योगशास्त्र : सप्तचक्रे

“युज” या संस्कृत शब्दापासून “योग” हा शब्द तयार झाला आहे. युज म्हणजे एकत्रीकरण. योगशास्त्रामध्ये शरीर आणि मनाचा योग्य संयोग साधण्यासाठी प्राण किंवा ऊर्जेचा अवलंब केला जातो. शरीर व मनाचे संतुलन साधण्यासाठी सात योगिक चक्रं अखंड कार्यरत असतात. ज्याप्रमाणे भौतिक देहात अवयव असतात, त्याचप्रमाणे ऊर्जा देहात चक्रे असतात. कमरेपासून डोक्यापर्यंत मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा व सहस्रार अशी सात चक्रं स्थित आहेत. या चक्रांवर शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती अवलंबून असते. शारीरिक व मानसिक क्रियांसाठी ऊर्जा पुरविण्याचे कार्य ही ऊर्जाकेंद्रे (चक्रं) अविरत करत असतात.
इडा, पिंड़्गला आणि सुषुम्ना या मुख्य नाड्यांनी ही चक्रं एकमेकांशी जोडलेली असतात. वातावरणातून प्राणशक्ती घेणे, आत्मसात करणे आणि स्थूल व सूक्ष्म देहास पुरविण्याचे कार्य ही चक्रं करतात. मानवी शरीरातील अंतस्रावी ग्रंथींच्या स्थानी ऊर्जाचक्रांची योजना निसर्गतः केलेली दिसून येते. चक्रांमध्ये निर्माण झालेला दोष शरीर व मनावर परिणाम करतो. सप्तचक्रं संतुलनातून सर्वसमावेशक आरोग्य प्राप्त करता येते.
सप्तचक्रे

मूलाधार चक्र
मूलाधार चक्र मेरुदंडाच्या तळाशी असते. याचा रंग लाल आहे...

स्वाधिष्ठान चक्र
स्वाधिष्ठान चक्र लिंगस्थानाजवळ असते. याचा रंग नारिंगी आहे...

मणिपूर चक्र
मणिपूर चक्र नाभी/बेंबीवर असते. याचा रंग नारिंगी पिवळा आहे...

अनाहत चक्र
अनाहत चक्र छातीच्या मध्यभागी म्हणजेच हृदयाजवळ असते...

विशुद्ध चक्र
विशुद्ध चक्र कंठस्थानी असते. याचा रंग निळा आहे....

आज्ञा चक्र
आज्ञा चक्र भ्रूमध्य म्हणजेच दोन्ही भुवयांच्या मध्ये असते...

सहस्रार चक्र
सहस्रार चक्र ब्रह्मरंध्र म्हणजेच टाळूवर असते.हे प्राणशक्तीचे...
स्वयंपूर्ण उपचारांमध्ये पंचतत्त्व संतुलनासाठी खालील शास्त्रांचा अतंर्भाव केला आहे

अध्यात्मशास्त्र
अध्यात्म म्हणजे 'आद्य + आत्मन्' म्हणजे 'आत्म्याच्या मुळापर्यंत जाणे' किंवा आत्मज्ञान (अनंताचे ज्ञान)...

निसर्गशास्त्र : पंचतत्त्व
संपूर्ण निसर्ग पंचतत्त्वांपासून बनलेला आहे. तत्त्व म्हणजे नियम. निसर्गाच्या उत्पत्तीस, जडणघडणीस आणि...

योगशास्त्र : सप्तचक्रे
मानवी देहातील सात योगिक चक्रांच्या अस्तित्वाबद्दल योगशास्त्रात सांगितले आहे. ज्याप्रमाणे भौतिक देहात....

मुद्राशास्त्र
मुद्रा हा शब्द संस्कृत धातु ‘मुद्’ म्हणजेच ‘आनंदित होणे’ यापासून तयार झाला आहे. ‘शारदातिलक’ या ग्रंथात...

मनोविज्ञान
आपले विचार व उच्चार कंपनस्वरूप ‘अक्षर’ राहतात. आपल्याशी संबंधित कुणीही केलेल्या तत्सम विचार...

अक्षरब्रह्म
क्षर म्हणजे नाशवंत आणि ज्याला क्षर नाही ते ‘अक्षर’. अक्षर म्हणजे अविनाशी, शाश्वत, अक्षय तत्त्व. विचारांचे...