आई कुठे काय करते? हा प्रश्न अगदी योग्य आहे. पण तो केवळ तिच्या तब्येतीबाबतीतच. कारण आई किंवा घरातली स्त्री इतकी कामे करते की, ती ‘अष्टभुजा’ किंवा ‘दशभुजा’ असती तर फार बरे झाले असते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सर्वांचं सर्व काही बघणं आणि करणं ही सोपी गोष्ट नाही. त्यातही सर्वांच्या मर्जी आणि लहरी सांभाळणे तर त्याहूनही कठीण. पण हे सारं ती करत असते, अगदी बिनबोभाट आणि रेग्युलरही ! कारण आईला सुट्टी नाही. म्हणून तर काही दशकांपूर्वी ‘आई रिटायर होतेय’ हे नाटक तुफान चाललं. पण आजच्या काळातली स्त्रीची चॅलेंजेस् तर आणखीनच जास्त आहेत. कारण आजची मॉडर्न स्त्री ही ‘वर्किंग वूमन’ही आहे.
म्हणजे आता घरही सांभाळा आणि ऑफिसही…अशी तारेवरची कसरत करताना तिला स्वतःकडे बघण्यासाठी वेळ नसतो. टाईट व बिझी शेड्यूल्डमध्ये कधी ब्रेकफास्ट तर कधी लंच तर कधी डिनरही चक्क ‘स्कीप’ केलं जातं. बरं, आजच्या काळात पोषक तत्वं मिळणं कठीण. त्यात सर्वात त्रासदायक म्हणजे मेंटल स्ट्रेस अर्थात मानसिक ताण. हे कमी की काय म्हणून, त्यात ‘हार्मोनल चेंजेस’…पीरियड्समधली दुखणी. हे सगळं सहन करूनही स्त्री हसतमुखाने उभी रहाते ना, तेव्हां तिला ‘हॅट्स ऑफ’ करायलाच हवं. जगातला कोणताही पुरूष हे सगळं एक दिवसही सहन करणं शक्यच नाही.
त्यामुळेच संधीवात हा सर्वात जास्त प्रमाणात स्त्रियांमध्येच आढळतो. कारण घरातले, ऑफिसमधले ताणतणाव शरीरावर आणि शरीरातल्या चक्रांवरही विपरित परिणाम करत असतात. या तणावामुळे निगेटिव्ह एनर्जी साचत जाते आणि त्यातून सांधे आखडण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो, तुम्ही कितीही बिझी असाल तरी स्वतःसाठी 15 मिनिटे काढा. सूर्यनमस्कार, कदम-ताल किंवा वॉर्मअप एक्सरसाईजेस करा. ज्यामुळे तुमचं शरीर आखडणार नाही. दिवसातून दोन ग्लास तरी दूध प्या आणि रात्री झोपताना, सगळे ताणतणाव दूर ठेवून शांत झोपा. बस्स…एवढं जरी केलं ना तरी जगातली प्रत्येक स्त्री संधीवातापासून दूर असेल. निरामयमध्ये स्वयंपूर्ण उपचार घेण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला आधी आम्ही हाच वर सांगितलेला सल्ला देतो. कारण आमचं काम एकच…तुम्हांला कायमचं व्याधीमुक्त करायचं !
संधीवाताचा त्रास अनेक वर्षे सहन करत असलेल्या शिल्पा परांजपे ह्या काकूंना नंतर नंतर वेणी घालणंही अवघड झालं होतं. अन्नही भरवायला लागायचं. हातापायांवर भली मोठी सूज, पाऊल टाकणं अवघड झालेलं. अशा परिस्थितीत त्या निरामयमध्ये आल्या आणि स्वयंपूर्ण उपचार घेऊ लागल्या. अवघ्या 2-3 महिन्यात काकू मूळपदावर आल्या आणि स्वतःची कामं स्वतः करत हिंडू फिरू लागल्या. कुठलंही औषध-इंजेक्शन न घेता !
