजेच जे काम आधी स्वतःहून शरीर करत होतं, ते आता डायलेसिसच्या मशीनद्वारे केलं जाऊ लागतं. बरं, मशीन ते मशीन, ते पाणी काढतं हे खरं. पण त्या नादात शरीराला आवश्यक ते पाणीही देखील बाहेर काढून टाकलं जातं. तुम्ही डायलेसिसच्या रूग्णांची त्वचा बघा. ती काळवंडलेली दिसते याचं कारणच मुळात हे आहे की, आवश्यक तेवढं पाणी देखील शरीरात नाही. पण आपलं प्राचीन आरोग्यशास्त्र इतकं महान आहे की, ते ह्या किडनीमधले सगळे अडथळे दूर करतं. यावर आधारित स्वयंपूर्ण उपचारांनी आम्ही तुमच्या किडनीला पुन्हा पूर्ण कार्यरत करू शकतो. शरीरातील पंचतत्वांचं संतुलन साधून सर्व चक्रांना व्यवस्थित ऊर्जा मिळाली की कोणताही अवयव हा पुन्हा काम करण्यासाठी सज्ज होतो. किडनी देखील त्याला अपवाद नाही.

विषय किडनीचा आहे तर थोडं मूत्राविषयीही जाणून घेऊयात. जर आपल्याला शुभ्र पांढरी लघवी होत असेल तर आपल्या शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी आहे असं समजावं. लघवी होते एवढ्यासाठीच की शरीरातील विषद्रव्ये जलावाटे बाहेर टाकली जावीत. त्यामुळे कोणत्याही वेळची लघवी ही किंचत पिवळसर असायलाच हवी. झोपेतून उठल्यावरची पहिली लघवी पाहा, ती पिवळ्या रंगाची दिसेल. कारण रात्रभर आपलं शरीर साफसफाई आणि दिवसभरात झालेली झीज भरून काढण्याचं काम करत असतं. त्यामुळेच पिवळा रंग हे किडनी चांगली असल्याचं लक्षण असल्याचं समजायला हरकत नाही. आता काही वेळा किडनी प्रत्यारोपण केली जाते. आता शरीरासाठी हा बाहेरचा अवयव असतो, त्यामुळे सुरूवातीला शरीर ह्या ‘पाहुण्याला’ स्वीकारत नाही. अशावेळी देखील स्वयंपूर्ण उपचार घेतले तर हे स्वीकारणं सोपं होण्याची शक्यता जास्त वाढते.

खरं सांगायचं तर आपलं शरीरच स्वतःला बरं करत असतं. आपण औषधांचा मारा करून त्यात बिघाड आणतो. हे पटायला कठीण असलं तरी सत्य आहे. आपल्या शरीराला जे हवं असतं ते शरीर आपल्याकडून मागून घेत असतं. भूक लागणे, तहान लागणे, आळस येणे या शरीराच्या मागण्या आहेत, त्या आपण पूर्ण करायलाच हव्यात. पण कामाच्या नादात आपण त्याकडे दुर्लक्ष केलं तर आजाराच्या रूपाने शरीर आपलं सगळं लक्ष त्याकडे वेधून घेणार हे मात्र नक्की !
भांडूपच्या कविता शिंदेंची क्रिएटीनाईन लेव्हल 2.4 इतकी वाढली. त्यावर त्यांनी 2 लाख रूपये खर्च केले, 20 हजारांची औषधं घेतली. त्यात डोळ्यांना इतका त्रास की उजेड अजिबात सहन व्हायचा नाही. साम टिव्हीवरचा निरामयचा कार्यक्रम पाहून त्या ‘विना औषध, विना स्पर्श’ उपचार घेण्यासाठी आल्या. दिवसातून 3 वेळा उपचार सुरू केले. हळूहळू डोळ्यांचं दुखणं कमी होऊन डोळ्यांचं औषध बंद झालं. हिमोग्लोबिन वाढत जाऊन त्याचंही महागडं इंजेक्शन बंद झालं. हळूहळू किडनी लेव्हल 1.7 वर आली आणि आता रिपोर्ट काढले तर ती आणखी कमी असेल असं कविता शिंदेंना पक्कं ठाऊक आहे. त्यामुळे त्या इतक्या आनंदी आहेत की विचारू नका.

आता हे सगळं कसं घडतं? तर शरीर स्वतःला बरं करतं. त्यासाठी लागणारी मदत आम्ही स्वयंपूर्ण उपचारांद्वारे करतो. जाता जाता एक सल्ला आवर्जून द्यावासा वाटतो की, एखाद्या डॉक्टरांनी ऑपरेशन सुचविल्यास इतर दोन-चार डॉक्टरांचीही मते घ्या. एखाद्याच्या चुकीमुळे तुम्हांला आयुष्यभराची शिक्षा मिळणं योग्य नाही.

किडनी विकार व समस्या जाणवणार्‍यांनी हा व्हिडीओ आवर्जून पाहावा.

Share this post

Facebook Comments: Please enter a valid URL
Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!