मुद्राशास्त्र
मुद्रा हा शब्द संस्कृत धातु ‘मुद्’ म्हणजेच ‘आनंदित होणे’ यापासून तयार झाला आहे. ‘शारदातिलक’ या ग्रंथात ‘मुदमानन्दं ददाति इति मुद्रा’ असा उल्लेख आहे. आनंद देणारी कृती म्हणजे ‘मुद्रा’. केवळ शारीरिक आणि मानसिक नव्हे, तर आत्मानंद, परमानंद इथे अभिप्रेत आहे. घेरंडसंहिता तसेच हठप्रदीपिका या ग्रंथांमध्ये मुद्रांचे योगशास्त्रीय दृष्टिकोनातून विस्तृत वर्णन केले आहे. मुद्रा ही केवळ कृती किंवा सिद्धता नसून, हा साधनेचा विषय आहे. यासाठी गुरूचे प्रत्यक्ष मार्गदर्शन व प्रशिक्षण आवश्यक आहे.
योगशास्त्राच्या दृष्टिकोनातून हस्तमुद्रा ह्या पंचतत्त्वांचे नियमन करणाऱ्या मुद्रा म्हणून ओळखल्या जातात. संपूर्ण निसर्ग पंचतत्त्वांनी (जल, अग्नी, वायू, आकाश व पृथ्वी) युक्त असून मानवी देहदेखील त्याच पंचतत्त्वांपासून बनलेला आहे. आपल्या हाताची पाचही बोटे त्या पाच तत्त्वांचे प्रतिनिधित्व करतात. अंगठा अग्नितत्त्वाचे, तर्जनी वायुतत्त्वाचे, मध्यमा आकाशतत्त्वाचे, अनामिका पृथ्वीतत्त्वाचे, तर कनिष्ठिका जलतत्त्वाचे प्रतिनिधित्व करते. हस्तमुद्रांच्या साधनेमुळे त्या त्या तत्त्वांशी निगडित असलेले शरीरांतर्गत अवयव व ग्रंथी कार्यान्वित होतात.
शरीरशास्त्राच्या दृष्टीने हाताची बोटे असंख्य संवेदनांचे ग्रहण करून त्या संवेदना मज्जासंस्थेच्या मोठ्या भागाकडे पोहोचविणाऱ्या अनेक मज्जातंतूंनी युक्त असतात. मुद्रांच्या साहाय्याने इंद्रियाचे वा अवयवाचे कार्य नियंत्रित करून आरोग्य प्राप्त करता येऊ शकते. कोणत्याही एका तत्त्वाचे दुसऱ्या तत्त्वात परिवर्तन करून, वाढलेले तत्त्व कमी करणे तसेच कमी असणाऱ्या तत्त्वाची निर्मिती करणे ‘मुद्रेमुळे’ संभवते. यातून पंचतत्त्वांचे संतुलन साधते. मुद्रांचे परिणाम सूक्ष्म तंतूंवर होत असल्याने मुद्रा करताना शरीर सैल सोडणे गरजेचे असते.
मुद्राशास्त्र
ज्ञान मुद्रा
तर्जनी आणि अंगठा या दोन्हींची अग्रे किंचित दाब देऊन जुळवावी आणि बाकीची बोटे सरळ ठेवावीत. अंगठा अग्नतित्वाचे तर तर्जनी वायुतत्त्वाचे प्रतनिधित्वि करते. अंगठा बुद्धीचे केंद्र मानले
जाते आणि तर्जनी मनाचे. या मुद्रेमुळे मनशांती लाभते. मज्जासंस्थेवर उत्तम परिणाम होतो. ताण
नष्ट होतो, राग शांत होतो. आनंदाची भावना नर्मिाण होते. स्मरणशक्ती सुधारते, एकाग्रता वाढते. नसा बळकट होतात. कंपवात, चेहऱ्याचा पक्षाघात, अर्धांगवायूसारख्या विकारांमध्ये चांगला फायदा होतो. मन, भावनांवर नियंत्रण येते. अंतःस्रावी ग्रंथीची संपूर्ण रचना नियंत्रित होते. पिट्यूटरी
ग्रंथी, थायरॉईड ग्रंथी सक्षम होतात. मानसिक मरगळ, विस्मरण, अस्वस्थता, भीती, न्यूनगंड आणि नैराश्यासारख्या मानसिक आजारांमध्ये ही मुद्रा हितकर ठरते. शांत झोपेसाठी या मुद्रेचा फायदा होतो.