अनेक वर्षांचे त्रास 2-3 महिन्यात बरे होऊ शकतात किंवा त्यासाठी 2 वर्षेही लागू शकतात. कारण हे सगळं गणित, तुमच्या शरीरात कायकाय आणि कुठे कुठे साचलंय यावर अवलंबून असतं. पण कितीही वेळ लागला तरीही ‘देर आए दुरूस्त आए’ हे प्रत्येकाला हमखास जाणवतंच. कारण ही स्वयंपूर्ण उपचार पध्दती तितकी प्रभावी आहेच.
संधीवातालाही आता वय उरलेलं नाही. तुम्ही टीव्हीवरच्या जाहिराती पाहात असाल तर पूर्वी चाळीशीत दिल्या जाणार्या कॅल्शिअमच्या गोळ्या आता तिशीतल्या महिलांना सुचवायला लागले आहेत. आणि त्या जाहिरातींचा मारा आमच्या मनावर इतका होतो की घे गोळी आणि भर कॅल्शिअम ! त्यापेक्षा शरीर ठणठणीत ठेवणं आपल्या हातात निश्चित आहे.
बेंगलोरची मोनिका पाटील, ही एक तरूण आई, 10-15 ़़वर्षांपासून आमवाताचा (संधीवाताचा भाऊ) त्रास करत सहन करत होती. पेनकिलरलाही शरीर दाद देईनासे झाले. अक्षरशः बेडवर झोपून राहण्याची वेळ आली. घरात 2 वर्षांची छोटी मुलगी आणि मोनिका ताईंना काम करणंही कठीण झालं. बरं, एवढंच नाही तर त्या टेक्सटाईल डिझाइनर, ती कामेही बंद झाली. विचार करा, जर एखादी स्त्रीवर अशी वेळ आली तर तिच्या मनाच्या काय अवस्था असेल. आपण दुसर्यासाठी ओझं ठरतोय ही भावनाच स्त्रीला आधी मनातून मारत असते. त्यातूनच जगावं का? हा प्रश्नही भेडसावू लागतो. फार गंभीर अवस्था असते ही. अशा अवस्थेत मोनिकाताईंनी 7-8 वर्षे काढली. हे फक्त स्त्रीच करू शकते कारण स्त्रीशक्तीचं दुसरं नाव सहनशक्ती. पण त्याचाही अंत होईल इतका हा काळ. त्यांच्या नशीबाने म्हणा किंवा अन्य कशाने…त्यांनी साम टीव्हीवर निरामयचा प्रोग्राम पाहिला आणि पुण्याला यायचं ठरवलं. येणंही सोपं नव्हतं. पण पतीच्या साथीनं हात धरून त्या निरामयमध्ये आल्या. चार पावलं टाकून त्या कशाबशा केबिनमध्ये आल्या. पण पहिल्याच ट्रीटमेंटनंतर त्या जेव्हां केबिनमधून बाहेर पडल्या, तेव्हां त्यांना आधाराची गरज भासली नाही. हेच…हेच आम्ही सांगतो की, हे प्रत्यक्ष अनुभवा आणि मग ठरवा, स्वयंपूर्ण उपचार घ्यायचे की नाहीत. तो निर्णय तुमचा !
पण याअनुषंगाने आणखी एक गोष्ट इथं स्पष्ट कराविशी वाटते. ती म्हणजे, तुम्ही पुणे-मुंबई पासून दूर असाल किंवा जिथं असाल तिथून येणं तुम्हांला अवघड असेल तर हट्टाने येऊ नका. हो, येऊ नका. निरामयची स्वयंपूर्ण उपचार पध्दती इतकी प्रभावी आहे की,तुम्ही तुमच्या घरी बसून फोनवर किंवा तुमच्या फोटोद्वारे उपचार घेऊ शकता. उगाच प्रवास करून आणखी त्रास वाढवून घेऊ नका व उपचार सुरू करण्यातला वेळही वाढवू नका. आता हे कसं शक्य आहे? या. पाहा. अनुभवा. अनुभव हीच खात्री !
संधीवाताबद्दल महिलांना मार्गदर्शन करणारा हा महत्वपूर्ण व्हिडीओ आवर्जून पाहा.