Sakal Swasthaym 5

मधुमेहावर गुणकारी - समान मुद्रा

‘सकाळ स्वास्थ्यम् संघा’च्या नाशिक व संभाजीनगर येथील परिसंवादात अमृता चांदोरकर यांची मुद्रा कार्यशाळा ‘सकाळ स्वास्थ्यम् संघा’तर्फे नाशिक येथे दि. १९ ऑगस्ट व छ. संभाजीनगर येथे दि. २० ऑगस्ट २०२३ रोजी सौ. अमृता चांदोरकर यांचे ‘मधुमेहाशी लढा जिंका, भीतीशिवाय जगा’ या विषयावर व्याख्यान व मुद्राशास्त्र या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली.

या प्रसंगी मधुमेहाबद्दलचे समज व गैरसमज आणि शरीर व मनाला सुदृढ ठेवणारी वैश्विक ऊर्जा, सकारात्मक विचार, तसेच योग्य आहार-विहाराचे महत्त्व सौ. चांदोरकर यांनी अधोरेखित केले. त्यांनी योगमुद्रा कार्यशाळेत पंचतत्त्वांचे संतुलन करणाऱ्या हस्तमुद्रांचे प्रात्यक्षिक दिले. शिवाय ‘निरामय जीवन’सूत्र या अनोख्या दैनंदिनीचे अनावरण करून उपस्थितांना ती देण्यात आली. यामध्ये भारतीय शास्त्रोक्त दिनचर्येची सखोल माहिती देण्यात आली आहे.

या वेळी कार्यक्रमानंतर नाशिक व संभाजीनगर येथील स्थानिक रुग्णांनी अमृता चांदोरकर यांची भेट घेऊन निरामयच्या स्वयंपूर्ण उपचारांमुळे त्यांच्या प्रकृतीत झालेल्या सुधारणांबाबत त्यांना आवर्जून सांगितले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Gallery

Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!