‘मान’ हा शरीरातील महत्वाचा अवयव आहे. एकवेळ समाजातला ‘मान’ कमी झाला तरी चालू शकते पण ताठ मानेनं जगण्याची प्रत्येकाची इच्छा असते. आता काही वेळा मान आखडते, दुखते तेव्हां आपण किती सहजपणे मान मोडतो आणि मान कट्कन मोडलीही जाते. हा आपल्याकडची प्राचीन उपचार पध्दती. पण आत्ताच्या काळात ती अजिबात लागू पडत नाही. कारण पूर्वीची माणसं सकस व पोषक आहारामुळे बलदंड होती. आता जवळपास आपण सर्वच ‘हायब्रीड’ झालेलो आहोत. अशावेळी मानदुखीवर योग्य उपचार घेणंच योग्य.
या मानदुखीवर आधुनिक विज्ञान काही औषधं किंवा लाईट्सचा वापर करतं. पण फरक तेवढ्यापुरताच पडतो. कालांतरांने तर काहींच्या गळ्यात मानेचा पट्टाही येतो. उषा पेंडसे नावाच्या एक आजी 5-6 वर्षे मानदुखीचा त्रास सहन करत होत्या. औषधं-लाईट्सचा काडीचा आधार होता. त्यात औषधांनी अॅसिडीटीचा त्रास सुरू झाला. मग त्या निरामयमध्ये आल्या आणि उर्जा उपचारांनी अवघ्या 2 महिन्यात त्यांची मानदुखी बरी झाली. पण…आजार एकदा मागे लागला की पाठ सोडत नाही म्हणतात. पेंडसे आजींना त्यानंतर डाव्या पायाच्या घोट्यामागे एक गोळा आला. त्या गोळ्यात पाणी असल्याने त्याचे ऑपरेशन करावे लागेल व स्टेरॉईड्स घ्यावे लागेल असे ऑर्थोतज्ञांनी सांगितले. अर्थात पेंडसे आजींनी निरामयमध्येच येणं पसंत केलं. पण ह्यावेळी उर्जा उपचार घेऊनही 2 महिन्यात त्यांना काहीच फरक जाणवेना. मग आम्ही त्यांच्याशी बोललो. त्यांना सांगितलं की, तुमच्या उर्जा शरीरात बदल दिसतोय. स्थूल शरीरात बदल व्हायला थोडा वेळ लागेल. तुम्ही फक्त सातत्याने व सकारात्मक भावाने उपचार घ्या. पेंडसे आजींनी हा सल्ला ऐकला आणि तिसर्या महिन्यातच त्यांच्या पायाच्या गोळ्याचा आकार कमी झालेला त्यांना दिसला. मग काय…मोठ्या उत्साहाने त्यांनी उपचार ठेवले आणि तो पाण्याचा गोळा पूर्णपणे गेला. गोळ्यामुळे चालणं-फिरणं बंद झालेल्या पेंडसे आजी पुन्हा हिंडू-फिरू लागल्या. यानंतर त्यांनी त्यांच्या मुलालाही खोकल्यासाठी निरामयमध्ये आणलं. त्याचाही जुनाट खोकला कायमचा गेला. मग पेंडसे आजीच निरामयच्या जणू काही ‘ब्रँड अॅम्बेसिडर’ झाल्या आणि ओळखीतल्या अनेकांना त्यांनी उपचारांसाठी ‘निरामय’मध्ये पाठवलं. कारण अनुभव हीच खात्री ! एका मानदुखीसाठी आलेल्या पेंडसे आजी आजार व औषधांच्या भारातून मोकळ्या झाल्या. पण आपल्या भाराचे काय?
‘कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे?’ तर आपल्यापैकी प्रत्येकाच्या खांद्यावर जबाबदार्यांचे व कर्तव्यांचे ओझे आहेच. तुमचा विश्वास बसणार नाही, पण याच ओझ्यामुळे देखील खांदेदुखी होऊ शकते. खांद्याचे दुखणे हे केवळ स्नायूंची समस्या नाही तर मानसिक ओझ्याचाही तो विपरित परिणाम आहे. जर आपल्या छोट्या बाळाला लहानपणी आपण आपल्या डाव्या खांद्यावर घेऊन निजवत असू आणि पुढे मोठेपणी त्या बाळाशी आपले नातेसंबंध बिघडले तर आपला डावा खांदा दुखू लागतो. जर आई बाळाला उजव्या बाजूला पाजत असेल आणि ते बाळ मोठे झाल्यावर आईचे नातेसंबंध दुरावले तर आईचा उजवा खांदा दुखू लागतो. म्हणजेच खांदेदुखीमध्ये भावभावनांचा गुंता असतो. निरामयमध्ये उर्जा उपचार करताना आम्ही फक्त तुमचे स्थूल शरीर किंवा उर्जा शरीर यावरच उपचार करत नाही तर तुमच्या मानसिक समस्यांचा गुंताही सोडवतो. थोडक्यात तुमच्या नकळत आम्ही सायकॉलॉजिस्टचे कामही करत असतो. तुम्हांला जर तुमचा खांदा शाबूत ठेवायचा असेल तर एक काम करा, आपल्यावरच्या जबाबदार्यांना ओझे समजू नका. उलट आपल्या माणसांसाठी आपण प्रेमाने हे सारं करतोय, अशी भावना मनात आणा. ह्या भावनांमुळे तुमचा खांदा आणखी बळकट होईल.
खांदेदुखी सोबतच हल्ली टेनिस एल्बो, फ्रोझन शोल्डर किंवा मनगट दुखणे ह्यासारखे आजारही दिसत आहेत. आशा अभ्यंकर ह्या आजींना फ्रोझन शोल्डर झाला होता. साधं भांडंही उचलू शकत नव्हत्या. पण निरामयच्या उर्जा उपचारांनी एका महिन्यात त्या हात वर्तुळाकार फिरवू लागल्या. आणखी काही काळातच त्यांचा आजार पूर्णपणे गेला. शर्टाचं बटनही लावू न शकणार्या जयदीपचा असाच अनुभव तुम्हांला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितला आहेच.
असे अनेक अनुभव अनेकांना येतात. श्रध्दा कुलकर्णी नावाच्या एक पेशंट तर योगायोगाने निरामयमध्ये आल्या, एकाच ट्रीटमेंटमध्ये बर्याही झाल्या. त्यानंतर अनेक पेशंट त्यांचे नाव सांगून निरामयमध्ये येऊ लागले. आम्हांला कळेनाच की, श्रध्दा कुलकर्णी कोण? शेवटी त्यांच्याशी बोलणं झाल्यावर कळलं की, त्यांना आलेला अनुभव पाहून त्याच इतरांना निरामयचे नाव सुचवत होत्या. असे अनेक अनुभव आहेत, जे आमच्यापर्यंत अजून पोहचलेले नाहीत. जर तुमच्याकडेही असा अनुभव असेल तर तो आमच्याशी शेअर करा. तुमच्या अनुभवातूनच अनेकांना पुढे व्याधीमुक्त आयुष्य जगण्याची संधी मिळू शकते. तेव्हां पत्र लिहा, मेसेज करा किंवा कॉल करा. निरामयमध्ये तुमच्या अनुभवांचे स्वागत आहे.
मानदुखी व स्नायुदुखीवरील मार्गदर्शन घेण्यासाठी हा व्हिडीओ आवर्जून पाहा.