यमनरंग
आपलं भारतीय प्राचीनशास्त्र महान आहे. हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषिमुनींनी निसर्गातील अनेक रहस्यांची उकल करून मानवी आरोग्याला संजीवनी दिलेली आहे. यामध्ये भारतीय शास्त्रीय
संगीताचाही समावेश आहे. शास्त्रीय संगीतातही अशा रागांची रचना आहे की, जे ऐकल्यामुळे मानवी शरीर, भावना आणि आरोग्याचे संतुलन साधले जाते. अशाच रागांपैकी यमन राग ज्यामुळे आपलं मन शांत होतं आणि ताणतणाव दूर होतो. नादसप्तक संगीत विद्यालय आणि गिरीश पंचवाडकर यांनी याच यमनरागावर आधारित ‘यमनरंग’ ही मैफिल सादर केली. यामध्ये या रागावर आधारित 101 मराठी व हिंदी गाणी सादर करून त्यांनी आज एक विश्वविक्रम प्रस्थापित केला. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यासाठी ह्या सुरेल क्षणांमध्ये निरामय वेलनेस सेंटरदेखील उत्साहाने सहभागी झाले होते. या विश्वविक्रमी कार्यक्रमातील ही काही क्षणचित्रे…