आई होण्यातले अडथळे दूर करणारी स्वयंपूर्ण उपचार पध्दती!

पूर्वी सहजपणे संतती होत असे. पण कालांतराने यामध्ये ‘हम दो-हमारे दो’ असं होत होत आता ‘एकच पुरे’ हा ट्रेंड आलेला आहे. बरं, हे एक मूल होणंही आता तितकं सोपं राहिलेलं दिसत नाही. तुम्ही वर्तमानपत्र चाळून बघा. संतती प्राप्ती केंद्र म्हणजेच आयव्हीएफ सेंटर्सच्या पानभर जाहिराती तुम्हांला सहजपणे आढळतील. ह्या केंद्रात जाणार्‍या तरूण जोडप्यांची संख्याही लक्षणीय दिसते.त्यातही महिलांच्या विशेष समस्या जास्त प्रमाणात आढळतात. जसे मासिक पाळीतील अनियमितता, पीसीओडी किंवा फायब्रॉईड्स सारखे आजार, छातीमधील गाठी आणि अशी अनेक कारणे, ज्यामुळे मूल होण्यामध्ये वेगवेगळे अडथळे निर्माण झालेले दिसतात. तसेच थोडे फार शुक्राणू संख्या कमी किंवा कमकुवत असल्याची लक्षणे पुरूषांमध्ये दिसतात.

मुळात या प्रजनन समस्येचं मूळ पाहिला गेलं तर ते आपल्या आहारामध्ये आहे. कारण आपण जे अन्न खातो त्यापासून रक्त,मांस, मेद याबरोबरच सप्तधातूंची निर्मिती होत असते. सप्तधातूंमधला शेवटचा धातू म्हणजे पुरूषांमधला शुक्राणू आणि स्त्रियांमधला रज. आता आपण काय खातो तर रसायनांपासून तयार करण्यात आलेले अन्न, त्यापेक्षाही जास्त म्हणजे फास्टफूड्स. असा आहार आपले भूक भागवतो पण शरीराचे पोषण करूच शकत नाही. त्यामुळेच शुक्राणू किंवा रज हे शक्तीशाली बनू शकत नाही. त्यामुळेच संततीसाठी प्रयत्न करणार्‍या जोडप्यांनी पोषक आहारासोबतच दूध आणि तूप ह्या दोन महत्वपूर्ण घटकांचे सेवन करावे असा सल्ला आयुर्वेदातही दिलेला आहे.

निरामय सेंटरमध्ये अनेक प्रकारची आणि वेगवेगळ्या वयोगटातील जोडपी येतात. काहीवेळा समस्या गर्भधारणेची असते तर काही वेळा गर्भधारणा झाल्यानंतरची गुंतागुंत असते आणि डॉक्टरांनी थेट गर्भपाताचाच सल्ला दिलेला असतो. ह्या सर्व समस्यांवर आम्ही स्वयंपूर्ण उपचार पध्दतीने सर्वांगीण उपचार करतो. प्रजनन संस्थेचे मूळ असणारे स्वाधिष्ठान चक्र, तिथे असणारी जल-अग्नी व पृथ्वी तत्वं यांच्यामधील दोष दूर करून संतुलन साधतो. त्यामुळेच 20 ते 22 वयोगटापासून ते 40 वर्षांपर्यंतच्या अनेक महिलांना आम्ही ‘आई’ होण्यातला आनंद मिळवून दिलेला आहे, हे इथं समाधानानं सांगावंसं वाटतं.

वयात येणार्‍या किंवा पौंगडावस्थेतील मुलामुलींकडे लक्ष देणं महत्वाचं असतं. कारण या वयात शरीरातील हार्मोन्समध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत असतात. अशावेळी या मुलामुलींंवर उपचार करताना आम्ही पालकांचेही समुपदेशन करतो. या तरूणांच्या समस्या सोडविताना पालकांनाही शांत रहाण्यासाठी मार्गदर्शन करतो. या वयातील अनेक मुलींना पाळी आलेलीच नसते किंवा रक्तस्त्राव जास्त होत असतो. पीसीओडी-फायब्रॉईड्स सारख्या समस्यांवर आधुनिक वैद्यक शास्त्रातही ऑपरेशन हा तात्पुरता उपाय आहे. पण स्वयंपूर्ण उपचार पध्दती ह्या सर्व आजारांच्या मुळाशी जाऊन मुळापासून ते दोष दूर करते.

एका प्रख्यात हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या प्रगती लेलेंच्या गर्भाशयात एक मोठी गाठ आली. पाळी अनियमित येऊ लागली. पोटदुखी सुरू झाली. त्यावर दुसरी सोनोग्राफी करेपर्यंत ती आणखी मोठी झाली. मग त्यांनी ऑपरेशन करण्याचं ठरवलं देखील. पण त्याआधी निरामयचे उपचार घेऊन पाहू, असं त्यांच्या मनात आलं आणि त्यांनी ऑपरेशन पुढे ढकललं व स्वयंपूर्ण उपचारांसाठी निरामयमध्ये त्या आल्या. तुम्हांला आश्‍चर्य वाटेल, पण एका महिन्यात त्यांची गाठ पूर्णपणे गेली आणि हे जेव्हा सोनोग्राफीत स्पष्ट झालं तेव्हां डॉक्टरही चकित झाले. निरामयमध्ये अशी समस्या इतक्या कमी वेळात आणि वेगात घडली, ती केवळ स्वयंपूर्ण उपचार पध्दतीमुळेच !

स्त्रिया आणि हॉर्मोन्स यांचं नातं इतकं अतूट आहे की, स्त्रियांमधील बहुतेक आजार ह्या हार्मोन्सच्या असंतुलनामुळेच होत असतात. लठ्ठपणा देखील यामुळेच येतो. तसेच चेहर्‍यावर लव येणे, अंगावर केस वाढणे, डोक्यावरील केस गळणे अशा विविध समस्यांवर आम्ही स्वयंपूर्ण उपचार पध्दतीद्वारे यशस्वीपणे उपचार केलेले आहेत.

स्त्रियांच्या छातीत येणारी गाठ ही तशी कॉमन समस्या पण तितकीच ब्रेस्ट कॅन्सरची भीती वाढविणारी. फलटणच्या एका महिला पेशंटचा असाच फोन आला की त्यांच्या छातीत लिंबाएवढी गाठ झालेली आहे. डॉक्टरांच्या पुढच्या टेस्ट होण्याआधीच त्या बाईंनी स्वयंपूर्ण उपचार घेतले आणि रिपोर्ट यायच्या आत 3 दिवसात गाठ अचानक गायब झाली. डॉक्टरांनाही चमत्कार वाटला अशी ही घटना. पण हा चमत्कार नसून आपल्या प्राचीन आरोग्यशास्त्राचा अभ्यास आहे. त्यासाठी फक्त विश्‍वास, संयम आणि सातत्याने तुम्ही स्वयंपूर्ण उपचार घेणं गरजेचं आहे. प्रजनन संस्था हा विषय मोठा असल्याने त्यावर आणखी चर्चा होईलच.

प्रजनन समस्यांबाबत मार्गदर्शन करणारा हा महत्वपूर्ण व्हिडीओ आवर्जून पाहा.

Share this post

Facebook Comments: Please enter a valid URL
Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!