शुभेच्छा स्वयंपूर्ण विश्वासाठी…

वाळलेली पानं गळून जातात आणि झाडाला नवीन पालवी फुटते. तसं सरलेल्या 2020 च्या सगळ्या दाहक आठवणी गळून जाऊ देत आणि सुरू झालेल्या 2021 मध्ये नवतेजाची पालवी बहरू दे या सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा.

या सरलेल्या वर्षानेही आपल्याला बरंच काही दिलं. सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला कोविड -19 (साथीचा रोग) ने आवश्यक संरचनात्मक बदल करण्याची संधी दिली, निसर्गाने पृथ्वीला बरे होण्यासाठी वेळ दिला. तसंच, मानवांना त्यांच्या व्यस्ततेतून थोडी मोकळीक दिली, स्वत:ला जास्तीत जास्त वेळ दिला जाऊ शकतो हे दाखवून दिलं. आरोग्याविषयी विचार करायला लावलं. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर हे घडलं.

सन 2020 परीक्षेचा काळ होता ज्यामुळे आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रावर परिणाम झाला, वेळेची, पैशाची, माणसाची आणि संस्कारांची किंमत प्रत्येकालाच समजावली. बाहेरून आल्यावर पादत्राणे घराबाहेर काढावीत, लगेच हात, पाय, तोंड धुवावे, कपडे बदलावेत या सवयी नव्हे संस्कारांची जाणीव आपल्याला कोविड-19 ने करून दिली. हा साथीचा रोग आणि त्याच्या परिणामांमुळे क्वारंटाईन, लॉकडाउन, सॅनिटायटेशन इत्यादी नवीन शब्द सामान्य भारतीय शब्दकोशात आले. स्वत:च्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणारे लोक कठोर वास्तवांबाबत जागे झाले. चांगला आहार, उत्तम विचार आणि शरीराला आवश्यक व्यायाम शरीर निरोगी ठेवते या सर्वज्ञात त्रिसूत्रीचा अवलंब आपण सन 2020 मध्ये सुरू केला.

लॉकडाऊनच्या काळात घरात अडकून पडलेले, घाबरलेले, आजारांनी पिडीत अनेक रूग्ण निरामयशी जोडले गेले. फोनवरून उपचार (दूरस्थ) घेण्याची सुविधा निरामयच्या स्वयंपूर्ण उपचारांमध्ये असल्यामुळे त्यांना एक आधार, मनातील अस्वस्थता व्यक्त करण्याचा मार्ग मिळाला. शारीरिक तसेच मानसिक आजारात घरी राहून परिणामकारक उपयोग झाला. अनेकांनी फोन करून, मेसज करून, व्हॉटस् ॲपद्वा, इमेलद्वा या भावाना व्यक्त केल्या. या लेखाच्या माध्यमातून त्या प्रत्येकाचेच आभार मानायचे आहेत. आपण सेवेची संधी दिलीत, म्हणून आम्ही हे करू शकलो.

आता गरज आहे ही उपचारपद्धत सर्वदूर पोहोचवण्याची. अजूनही अनेकांना कल्पनाही नाही, कि अशी उपचारपद्धती आपल्याकडे उपलब्धच नव्हे तर प्रचलितसुद्धा आहे. घरबसल्या, कमी खर्चात, एकाच वेळी अनेक आजारांवर उपचार घेता येतात.

ऊर्जा उपचार ही एक पारंपारिक उपचार प्रणाली आहे जी शरीर, मन आणि आत्मा यांच्यात उर्जेचे संतुलन आणि प्रवाह पुनर्संचयित करते. हे तंत्र शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक पैलूंसह अनके अहितकारक गोष्टींवर थेट कार्य करते. याचा उपयोग विविध वैद्यकीय परिस्थितींमध्ये, मानसिक किंवा शारीरिक आरोग्याशी संबंधित आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. हे शरीरातील उर्जा प्रवाहाच्या अडचणीमुळे उद्भवलेल्या आजाराला संबोधित करते. जेव्हा उर्जा प्रवाह व्यवस्थित होतो, तेव्हा ती व्यक्ती आजारातून बरी होते. शरीरातील पाच तत्त्वांचे संतुलन यातून साधले जाते.

अलिकडच्या वर्षांत, युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम आणि इतर देशांमध्ये याला व्यापक लोकप्रियता मिळाली आहे. जगभरात कुठेही असलेल्या रूग्णाला एकाच उपचारांच्या माध्यमातून शारीरिक आणि मानसिक आरोग्यप्राप्ती करून देणे म्हणजेच स्वयंपूर्णता. ही स्वयंपूर्णता प्रत्येकाला मिळो ही अपेक्षा.

सजग बनू । सशक्त बनू । स्वयंपूर्ण बनू ।

Share this post

Facebook Comments: Please enter a valid URL
Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!