Crown Chakra
सहस्रार चक्र
सहस्रार चक्र ब्रह्मरंध्र म्हणजेच टाळूवर असते. हे प्राणशक्तीचे प्रवेश केंद्र आहे. याचा रंग जांभळा आहे. सहस्रार चक्राकडे मेंदूचे नियंत्रण तसेच पिनियल ग्रंथींचे नियंत्रण असते. मूळ प्रेममय स्फुरण व ऐक्याचा भाव या चक्रामुळे येतो.
सहस्रार चक्र हे ब्रह्मजागृतीचे केंद्र असून, परमात्म्याचे, परमतत्त्वाचे ज्ञान येथे होते. अनुभूती, साक्षात्कार या चक्रामुळे घडतात. हे विश्वप्रेमाचे केंद्र असून, ज्याचे सहस्रार चक्र सक्षम असते ती व्यक्ती परोपकारी, आत्मज्ञानी असते.
ध्यान
सहस्रार चक्राच्या कार्यकारिणीमधील दोष
ज्या वेळी सहस्रार चक्राच्या कार्यकारिणीमध्ये दोष उत्पन्न होतात, तेव्हा मेंदू व पिनियल ग्रंथींशी संबंधित शारीरिक व्याधी उद्भवू शकतात.
तसेच, असमाधानी वृत्ती व मनःशांतीचा अभाव अशा मानसिक व्याधी उद्भवू शकतात.
साधारणतः सर्वच रोगांमध्ये एकापेक्षा जास्त चक्रे बाधित झालेली असतात. स्वयंपूर्ण उपचारांद्वारे एकाच वेळी सर्व चक्रांवर तसेच संपूर्ण सूक्ष्म देहावर उपचार केले जातात. त्यामुळे एकाच वेळी अनेक रोग बरे होऊ शकतात. बरे होण्यास लागणारा कालावधी हा रोगाच्या जटिलतेवर, रुग्णाच्या ग्रहणशीलतेवर व उपचारांमधील सातत्यावर अवलंबून असतो.
सप्तचक्रे

मूलाधार चक्र
मूलाधार चक्र मेरुदंडाच्या तळाशी असते. याचा रंग लाल आहे...

स्वाधिष्ठान चक्र
स्वाधिष्ठान चक्र लिंगस्थानाजवळ असते. याचा रंग नारिंगी आहे...

मणिपूर चक्र
मणिपूर चक्र नाभी/बेंबीवर असते. याचा रंग नारिंगी पिवळा आहे...

अनाहत चक्र
अनाहत चक्र छातीच्या मध्यभागी म्हणजेच हृदयाजवळ असते...

विशुद्ध चक्र
विशुद्ध चक्र कंठस्थानी असते. याचा रंग निळा आहे....

आज्ञा चक्र
आज्ञा चक्र भ्रूमध्य म्हणजेच दोन्ही भुवयांच्या मध्ये असते...

सहस्रार चक्र
सहस्रार चक्र ब्रह्मरंध्र म्हणजेच टाळूवर असते.हे प्राणशक्तीचे...