मनोविज्ञान

manovidyan 01 1

आपले विचार व उच्चार कंपनस्वरूप ‘अक्षर’ राहतात. आपल्याशी संबंधित कुणीही केलेल्या तत्सम विचार व उच्चारांची कंपने त्यास येऊन मिळत असतात. ही कंपने आवश्यक प्रमाणात निर्माण झाली की, तो विचार फलद्रूप होतो. परिस्थितीस चांगले किंवा वार्इट समजत नाही. आपला चांगला विचारही फलित होतो आणि वार्इट विचारही पूर्णत्वास जातो. मागण्यांची एक शृंखला मन निर्माण करते. रांगेत असणाऱ्या या मागण्या एक-एक करून अनुभवास येतात.

आज एखादी गोष्ट मी मागितली तर ती इच्छा रांगेत शेवटी जाते. पूर्वी मागितलेल्या मागण्यांचा आधी नंबर लागत असतो. त्या मागणीसाठी लागणाऱ्या आवश्यक ऊर्जेचा संचय जर सूक्ष्म देहात असेल तरच ती मागणी पूर्ण होते, अन्यथा नंबर येऊनही तिष्ठत उभी राहते. आत्मा अविनाशी असल्यामुळे ही क्रिया जन्मानुजन्म सुरू राहते. इच्छा, अपेक्षा, आकांक्षा या पूर्णत्वाला जातच असतात. इच्छा पूर्णत्वास जाते तेव्हा साठलेल्या ऊर्जेचे स्थूलात रूपांतरण होते व सूक्ष्मदेह तेवढा रिकामा होतो. त्यामुळेच एखादी मनोकामना पूर्ण झाल्यावर हलके वाटते. जोपर्यंत विचारांच्या या ऊर्जेचा संचय सूक्ष्म देहात असतो, स्थूल देहास आवश्यक असणाऱ्या ऊर्जेची कमतरता भासते. जे अनारोग्यास कारणीभूत ठरते.

मनाचा शरीरावर होणारा परिणाम पुढीलप्रमाणे आहे

manovidyan 02

मनाचा शरीरावर होणारा परिणाम पुढीलप्रमाणे आहे

Course Book 01
खूप राग मनात दाबून ठेवला तर सांध्यात आग निर्माण होते.
Course Book 02
अहंकारामुळे हाडामध्ये ताठरता निर्माण होते.
Course Book 03
मनाचा कोंडमारा, दु:ख दाबून ठेवल्याने फुप्फुस व मोठ्या आतड्यांची कार्यक्षमता कमी होते.
Course Book 04
हट्टीपणामुळे पोटाचे विकार उद्भवतात.
Course Book 05
अती ताण व चिंतेमुळे स्वादुपिंड खराब होते.
Course Book 06
भीतीमुळे किडन्या व मूत्राशयामध्ये दोष निर्माण होतात.
Course Book 07
आपलं तेच खरं करण्याची वृत्ती, अट्टाहस यामुळे बद्धकोष्ठता होते.
Course Book 08
आनंदी राहिल्यास ताणतणाव कमी होतो. प्रेमळ स्वभाव शांतता आणि समाधान देते. मनाला व शरीराला ताकद मिळते.
Course Book 09
घाई-गडबड, अधिरता, अतिआवेश यामुळे ह्रदय व छोट्या आतड्याला हानी होते.
Course Book 10
क्रोध व चिडचिडेपणामुळे यकृताला व पित्ताशयाला हानी पोहोचते.

स्वयंपूर्ण उपचारांतर्गत देहात साठलेली अतिरिक्त ऊर्जा वातावरणात मुक्त केली जाते. मात्र ती ऊर्जा रुग्णानेच आजवर साठवलेली असल्यामुळे, त्यानेच परमेश्वराकडे मनापासून ती मुक्त व्हावी यासाठी प्रार्थना करावी लागते. ‘परमेश्वर’ ही कोणी व्यक्ती नसून परमतत्त्व नियंत्रित करणारी ब्रह्मांडीय शक्ती आहे. ईश्वर म्हणजे नियंत्रित करणे, आणि ईश्वर म्हणजे नियंत्रित करणारी शक्ती – हे येथे समजून घ्यावे.

एक वाहन जीर्ण झाले तर आपण ते बदलतो व नवीन वाहनातून पुढचा प्रवास सुरू ठेवतो. तसेच जन्मानुजन्माचा प्रवास निरनिराळ्या देहातून सुरू असतो. देह चालविणारा चालक म्हणजे आत्मा, जन्मानुजन्माच्या इच्छा-आकांक्षांची साठवणूक सामानाच्या रूपाने वाहत असतो. प्रत्येक प्रवासात हे सामान (कामना) कमी होते किंवा वाढते. खरंतर हे सामान शून्य करण्यासाठीचा हा प्रवास आहे. मात्र मनुष्य ते विसरतो. जेव्हा सामान (कर्म) संपते, तेव्हा ऊर्ध्वगतीचा प्रवास सुरू होतो.

स्वयंपूर्ण उपचारांमध्ये पंचतत्त्व संतुलनासाठी खालील शास्त्रांचा अतंर्भाव केला आहे

अध्यात्मशास्त्र 01

अध्यात्मशास्त्र

अध्यात्म म्हणजे 'आद्य + आत्मन्' म्हणजे 'आत्म्याच्या मुळापर्यंत जाणे' किंवा आत्मज्ञान (अनंताचे ज्ञान)...

Naturopathy icon 01

निसर्गशास्त्र : पंचतत्त्व

संपूर्ण निसर्ग पंचतत्त्वांपासून बनलेला आहे. तत्त्व म्हणजे नियम. निसर्गाच्या उत्पत्तीस, जडणघडणीस आणि...

1011

योगशास्त्र : सप्तचक्रे

मानवी देहातील सात योगिक चक्रांच्या अस्तित्वाबद्दल योगशास्त्रात सांगितले आहे. ज्याप्रमाणे भौतिक देहात....

83

मुद्राशास्त्र

मुद्रा हा शब्द संस्कृत धातु ‘मुद्’ म्हणजेच ‘आनंदित होणे’ यापासून तयार झाला आहे. ‘शारदातिलक’ या ग्रंथात...

641

मनोविज्ञान

आपले विचार व उच्चार कंपनस्वरूप ‘अक्षर’ राहतात. आपल्याशी संबंधित कुणीही केलेल्या तत्सम विचार...

741

अक्षरब्रह्म

क्षर म्हणजे नाशवंत आणि ज्याला क्षर नाही ते ‘अक्षर’. अक्षर म्हणजे अविनाशी, शाश्वत, अक्षय तत्त्व. विचारांचे...

Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!