Copyright 2021 @ Niraamay Wellness Center | All Rights Reserved
अक्षरब्रह्म

क्षर म्हणजे नाशवंत आणि ज्याला क्षर नाही ते ‘अक्षर’. अक्षर म्हणजे अविनाशी, शाश्वत, अक्षय तत्त्व. विचारांचे, भावनांचे प्रकटीकरण म्हणजे अक्षर ऊर्जेचे (उच्चार) एका ध्वनीत (कंपन) रूपांतरण होणे. जसे विचार, तसे शब्द. जसे शब्द, तसे कंपन. जसे कंपन, तसे तत्त्व निर्माण होते. दृढता-पृथ्वी, ओलावा-जल, राग-अग्नी, चंचलता-वायू, शांतता-आकाश तत्त्वाची निर्मिती करते. आपला प्रत्येक उच्चार आणि प्रत्येक विचार काही स्पंदने म्हणजेच ऊर्जा निर्माण करतो. आपण जसे विचार निवडतो, तशीच ऊर्जा आपल्या कोशांमध्ये साठायला सुरुवात होते. याचा परिणाम शरीर व मनाच्या आरोग्यावर होतो.
स्वयंपूर्ण उपचारांमध्ये समुपदेशन करून रुग्णांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक केला जातो. ऊर्जा उपचार तसेच मुद्रा व नामस्मरणाच्या माध्यमातून पंचतत्त्व संतुलनाची क्रिया केली जाते. ज्यामुळे संपूर्ण स्वास्थ्य मिळू शकते.
स्वयंपूर्ण उपचारांमध्ये पंचतत्त्व संतुलनासाठी खालील शास्त्रांचा अतंर्भाव केला आहे

अध्यात्मशास्त्र
अध्यात्म म्हणजे 'आद्य + आत्मन्' म्हणजे 'आत्म्याच्या मुळापर्यंत जाणे' किंवा आत्मज्ञान (अनंताचे ज्ञान)...

निसर्गशास्त्र : पंचतत्त्व
संपूर्ण निसर्ग पंचतत्त्वांपासून बनलेला आहे. तत्त्व म्हणजे नियम. निसर्गाच्या उत्पत्तीस, जडणघडणीस आणि...

योगशास्त्र : सप्तचक्रे
मानवी देहातील सात योगिक चक्रांच्या अस्तित्वाबद्दल योगशास्त्रात सांगितले आहे. ज्याप्रमाणे भौतिक देहात....

मुद्राशास्त्र
मुद्रा हा शब्द संस्कृत धातु ‘मुद्’ म्हणजेच ‘आनंदित होणे’ यापासून तयार झाला आहे. ‘शारदातिलक’ या ग्रंथात...

मनोविज्ञान
आपले विचार व उच्चार कंपनस्वरूप ‘अक्षर’ राहतात. आपल्याशी संबंधित कुणीही केलेल्या तत्सम विचार...

अक्षरब्रह्म
क्षर म्हणजे नाशवंत आणि ज्याला क्षर नाही ते ‘अक्षर’. अक्षर म्हणजे अविनाशी, शाश्वत, अक्षय तत्त्व. विचारांचे...