स्वयंपूर्ण उपचार घेण्याची पद्धत
सर्वप्रथम रुग्णाने निरामय वेलनेस सेंटरमध्ये येऊन अथवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे डॉक्टरांची भेट घेणे आवश्यक असते. रुग्ण भेटू शकत नसल्यास रुग्णाच्या नातेवाइकाने रुग्णाच्या सध्याच्या फोटोसह डॉक्टरांना भेटावे. डॉक्टरांशी भेट होण्याआधी आजाराबद्दलच्या माहितीचा फॉर्म भरून घेतला जातो. गरजेप्रमाणे चर्चा व समुपदेशन होते व रुग्णाला स्वयंपूर्ण ऊर्जा उपचार दिले जातात. उपचार म्हणजे ५ ते १० मिनिटांचे हेतुपूर्वक केलेले ध्यान असते. उपचारादरम्यान पेशंटचे ऊर्जा परीक्षण केले जाते. रुग्णाच्या देहामध्ये असणारी ऊर्जेची अनावश्यक साठवणूक व कमतरता, यानुसार पुढील उपचार योजना तयार केली जाते. प्रत्यक्ष ट्रिटमेंटचे शुल्क रु.२००/- आकारले जाते.
निरामयचे कर्मचारी रुग्णाला किंवा नातेवाइकांना पुढील उपचार योजना म्हणजेच फोनवरून उपचार घेण्याचे वेळापत्रक व इतर तपशील समजावून सांगतात. यापुढील उपचार हे फोनवरून म्हणजेच दूरस्थ पद्धतीने घ्यायचे असतात. ऊर्जा ही विश्वव्यापी असल्यामुळे जगाच्या पाठीवरून कुठूनही उपचार घेता येतात. रुग्ण घरातून किंवा प्रवास करताना रिक्षा, बस, ट्रेन अथवा ऑफिसमधून तसेच परगावातून किंवा परदेशातूनही उपचार घेऊ शकतो. प्रत्येक फोन ट्रीटमेंटचे शुल्क रू.५०/- आकारले जाते.
डॉक्टरांनी ठरवून दिलेले उपचार ऊर्जेमार्फत दूरस्थ पद्धतीने दिले जातात. दूरस्थ उपचार घेण्यासाठी सर्वप्रथम निरामय उपचार केंद्रावर फोन करावा लागतो. आपला फॉर्मनंबर आणि नाव सांगितल्यावर, निरामयचे उपचारक ‘ट्रिटमेंट घेण्यासाठी बसण्यास’ सांगतात. डोळे मिटून, मांडी घालून किंवा पाय सरळ सोडून ट्रीटमेंट घेण्यासाठी बसावे. फोन बंद करावा. रुग्ण बसून किंवा पलंगावर झोपून अथवा आरामदायक वाटेल अशा कुठल्याही शारीरिक अवस्थेत उपचार घेऊ शकतो. रुग्ण उपचार घेण्याच्या स्थितीत नसल्यास, पेशंटचा नातेवाईक ट्रिटमेंट घेऊ शकतो. कारण नातेवाइकाच्या ऊर्जाबंधामार्फत रुग्णापर्यंत ऊर्जा पोहोचवता येऊ शकते.
उपचार घेताना दोन्ही हात ‘समान मुद्रा’ स्थितीत असावेत. काही कारणास्तव हात मुद्रा स्थितीत ठेवणे शक्य नसेल तर, हात उताणे ठेवावेत. डोळे बंद करून, मनात सकारात्मक विचार ठेवावा. शांत व लयबद्ध श्वसन आणि नामस्मरण करीत ५ ते १० मिनिटे शांत बसावे. ठरवून दिल्याप्रमाणे उपचारांमध्ये सातत्य ठेवावे. दर पंधरा दिवसांनी होणाऱ्या फॉलोअप दरम्यान रुग्णाचे ऊर्जापरीक्षण केले जाते. आवश्यकतेनुसार उपचारांमध्ये बदल केले जातात. जसजसा आजार बरा होतो, तसे उपचारही बंद होतात. भविष्यात कधी गरज वाटल्यास निःसंकोच संपर्क साधता येतो. निरामयचे फोन उपचार केंद्र २४ तास कार्यरत असते.
स्वयंपूर्ण उपचार घेण्याची पद्धत
Walk-in
स्वयंपूर्ण उपचाराचा लाभ घेण्यासाठी रुग्णाला निरामय केंद्रात येणे आवश्यक आहे. जर हे रुग्णाला शारीरिकदृष्ट्या शक्य नसेल, तर त्याचे नातेवाईक निरामय येथील डॉक्टरांना रुग्णाचे अलीकडील छायाचित्र आणि अहवाल (उपलब्ध असल्यास) भेटू शकतात.
Online
स्व-उपचार सुरू करण्यासाठी रुग्ण ऑनलाइन डॉक्टरांना भेटू शकतो. ऑनलाइन उपचार सुरू करण्यासाठी, रुग्णाने नोंदणी फॉर्म भरावा किंवा आवश्यक माहिती ई-मेल (niraamaywellness@gmail.com) किंवा WhatsApp (7028701323) द्वारे पाठवावी.