आजार तेव्हाच निर्माण होतो, जेव्हा आपण निसर्गाच्या विपरीत वागतो. निसर्ग निर्माण होतो पाच तत्त्वांपासून. शून्य ऊर्जा, पवन ऊर्जा, सूर्य ऊर्जा, आप ऊर्जा, भू ऊर्जा. संपूर्ण चराचर हे पंचऊर्जांची फलश्रुती आहे. यत्र तत्र सर्वत्र ऊर्जा आहे. ऊर्जा निर्माण होत नाही आणि नष्टही होत नाही. ऊर्जा केवळ परीवर्तीत होते.
ऊर्जा केवळ शरीरालाच नाही तर मनालाही प्रभावित करत असते. मनाचा प्रभाव शरीरावर होतो आणि शरीराचा प्रभावही मनावर होत असतो. उदा. राग आला की शरीरातील अग्नि ऊर्जा वाढते. ज्याच्या परिणामस्वरूप शरीरातील पित्त वाढते. ऊर्जादेहातील वाढलेली अग्नि ऊर्जा जर मुक्त केली गेली तर मनातील रागही नष्ट होतो आणि शरीरातील वाढलेले पित्तही.
स्वयंपूर्ण ऊर्जा उपचार शरीरातील पाच ऊर्जांचे संतुलन साधण्याचे कार्य करतात. ज्याचा परिणाम शरीर व मन दोहोंवर होतो. आईच्या पोटात वाढणाऱ्या गर्भापासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत कुणीही या उपचारांचा लाभ घेऊ शकते.
समृद्धी शहा यांना गर्भधारणेनंतर गर्भवाढीमध्ये काही अडचणी दिसून आल्या आणि स्वयंपूर्ण उपचारांनी त्याचे निराकरणही झाले. 83 वर्षांच्या श्रीमती लक्ष्मीबाई जोशी यांना 40 वर्षांपासून दोन्ही गुडघ्यांमध्ये अनेक अस्थिभंग तसेच झीज होती, पायात बाक आलेला होता. प्रचंड पायदुखी त्यांना सहन करावी लागत होती. घसरून पडल्यामुळे त्या पूर्णपणे अंथरूणाला खिळल्या होत्या. प्रत्यक्ष न येता केवळ फोटोवरून दूरस्थ स्वयंपूर्ण उपचार घेऊन त्या बऱ्या झाल्या.
सर्व प्रकारचे उपाय करून थकलेले अनेक रूग्ण एक शेवटची आशा म्हणून ‘निरामय’मध्ये येतात आणि स्वयंपूर्ण ऊर्जा उपचारांचा त्यांच्या आजारामध्ये ‘संजीवनी’सारखा उपयोग होतो असा अनेकांचा अनुभव आहे.
याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील विडिओ पहा.