निरामय वेलनेस सेंटर लोकमत 'धन्वंतरी २०२३' पुरस्काराने दुसऱ्यांदा सन्मानित
मागील एक तपाहून जास्त काळ समग्र आरोग्यसेवेच्या मार्गावर निरामय वेलनेस सेंटर अखंडपणे कार्यरत आहे. आत्तापर्यंत एक लाखाहून अधिक रुग्णांना सूक्ष्म देहातील वैश्विक ऊर्जेवर काम करणाऱ्या स्वयंपूर्ण उपचारांच्या माध्यमातून रोगमुक्त करण्यात आले आहे. सशक्त समाजाच्या दिशेने केलेल्या या महत्त्वपूर्ण कार्याची दाखल घेऊन श्रीमती अमृता चांदोरकर, संचालक, निरामय वेलनेस सेंटर, यांना आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘लोकमत धन्वंतरी’ पुरस्कार २०२३ प्रदान करण्यात आला. त्या ह्या प्रतिष्ठित पुरस्काराच्या दुसऱ्यांदा मानकरी ठरल्या आहेत.
दिनांक १ फेब्रुवारी २०२३ रोजी पुण्यातील जे डब्ल्यु मॅरीयट हॉटेलमध्ये झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात श्रीमती चांदोरकर यांना हा पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.