पृथ्वीतत्त्व
निसर्गातील सर्व टणक भागांमध्ये प्रमुख तत्त्व हे पृथ्वी असते. शरीरासाठीही हाच नियम लागू पडतो. शरीरातील कठीण भाग जसे की, हाडे, अस्थिबंधन, स्नायुबंध, केस, दात, कुर्चा तसेच पेशींच्या वरील आवरण, पोकळ अवयव अथवा शिरा/वाहिन्यांचे आवरण, मज्जातंतू इ. मुख्यत्वे पृथ्वीतत्त्वापासून निर्माण होतात. त्याचप्रमाणे स्नायू, मेद, अस्थिमज्जा, वीर्य यांच्या निर्मितीत पृथ्वीतत्त्वाचा जास्त सहभाग असतो.
शरीरातील सर्व टणक रचना, साचा व संपूर्ण आधार व्यवस्थेला कणखरता आणि अखंडता देण्याचे काम पृथ्वीतत्त्व करते. इतर चारही तत्त्वांचे संतुलनही अत्यंत महत्त्वाचे असते. सेवन व उत्सर्जन या क्रियांमुळे शरीरातील पृथ्वीतत्त्वाचे संतुलन होते.