साथ घ्या नैसर्गिक उर्जा उपचारांची, सांधेदुखी किंवा गुडघेदुखी जाईल कायमची!

आपल्या शरीराला कोण बरं करतं, हे आपण मागच्या लेखात पाहिलं. पण आपलं शरीर आजारी कसं पडतं? हे तुम्हांला माहिती आहे का? याबद्दल तुम्हांला मी पुढे सांगणारच आहे. पण आपण आधी रिटायरमेंट प्लॅन बाबत बोलू. घाबरू नका, मी कुठलाही प्लॅन विकणार नाही. हल्ली बरेचजण तरूणवयातच रिटायरमेंटनंतरचं आयुष्य कसं आनंदात जगायचं, याचं प्लॅनिंग करताना दिसतात. त्यासाठी ओव्हरटाइम, एक्स्ट्रा वर्क, सेव्हिंग्ज, इन्व्हेस्टमेंट्स अशा अनेक गोष्टींसाठी अक्षरशः दिवस-रात्र एक करताना दिसतात. टार्गेट एकच – आत्ताच भरपूर पैसे कमवायचे आणि रिटायरमेंट नंतर आनंदात जगायचे. पण खरंच रिटायर्ड मंडळी आनंदात दिसतात का हो? साधं ट्रीपला जायचं म्हटलं तरी शरीर साथ देत नाही. त्यात जर इतर आजार ‘पाहुणे’ म्हणून आले असले तर त्यांचा पाहुणचार करण्यातच बरेचसे पैसे खर्च होतात.

येतंय का लक्षात, तुम्ही जेव्हां पैसा कमावत असता, तेव्हां तुमचे ‘आरोग्यधन’ खर्च होत असतं. तर काही मंडळी अशी असतात की, त्यांना उद्याची फिकिरच नसते. ही मंडळी शरीराला फार कष्टही देत नसतात. अशा मंडळींचं ‘आरोग्यधन’ वाया जात असतं. त्यामुळे तुम्ही खूप कष्ट करणारे असाल किंवा आरामात जगणारे, म्हातारपणी आजाररूपी पाहुणे येणारच. पण कसे येतात हे पाहुणे? अचानक तर अजिबात नाही. ते हळूहळू शरीरात प्रवेश करतात. कसा? तर त्यासाठी शरीरकार्य पाहू.

शरीराला कार्य करण्यासाठी अन्नातून जशी ताकद लागते तशीच वातावरणातील उर्जाही लागते. अन्नातून मिळालेली उर्जा आणि वातावरणातील उर्जा ही आपली खरी ताकद. जेव्हां आपण कुठलंही काम करतो, तेव्हां ही उर्जा वापरली जाते आणि वापरलेली उर्जा पुन्हा शरीराबाहेर टाकली जाते. पण जेव्हां आपण खूप आणि सतत काम करतो. तेव्हां आपल्या कामानुसार शरीरातील त्या त्या स्नायूंवर-सांध्यावर भार येतो. अती कामासाठी मोठ्या प्रमाणात उर्जा वापरली जाते. वापरून झालेली उर्जा शरीरास बाहेर उत्सर्जित करावी लागते. त्यासाठी शरीराला विश्रांतीची गरज असते. पण आपल्या बिझी लोकांकडे वेळ आहेच कुठे स्वतःसाठी? घड्याळाच्या काट्यावर धावताना आपण उर्जा सतत घेतो, वापरतो आणि वापरलेली उर्जा, विश्रांती न मिळाल्यामुळे संपूर्णपणे बाहेर पडतच नाही. मग ती स्नायू-सांध्यामध्ये साचत रहाते. ज्यामुळे सांध्यांना आवश्यक ताज्या ऊर्जेची कमतरता भासते. ज्यामुळे शरीराचे चलनवलन विस्कळीत होते. कालांतराने कुर्च्या-मणके-सांधे-हाडे यामध्ये एक तर गॅप पडते किंवा ते एकमेकांना घासू लागतात आणि तेव्हां आपल्याला वेदनेची पहिली कळ येते.
त्याबद्दल आपण फार सीरियस नसतो. पेन किलर, तेल, मलमं वगैरे लावून पुन्हा कामाला लागतो. पण जगातली कुठलंही औषधं ही अनावश्यक-साचलेली उर्जा बाहेर काढू शकत नाही. यावर आधुनिक आरोग्यशास्त्राकडे एकच जालीम इलाज आहे- ऑपरेशन किंवा प्रत्यारोपणाचा!

अशीच वेळ बीडमधल्या एका छोट्या गावात राहणार्‍या तानाबाई जायबाय या ग्रामीण आजींवर आली. 10 वर्षे गुडघेदुखी, पायाला मुंग्याचा त्रास त्यांनी मुकाट्यानं सहन केला. नंतर तर खुर्चीवर बसून साडी नेसायची वेळ आली कारण उभंच रहाता येईना. अनेक दवाखाने पालथे घालून झाले. शेवटी हाडांच्या डॉक्टरांनी 2-4 लाखांचं इंजेक्शन सांगितलं. पण त्यानंतर कायमचं अपंगत्व येण्याच्या भीतीने तानाबाईंनी तो नाद सोडून दिला आणि त्या निरामयमध्ये आल्या. कष्टाचं शरीर, सगळीकडून झिजलेलं. साठलेली उर्जा काढणं गरजेचं होतं. त्या दिशेने आम्ही उपचार सुरू केले आणि 15 दिवसात तानाबाईंची गुडघेदुखी, मुंग्या येणं वगैरे त्रास कमी झाला. पुढे त्या फोनवरून उपचार घेत राहिल्या आणि 1-2 महिन्यात इतका फरक पडला की त्या आजही मैलभर चालून येतात.

पैसे कितीही असले तरी निरोगी शरीराशिवाय आनंद उपभोगणं शक्य नाही. त्यासाठी शरीराला व्यायाम व विश्रांतीची जोड द्यायलाच हवी. गीता नलावडे ह्या प्राथमिक शाळेतल्या उत्साही शिक्षिका. पण गुडघेदुखीने जायबंदी झालेल्या. त्यांनी निरामयचे उपचार घेतले आणि त्या पुन्हां मुलांमध्ये खेळू लागल्या. चालणं सोडा त्या चक्क उड्या मारू लागल्या. 63 व्या वर्षी 4 ट्रीपा देखील करून आल्या. हा अनेकांचा अनुभव आहे. गोळ्या, औषधे न घेता केवळ उर्जेद्वारे शरीरावर उपचार करता येतात.

आता तुमचा विश्‍वास बसो वा न बसो, निरामयने हे सिध्द केलेले आहे. आम्ही तर म्हणतो, अविश्‍वासाने या आणि अनुभव घ्या. हीच मोठी खात्री.
तुमच्या रिटायरमेंट प्लॅनमध्ये ‘निरोगी शरीर’ असू द्या हेच या लेखाद्वारे सांगणे. आत्तापासूनच शरीर निरोगी ठेवायचे असेल तर निरामयच्या सेंटरला अवश्य भेट द्या. तुमचा भविष्यकाळ आनंदात जाईल, याची खात्री आम्ही तुम्हांला देऊ.

गुडघेदुखीची माहिती व अनुभव पाहण्यासाठी हा व्हिडीओ आवर्जून बघा.

Share this post

Facebook Comments: Please enter a valid URL
Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!