आपल्याकडच्या महिलांना परमेश्वराने अफाट शक्ती दिलेली आहे असे आपण कौतुकानं म्हणतो. पण खरंच, महिला किती काम करतात आणि त्याहीपेक्षा किती त्रास सहन करतात हे सर्वसामान्य माणसाच्या ताकदीच्याही पलीकडचे आहे. घरातली कामे, बाहेरची कामे आणि त्याबरोबरच भावनिक चढउतार ह्या सर्वांचा महिलांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होतच असतो. स्वतः स्त्रीने जरी त्याकडे कितीही दुर्लक्ष केले तरीही काही दिवसांनी शरीर स्वतः आजारांच्या माध्यमातून बोलू लागते.
असं म्हणतात की, आजार आधी मनात होतो आणि मग शरीराला होतो. स्त्रियांच्या आजारांकडे पाहिलं तर या विधानाची सत्यता पटते. स्त्रियांचे मनोविश्व बिघडले की त्यातून शरीरातील हार्मोन्स बिघडतात आणि त्यातूनच विविध व्याधी सुरू होतात. छातीत होणारी गाठ हा एक असाच हार्मोनल असंतुलनाचा परिणाम.
शिवाली सोनार ह्यांच्या छातीत अशीच गाठ झाली होती आणि त्याचबरोबर गुडघेदुखीही प्रचंड होती. विविध औषधं घेतल्यावर अखेरीस त्या निरामयमध्ये आल्या आणि त्यांनी स्वयंपूर्ण उपचार घेतले. 2 महिन्यातच त्यांची गुडघेदुखी तर कमी झालीच शिवाय छातीतली गाठही गेली. तसं पाहिला गेलं तर हे दोन्हीही आजार वेगवेगळे. पण ते एकाच उपचारामध्ये बरे कसे झाले? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आपलं संपूर्ण शरीर हे पंचतत्वांपासून बनलेलं आहे. शरीराच्या कोणत्याही भागाला झालेला आजार हा पंचतत्वातील असंतुलनचाच दुष्परिणाम असतो. स्वंयपूर्ण उपचारांमध्ये आपण संपूर्ण शरीरामधील पंचतत्वांचे असंतुलन दूर करतो. त्यामुळे एकाचवेळी तुमचे अनेक आजार बरे होत असतात. आता जो आजार जास्त खोलवर रूजला आहे, त्याला वेळ अधिक लागतो. एवढाच काय तो फरक. पण सर्व आजार दूर होतात हे मात्र खरे !
अशाच एक महिला रूग्णांचा अनुभव इथं सांगावासा वाटतो. त्यांचे पती एका कार अॅक्सिडेंटमध्ये गेले. त्या घटनेचा ह्या महिलेला इतका प्रचंड धक्का बसला की त्यांना रक्तस्त्राव सुरू झाला. तोही इतका की रक्ताचे थारोळेच ! आणि ही घटना त्यांच्या मनावर इतकी कोरली गेली की, त्यांनी स्वतःला खोलीत बंद करून घेतलं, इतरांशी बोलणं सोडलं. पतीचा विषय निघाला किंवा आठवण आली तरी रक्तस्त्राव सुरु व्हायचा. अशी तब्बल 3 वर्षे त्यांनी त्रासात काढली. नंतर निरामयमध्ये आल्यावरही त्या इतक्या रडल्या की जणू ती घटना काल-परवाच घडलेली आहे. मग आमच्या डॉक्टरांनी त्यांना धीर दिला. त्यांचं समुपदेशन केलं. ह्या कटू आठवणीतून बाहेर पडण्याचा मार्ग त्यांना दाखवला. आणि हळूहळू त्या मनातून मोकळ्या होत गेल्या. दुसरीकडे स्वयंपूर्ण उपचारांनी त्यांच्या शरीरालाही मूळपदावर आणलं.
सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि स्वयंपूर्ण उपचार ह्या त्रिसूत्रीद्वारे तुम्ही कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक आजारावर मात करू शकता हे आम्ही ठामपणाने सांगू शकतो. पण त्याचबरोबर महिलांनी आपल्या जुन्या चालीरितींमागचे शास्त्रही समजून घ्यावे असे आम्हांला मनापासून वाटते. आपले पूर्वज हे सर्वात मोठे वैज्ञानिक होते आणि त्यांना जितकं शरीर विज्ञान ठाऊक होतं, तेवढं आजच्या मॉडर्न सायन्सलाही ठाऊक नाही. मासिक पाळीच्या दिवसात स्त्रीने बाजूला बसावं, तिला कोणी शिवू देखील नये यामागेही फार मोठे शास्त्र दडलेले आहे. मासिक पाळीच्या काळात स्त्रियांचे शरीर कमकुवत झालेले असते. अशावेळी त्यांना सक्तीच्या विश्रांतीची गरज असते. तसेच तिचे उर्जावलयही दूषित झालेले असते. त्याचा परिणाम इतर व्यक्तींवर होऊ नये असा संपूर्ण विचार पूर्वी केला जायचा. पण हल्लीच्या काळात ह्याला अंधश्रध्दा म्हणत स्त्रियांनीच नाकारले आहे. त्याचे परिणाम म्हणजे हल्लीच्या महिला या जास्त आजारी पडताना दिसतात. त्यात या काळात उड्या मारा, पळा असा संदेश देणार्या जाहिरातीही दाखवल्या जातात. आता ज्या शरीरात ताकदच नाही, त्याला तुम्ही अधिक कामाला लावताय, हा साधा विचार आपण करायला हवा.
अनिशा बालिगा ही एक नवविवाहिता. तिच्या पिशवीला व पोटाला प्रचंड इन्फेक्शन झालेले. दिवसाला 18 इंजेक्शन व 7-8 सलाईनच्या बाटल्या. त्यामुळे शरीरातील उष्णता इतकी वाढली की, मूळव्याध झाली, केस गळू लागले, पीरियड्स पुढे-मागे झाले, वजन प्रचंड वाढले. हा त्रास इतका होता की अनिशा डिप्रेशनमध्ये गेल्या. त्यांचा कशावरच विश्वास राहिला नाही. त्यांच्या आईने त्यांना कसेबसे निरामयमध्ये आणले. उपचारांच्या पहिल्याच आठवड्यात मूळव्याध कमी झाली, जखम भरून आली. हे पाहून अनिशा यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्याच बळावर त्यांनी उपचार सुरू ठेवले व 3 महिन्यात संपूर्ण रिकव्हर झाल्या. हिमोग्लोबिन नॉर्मल, ब्लड रिपोर्ट्स नॉर्मल, सोनोग्राफीत इन्फेक्शनचा अंशही नाही. हे सगळं घडलं, ते केवळ अनिशा ह्यांची सकारात्मक वृत्ती व स्वयंपूर्ण उपचार पध्दतीमुळेच ! आता अनिशा म्हणतात की, औषधांची गोळी नकोच. स्वयंपूर्ण उपचारच घेऊ. आणि हेच आमच्याकडे आलेल्या हजारो रूग्णांचे मत आहे.
महिलांच्या आजारांबाबत मार्गदर्शन करणारा हा महत्वपूर्ण व्हिडीओ आवर्जून पाहा.