आकाश मुद्रा
मधलं बाेट म्हणजे मध्यमा व अंगठा यांचा अग्रभाग जुळवावा व थाेडा दाब द्यावा. बाकी सर्व बाेटे सरळ ठेवावीत. मध्यमा आकाशतत्त्वाचे प्रतीक असल्याने शरीरातील आकाशतत्त्वाच्या असंतुलनामुळे हाेणारे राेग म्हणजे शरीर पाेकळीतील भागांच्या आजारांवर या मुद्रेने परिणाम हाेताे. ही मुद्रा ध्यानात मदत करते. भावना आणि विचार शुद्ध करते. अर्धशिशी किंवा कवटीच्या पाेकळीमधील वेदना या मुद्रेमुळे दूर हाेतात. शरीरातील आकुंचन-प्रसरण आणि अभिसरण सुरळीत हाेते. श्वसनदाेष, रक्तदोष दूर होऊन त्यांचे वहन व्यवस्थित होते. स्यानु व हाडांमध्ये योग्य तन्यता येते. हृदयाच्या ठाेक्यांचे नियमन हाेतात, तसेच उच्च रक्तदाब नियंत्रित हाेताे. (हृदय प्रसरण पावलेल्या व्यक्तींनी मात्र ही मुद्रा करू नये.)
पृथ्वी मुद्रा
अनामिका आणि अंगठा याची टाेके जुळवून किंचित दाब द्यावा. बाकीची बाेटे सहज सरळ ठेवावीत. अंगठा अग्नितत्त्वाचे तर अनामिका पृथ्वी तत्त्वाचे प्रतिनिधित्व करते. पृथ्वीतत्त्वाचे अस्तित्व मुख्यत्वे हाडे, स्नायू, कूर्चा, त्वचा, चरबी इ.मध्ये असते. पृथ्वी मुद्रेमुळे शरीरास बळकटी मिळते. ही मुद्रा शरीरातील पृथ्वीतत्त्व आणि अग्नितत्त्व संतुलित करते. जीवनशक्ती वाढवणारी मुद्रा. अशक्तपणा, थकवा दूर करते. अर्धांगवातासारख्या आजारांमध्ये कमजाेर झालेल्या अवयवास पुन्हा ताकद देते. हाडांचा ठिसूळपणा, स्नायूंचा कमकुवतपणा , नसांची कमजोरी दुर हाेण्यास मदत हाेते. हाड माेडल्यास हाडांची जुळणी लवकर हाेते. जखमा भरून येण्यास
फायदेशीर . वजन वाढते. सहनशक्ती वाढते. त्वचा निराेगी आणि कांतिमान हाेते. केस गळणे, अकाली केस पिकणे या साठीही उपयुक्त ठरते.
जल मुद्रा
करंगळी व अंगठा यांची टाेके जुळवून बाकीची तीन बाेटे सहज सरळ ठेवावीत. कनिष्ठिका जलतत्त्वाचे प्रतीक आहे. त्यामुळे शरीरातील मलद्रव्य बाहेर टाकण्याच्या क्रियेसंबंधित इंद्रिये व्यवस्थित कार्यरत हाेऊन मलनिस्सारण चांगले हाेते. काेरडी त्वचा, भेगा, भाजणे तसेच काेणतेही त्वचाविकार बरे हाेतात. पित्त कमी हाेते, ताेंडाची गेलेली चव परत येते. मूत्र विसर्जन व्यवस्थित हाेते. वंगण कमी झाल्यामुळे निर्माण झालेल्या दाेषात उपयुक्त ठरते. रक्तशुद्धीसाठी फायदेशीर आहे. डाेळे काेरडे पडणे, काेरडा खाेकला, पचनमार्ग शुष्क हाेणे, ताेंडाला काेरड पडणे या त्रासांवर गुणकारी ठरते. मासिक पाळीत कमी रक्तस्रावात सुधारणा हाेते. भावनिक काेरडेपणा कमी करते. त्वचा मऊ व मुलायम हाेते.
