हृदयरोग, मधुमेह, पक्षाघात, कर्करोग या बरोबर संधिवात हा आजारही जीर्ण आजारांमध्ये मोडतो. असह्य वेदना आणि अपंगत्व यामुळे तो रूग्णाला जर्जर करतो.
संधी म्हणजे सांधा. सांध्याचे मुख्य कार्य म्हणजे हालचाल. आणि वात म्हणजे सांध्यात अडकलेला वात. ज्यामुळे सांधे दुखतात आणि हालचालीत बाधा येणे याला आपण संधिवात म्हणतो. यालाच इंग्रजीत ऱ्हुमॅटिझम म्हणतात.
वयोमानपरत्वे किंवा सांध्याच्या अति वापरामुळे सांध्यांची कूर्चा झिजते. मार लागणे, सांध्याची शस्त्रक्रिया, स्थूलपणा, स्नायूंचा कमकुवतपणा ही संधिवाताची प्रमुख कारणे आहेत.
मानेचे तसेच कंबरेचे मणके (स्पाँडिलोसिस), गुडघा, खांदा, घोटा, तसेच बोटांच्या सांध्यांत झीज होते. यामुळे हे सांधे दुखतात व हळूहळू अकार्यक्षम बनतात. उदा. बराच वेळ एकाच जागेवर बसून काम तेल्यानंतर मान किंवा कंबर आखडते व दुखते. आमवात हाही संधिवाताचाच एक प्रकार. लुपस, स्क्लेरोडर्मा, संग्रहणी, सारकॉइड, कर्करोग, क्षय, चिकुनगुनिया, एड्स अशा अनेक आजारांत सांध्यांना सूज येते. म्हणजेच सांध्यांमध्ये पित्त आणि वात दोन्ही वाढतो. संधिवाती आमवातात हातपायांची बोटे, तसेच मनगट आणि घोट्याचे सांधे सुजतात व दुखतात. सकाळी उठल्यावर किंवा विश्रांतीनंतर सांधे कडक राहतात. हलवता येत नाहीत आणि हालचालीनंतर काहीसे सैल होतात. सुजेमुळे सांधे आतून खराब होत जातात. बोटे आणि इतर सांधे वेडेवाकडे होतात. ताप येणे, डोळ्यांची जळजळ, थकवा, भूक मंदावणे अशी लक्षणेही दिसून येतात. रक्तवाहिन्या, मूत्रपिंड, फुफ्फुसे आणि हृदय अशा अनेक अवयवांवर परिणाम होत जातो. वेदना आणि व्यंग यामुळे मनाला उदासीनता येते.
संधिवात स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात असते तर गाऊट आणि ऍन्किलोसिंग स्पाँडिलायटिस हे विशेषकरून पुरुषांमधे दिसून येते.
स्वयंपूर्ण उपचार संधिवातावर प्रभावी तोडगा ठरतात. यामध्ये शरीरातील पंचतत्वांचे ऊर्जेच्या सहाय्याने संतुलन केले जाते. संधिवातात ‘वात = आकाश + वायू’ आणि आमवातात ‘आम (पित्त) = अग्नि + जल’ आणि वात’ सांध्यांमध्ये वाढत जातात. परिणामी पृथ्वी तत्व क्षीण होते म्हणजेच स्नायू व हाडे कमकुवत होतात. स्वयंपूर्ण उपचारांद्वारे कमी झालेले तत्व शरीरास आवश्यक तिथे पुरविले जाते आणि अतिरिक्त तत्व वातावरणात मुक्त केले जाते. हे उपचार रूग्णांच्या प्राणमय कोशावर केले जातात. त्यामुळे रूग्णाला स्पर्श करावा लागत नाही. रूग्ण कुठेही असला तरी दूरस्थ पद्धतीने उपचार घेता येतात. कोरोनाच्या या महामारीमध्ये यासारखे उत्तम हेच…