‘युती’ ही केवळ राजकारणातच नसते तर आपल्या शरीरातही अनेक युत्या झालेल्या आहेत. किंबहुना ‘युती’ किंवा ‘संधी’ आहे म्हणून आपलं शरीर टिकून आहे. अर्थात त्यासाठी प्रत्येक ‘संधी’मध्ये सुसंवाद हवाच; नाहीतर ‘वात’ आलाच म्हणून समजा. आकाश-वायू-अग्नी-जल आणि पृथ्वी या पंचतत्वांची संधी अशीच सांभाळावी लागते. त्यात कुठेही बिघाड झाला तर वात किंवा इतर आजार होणारच.
सकाळी उठल्यावर तुमची बोटं आखडत असतील किंवा सुजत असतील आणि नंतर गरम पाण्यात बुडविल्यावर नॉर्मलला येत असतील तर हे संधीवाताच्या सुरूवातीच्या लक्षणांपैकी एक लक्षण आहे. हे जर दिसलं तर ताबडतोब कुठेही जायची गरज नाही. फक्त पुढील काही सोप्या गोष्टी घरच्याघरी कराव्यात. सकाळी उठल्यावर आपले दोन्ही खांदे फिरवावेत, मनगटे, कोपरे, बोटांना देखील घड्याळाच्या दिशेने व विरूध्द दिशेने फिरवावं. कंबर फिरवावी. गुडघे फिरवावेत. वयोमानाने उभं राहून गुडघे फिरवणं जमत नसेल तर बसून फिरवावेत. पावलं फिरवावीत. यासाठी 5 मिनिटे पुरेशी आहेत. आणि दिवसभरातही जमेल तेव्हां असं 5-5 मिनिटे करत रहावं.
शरीरातील वात, अग्नी आणि पृथ्वी तत्वं बिघडून वात बिघडून संधीवात होतो. त्यासाठी मुख्य कारणीभूत आपली ‘पचनसंस्था’ असते ही आपल्या माहिती देखील आपल्या पचनी नाही. म्हणूनच संधीवात टाळण्यासाठी आपल्या आहारातही बदल करावा. तेलकट, शिळं, वात होणारं अन्न खाऊ नये. आता काहीजणांना तर जेवताना पाणी लागतंच. आपलं आयुर्वेद काय सांगतं, तर जेवणापूर्वी आणि नंतर अर्धा तास पाणी प्या. मुळात आपण पाणी का पितो, हेच आपल्याला ठाऊक नाही. तुमचा विश्वास बसणार नाही, पण शरीराला पाण्याची तशी फार गरज नसते. आपण प्यायलेल्या पाण्यापैकी अगदी थोडासा भाग रक्ताद्वारे पेशींमध्ये जातो. आणि बाकीचं पाणी लघवीवाटे बाहेर टाकलं जातं. पण…दिवसाला अमुक एक लीटर पाणी प्या असा एक विचित्र फंडाही पाहायला मिळतो. आता प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार पाण्याची गरज वेगळी असते. पण थोडं आठवून पाहा, काही वेळा आपण खूप पाणी पिऊनही आपली तहान भागत नाही. असं का? कारण ती तहान शरीराला नाही रक्तपेशींना लागलेली असते. त्यामुळे आयुर्वेद सांगतं, ‘‘पाणी चावून खा.’’ आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? तर घोटभर पाणी तोंडात घ्या. एकदा एका गालात नंतर दुसर्या गालात फिरवा. मग जिभेखाली फिरवा. याला म्हणतात ‘पाणी चावून खाणं’. यामुळे तोंडातील लाळग्रंथींद्वारे पाणी थेट रक्तात मिसळतं. तरीही तहान नाही भागली तर आणखी घोट-घोट प्या.
पण लीटर -लीटर पाणी पिण्याची गरज नाही. जर कष्ट करून बनविलेल्या मसालेदार भाजीत ग्लासभर पाणी ओतलं तर ती बेचव होणारच. आणि पुन्हा तशी चव आणणं म्हणजे मोठा घाट घालावा लागतो आणि चव काही येत नाहीच. तसंच शरीर आपलं अन्नपचन करत असताना मध्येच तुम्ही पाणी ओतलंत तर त्या पचनसंस्थेला पुन्हा घाट घालावाच लागतो आणि त्यात वात बिघडण्याची शक्यता जास्त असते.
सरिता जोशी ह्या 65 वर्षांच्या आजींना संधीवाताने इतकं जखडून टाकलं की, हातांनी चमचा उचलता येईना आणि पायांनी चालता येईना. औषधांचा फरक तर नाहीच. आता पुढचं आयुष्य असंच त्रासात जगावं लागणार ह्या दुःखात असलेल्या जोशी आजी निरामयमध्ये आल्या. विश्वास आणि श्रध्देने उपचार घेतले. 2 वर्षात 80% त्रास कमी झाला.
पण 2 वर्षे उर्जा उपचार? यापेक्षाही जास्त काळ लागू शकतो. कारण संधीवात एका रात्रीत होत नाही तर वर्षानुवर्षे साठलेला वात असतो. त्यासाठी सर्व तत्वं आणि चक्रांवर एकाचवेळी काम करावं लागतं. आणि तेही असं की, उतारावर स्पीडने जाणारी गाडी थांबवून परत उलट्या दिशेने वर चढविणे. पण गाडी वर चढतेच आणि संधीवात कायमचा जातोच, अशा अनेक केसेस आमच्याकडे आहेत.
त्यातलीच एक केस राधा कुलकर्णींची. राधाताईंना वयाच्या 23व्या वर्षी संधीवात झाला. अर्थात ह्यासाठी मॉडर्न सायन्सकडे पेनकिलर व इतर हेवी औषधांशिवाय उपचार नाहीच. त्यामुळे संधीवात जात नाही पण त्रास वाढतो. राधाताईंचे आयुष्य परावलंबी झालं. त्यात मधुमेह येऊन चिकटला. मग संपूर्ण शरीर इतकं आखडलं की बेड रिडन झाल्या. अशातच आडवं पडल्या पडल्या त्यांनी साम टीव्हीवरचा निरामयचा कार्यक्रम पाहिला आणि त्या आमच्याकडे आल्या. उर्जा उपचारांना सुरूवात केली. त्यांना दीड वर्षातच इतका फरक पडला आहे की, त्या स्वतःची कामे स्वतः करू शकत आहेत. हे फक्त निरामयमध्येच घडतं. तुम्ही कोणत्याही आजारांनी त्रस्त असा, आमचं कौन्सेलिंग घ्या. त्या समुपदेशनामुळेच पेशंट अर्धा बरा होतो, असं अनेकांचं म्हणणं आहे. शिवाय आम्ही फक्त एका आजारावर काम करत नाही तर तुमचं संपूर्ण ‘निरामय’ होण्यासाठी उपचार करतो.मॉडर्न सायन्सकडे उपचार नसलेले अनेक आजार इथे बरे झालेले आहेत. संधीवात हा त्यातलाच एक आणि त्यासाठीच ही उर्जा उपचारांची संधी ! ही संधी तुम्ही दवडू नका, हेच आमचं कळकळीचं सांगणं.
संधीवात व उपचार याबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी हा व्हिडीओ आवर्जून पाहा.