पंचतत्त्व संतुलनातून आरोग्य

बहुतांशी रोगाचे मूळ कारण मनातील अयोग्य विचार हेच असते. जोपर्यंत मन:शुद्धी होत नाही, तोपर्यंत शरीराला जडलेला आजार समूळ नष्ट होत नाही. मन व शरीर परस्पर क्रिया व प्रतिक्रिया करत असतात, हे सर्वमान्य तथ्य आहे. मानसिक व्याधींमुळे शारीरिक रोग उत्पन्न होतात, तसेच याउलटही होते.

शारीरिक दुखणी ही शरीराच्या कमकुवतपणामुळे असतातच, पण काही वेळा साठवून ठेवलेल्या निरनिराळ्या भावना किंवा आघात आपल्या शरीरातील वेगवेगळ्या अवयवांवर प्रभाव पाडतात, ज्यामुळे ते अवयव कमकुवत होऊ शकतात. उदा. खूप काळ मनाचा कोंडमारा होत असेल, तर श्‍वसनाचे आजार उद्भवू शकतात.

बुद्धीने आणि मनाने साठविलेले सर्व विचार, तसेच उच्चार काही स्पंदने निर्माण करतात. ही स्पंदने म्हणजेच ऊर्जा आपल्या ऑरामध्ये साठून रहाते. ऊर्जा ही पाच तत्त्वांची असते, जी शरीरावर प्रभाव पाडते. साठून राहिलेल्या या अनावश्‍यक ऊर्जेमुळे शरीराला आवश्‍यक ऊर्जा कमी पडते. ज्यामुळे शरीर अशक्त होत जाते.

उदा. राग म्हणजे अग्नि तत्त्व. राग शरीरातील पित्त वाढवतो. भीती म्हणजे वायू तत्त्व, भीती पोटात गोळा निर्माण करते, पचन बिघडवते.

स्वयंपूर्ण उपचारांद्वारे अतिरिक्त ऊर्जा मुक्त केली जाते व कमी असणारी ऊर्जा पुरविली जाते. ज्यामुळे मनाचा उद्वेगही हळूहळू कमी होत जातो व शारीरिक दुखणीही नष्ट होत जातात.

उदा. सांध्यात वात अडकला असेल तर, तेथील अतिरिक्त वायू तत्त्व मुक्त केल्यामुळे संधीवाताचा त्रास कमी होतो, मनातील भीती कमी होते. वंगण कमी होऊन सांध्यांची झीज होत असल्यास, जल तत्त्व पुरविल्यामुळे वंगण वाढते. तर, पृथ्वी तत्त्व पुरविल्यामुळे झालेली झीज भरून येते, तसेच निर्णयक्षमता वाढते.

स्वयंपूर्ण उपचारांची अजून एक खास बात म्हणजे, हे उपचार विनास्पर्श असल्यामुळे कोणत्याही संसर्गाची भीती नाही. तसेच कोणतेही औषध नाही. केवळ एक फोन कॉल करून, सकारात्मक विचार आणि 5 ते 10 मिनीटे ऊर्जा स्विकारासाठी डोळे मिटून शांत बसणे. बस्स! एवढेच करायचे आहे. निरामयचे उपचारक आपल्या शरीरातील ऊर्जा संतुलित करतात. ज्यामुळे शरीरातील ऊर्जा प्रवाह सुरळीत होऊन आजार नाहीसे होतात. आपण कोणत्याही आजारातून मुक्त होऊ शकता.

विश्वात अशा अनेक उपाय-योजना आहेत, ज्या आपल्याला निरोगी, आनंदी करू शकतात. ‘स्वयंपूर्ण उपचार’ ही त्यापैकी एक. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पहा.

Share this post

Facebook Comments: Please enter a valid URL
Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!