वायू मुद्रा
अंगठ्याच्या तळाला तर्जनीचे टाेक ठेवावे आणि तर्जनीवर अंगठा हलकेच टेकवावा. बाकीची बाेटे सरळ ठेवावीत. शरीरारात वायू वाढला असता ही मुद्रा हितकारी ठरते. शरीरातील वात जेव्हा एकाच भागात अडकताे, तेव्हा तिथे तीव्र वेदना हाेतात, क्रॅम्प येतात. अडकलेला वायू रक्ताभिसरणात अडथळे निर्माण करताे. त्यामुळे बधिरपणा किंवा मुंग्या जाणवतात. या मुद्रेमुळे शरीरातील अतिरिक्त वायुतत्त्वाचे उत्सर्जन हाेते. रक्ताभिसरण सुरळीत हाेऊन वेदना शमतात. कंपवात, अर्धांगवायू, स्पाॅन्डिलिसिस, पाठ आणि पायातील वेदना आणि सांधेदुखीसारख्या वायुदाेषांवर, तसेच मनाची अस्वस्थता, चंचलता अशा मानसिक त्रासांवर या मुद्रेच्या सरावाने मात करता येते.
शून्य मुद्रा
अंगठ्याच्या तळाशी मध्यमेचे टाेक टेकवावे आणि मध्यमेवर अंगठा हलकेच टेकवावा. बाकी सर्व बाेटे सरळ ठेवावीत. या मुद्रेमुळे शरीरातील अतिरिक्त आकाशतत्त्वाचा नाश हाेताे. कानातून आवाज येणे, कान दुखणे, भाेवळ हे त्रास बरे हाेतात. बहिरेपणा तसेच मुकेपणा ङ्मातदेखील दीर्घकाल ङ्मा ङ्कुद्रेचा सराव केल्ङ्मास ङ्खाङ्मदा हाेताे. डाेके, छाती, पाेट यांतील बधिरपणा दूर हाेताे. काेणतेही संसर्गदाेष दूर हाेतात. ङ्कनातील पाेकळी, ङ्कनाची खिन्नता, उदासीनता घालविण्ङ्मासाठी उपङ्मुक्त ङ्कुद्रा. काेणत्ङ्माही अवङ्मवाचे प्रसरण झाल्ङ्मास उदा. हर्निङ्मा, प्राेलॅप्स्ड ङ्मुटरस, हार्ट किंवा प्राेस्ट्रेट एन्लार्जङ्केंट इत्ङ्मादी विकारांङ्कध्ङ्मे ही ङ्कुद्रा उपङ्मुक्त ठरते.
सूर्य मुद्रा (लठ्ठपणा घालवणारी मुद्रा)
अनामिकेचे टाेक अंगठ्याच्या तळाला टेकवावे आणि अंगठा अनामिकेवर हलकेच ठेवावा. बाकी सर्व बाेटे सरळ ठेवावीत. सूर्य मुद्रा सूर्याप्रमाणे आपल्या शरीरात उष्णता निर्माण करते. या मुद्रेमुळे आपल्या शरीरातील पृथ्वीतत्त्व घटते आणि अग्नितत्त्व वाढते. हाडे, स्नाङ्मू व शिरांङ्कधील ताठरता कङ्की हाते. शरीरातील चयापचय क्रिया उत्तेजित हाेते. त्यामुळे वजनवाढीला आळा बसताे. शरीराचे तापमान संतुलित हाेते व अनावश्यक थंडी वाजणे किंवा कुडकुडणे थांबते. खाेकला, नाक चाेंदणे, ुप्ुसांमध्ये पाणी किंवा कङ्ख दूर हाेतात. भूक न लागणे, अपचन यासारखे त्रास बरे हाेतात. रक्तातील काेलेस्ट—ाॅल पातळी घटवण्यास मदत हाेते. अग्नितत्त्व हे दृष्टीशीही संबंधित असल्ङ्माङ्कुळे ही ङ्कुद्रा माेतीबिंदू विकारात उपयुक्त ठरते. (अशक्त व्यक्तींनी ही मुद्रा करू नये.)
रुक्ष मुद्रा (जलोदरनाशक मुद्रा)
अंगठ्याच्या तळाशी करंगळीचे टाेक टेकवावे आणि अंगठा करंगळीवर हलकेच ठेवावा. शरीरातील अतिरिक्त जलतत्त्वाचे नियंत्रण करणारी ङ्कुद्रा म्हणून हीला जलाेदरनाशक मुद्रा असेही म्हणतात. ‘जलाेदर’ म्हणजे ‘लिव्हर सिराॅसिस’ या आजारात लिव्हरचे कार्य व्यवस्थित हाेत नसल्यामुळे चयापचय क्रिया मंदावते. पाेटात अती प्रमाणात पाणी साठते. संसर्गामुळे ुप्ुसांमध्ये किंवा सांध्यांमध्ये पाणी हाेते, शरीराच्या काेणत्याही भागात सूज ङ्मेते म्हणजे तिथे साठलेली रसाङ्मने असतात. अशा आजारांङ्कध्ङ्मे ही मुद्रा उपङ्माेगी ठरते. हत्तीराेग बरा हाेताे. अति घाङ्क, डाेळ्यातून तसेच नाकातून पाणी वाहणे, गॅस्ट—ाे, जुलाब हाेणे, लघवीला वारंवार हाेणे इ. नियंत्रित हाेते. मासिक पाळीच्या वेळी हाेणारा अतिरिक्त रक्तस्राव आटाेक्यात येताे. भावनाप्रधान किंवा हळव्ङ्मा व्ङ्मक्तीला भावना निङ्मंत्रित करण्ङ्मास साहाय्ङ्मक ठरते.
समान / शांत मुद्रा (सर्व इंद्रियांची कार्ये नीट चालण्यासाठी)
पंचप्राणांपैकी समान हा वायू हृदय व नाभी यामध्ये कार्यरत असताे. यकृत, आतडे, स्वादुपिंड आणि पाेट यांस ऊर्जा पुरविताे. पाचकप्रणाली सक्रिय आणि नियंत्रित करणे, शारीरिकदृष्ट्या पाेषक द्रव्याचे समाकलन आणि वितरण करणे ही याची मुख्य कार्ये आहेत. हाताच्या पाचही बाेटांची टाेके एकत्र जुळवावीत व ती आकाशाच्या दिशेने ठेवावी. यामुळे पंचतत्त्वांचे संतुलन हाेते. मनातील क्राेध नष्ट हाेताे. मन शांत हाेते. स्वादुपिंड, यकृत, प्लीहा यांची कार्ये सुरळीत झाल्याने पचनक्रिया चांगली राहते. आतड्यांमधून पाेषक द्रव्यांचे शाेषण आणि वितरण सुरळीत झाल्यामुळे शरीराचे याेग्य पाेषण हाेते. सर्वसमावेशक आराेग्य मिळते. ङ्कधुङ्केहासाठी उपङ्मुक्त ङ्कुद्रा. शरीरात कुठेही दुखत असल्ङ्मास ही ङ्कुद्रा करून, दुखèङ्मा भागावर ङ्कुद्रा स्थितीतील बाेटांची अग्रे टेकवल्ङ्मास काही ङ्किनिटात आराङ्क ङ्किळताे. लचक बरी हाेते.
स्वयंपूर्ण उपचारांमध्ये पंचतत्त्व संतुलनासाठी खालील शास्त्रांचा अतंर्भाव केला आहे
अध्यात्मशास्त्र
अध्यात्म म्हणजे 'आद्य + आत्मन्' म्हणजे 'आत्म्याच्या मुळापर्यंत जाणे' किंवा आत्मज्ञान (अनंताचे ज्ञान)...
निसर्गशास्त्र : पंचतत्त्व
संपूर्ण निसर्ग पंचतत्त्वांपासून बनलेला आहे. तत्त्व म्हणजे नियम. निसर्गाच्या उत्पत्तीस, जडणघडणीस आणि...
योगशास्त्र : सप्तचक्रे
मानवी देहातील सात योगिक चक्रांच्या अस्तित्वाबद्दल योगशास्त्रात सांगितले आहे. ज्याप्रमाणे भौतिक देहात....
मुद्राशास्त्र
मुद्रा हा शब्द संस्कृत धातु ‘मुद्’ म्हणजेच ‘आनंदित होणे’ यापासून तयार झाला आहे. ‘शारदातिलक’ या ग्रंथात...
मनोविज्ञान
आपले विचार व उच्चार कंपनस्वरूप ‘अक्षर’ राहतात. आपल्याशी संबंधित कुणीही केलेल्या तत्सम विचार...
अक्षरब्रह्म
क्षर म्हणजे नाशवंत आणि ज्याला क्षर नाही ते ‘अक्षर’. अक्षर म्हणजे अविनाशी, शाश्वत, अक्षय तत्त्व. विचारांचे...