पाठीचा कणा कुरकुरतोय… ऊर्जेद्वारे विनाऔषध, विनाऑपेरेशन बरे व्हा

‘मोडेन पण वाकणार नाही’ अशी प्रवृत्ती बहुतांशी लोकांमध्ये असते. हा जसा मनाचा ताठपणा असतो तसाच शरीरामध्ये पाठीचा कणा असतो. जो आपल्या शरीराचा मुख्य आधार असतो आणि तो जर का वाकला तर भले भले लोक मोडलेले दिसतात. या मणक्याची रचनाही अशी की, 33 मणके एकमेकांवर रचून आपल्या पाठीलाच नव्हे तर संपूर्ण शरीराला आधार देतात. वरचं शरीर आणि खालचं शरीर यांना जोडणारा हा सेतूच ! जर मणका नसेल तर माणूस ना धड बसू शकेल ना उभा राहू शकेल. पण मणका म्हणजे केवळ हाडं नाहीत. तर हाडं आणि स्नायूंचा मिलाफ आहे. आपल्या शरीरातले 33 मणके हे 3 स्नायूंच्या समूहांनी एकमेकांना बांधले गेलेले आहेत. आपल्या शरीरात मुख्य काम हे स्नायूंचं असतं. जर स्नायू कमकुवत झाले तर त्याचा भार हाडांवर येतो. मग हाडे दुखणे किंवा त्यांची झीज होणे हे प्रकार सुरू होतात.

मणक्याच्या दोन हाडांमध्ये स्नायूंच्या गादीसारख्या कुर्च्या असतात. आपण जर नियमितपणे चुकीच्या पध्दतीने वाकत असू, बसत असू किंवा अन्य काही करत असू तर या कुर्च्या बाजूला सरकतात. यालाच वैद्यकीय भाषेत ‘स्लीप डिस्क’ म्हणतात. आपल्या चुकीच्या जीवनशैलीमध्ये मणके दबले गेले किंवा फाकले गेले तर त्यामध्ये गॅप निर्माण होतो, त्याचं नाव स्पाँडेलायसिस !

आपल्या मॉडर्न सायन्समध्ये यासाठी आधी एमआरआय व अन्य तपासण्या केल्या जातात. पण त्यांच्याकडे यावरच्या उपचारांसाठी पेनकिलर्स किंवा ऑपरेशन हे दोनच पर्याय असतात. परंतु निरामयच्या स्वयंपूर्ण उपचार पध्दतीमध्ये आपण उर्जा शरीराचे परिक्षण करतो. आपल्या शरीरात उर्जावाहिनी नाड्यांचे जाळे असते, ज्यातून सर्व अवयवांना उर्जा मिळत असते. त्याचबरोबर हाडं व स्नायूंशी संबंधित तत्वांमधील असंतुलन व दोष यांचेही परिक्षण करतो. आता मणक्याच्या बाबतीत पृथ्वीतत्वाचे प्रामुख्याने निरिक्षण करावे लागते. त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी असणारी विविध तत्वं आणि उर्जावाहिनी नाड्यांचाही अभ्यास केला जातो.

जेव्हां शरीरात मणक्याला ताण येतो किंवा बाक येतो, तेव्हां उर्जा शरीरातल्या उर्जावाहिनी नाड्यांचाही आकार बदललेला असतो. त्या नाड्यांनाही काहीवेळा बाक आलेला असतो किंवा त्यांचा गुंता झालेला असतो. त्यामुळे त्यातील उर्जा शरीराच्या अवयवांपर्यंत पोहचत नाही. काहीवेळेला तिथे अतिरिक्त उर्जाही साचलेली असते. ‘स्कोलीओसिस’ नावाच्या आजारात मणक्याचा आकार बदललेला असतो. अर्थात त्याचबरोबर उर्जावाहिनी नाड्यांची पोझिशनही बदललेली असतेच. अशा परिस्थितीत आपण त्यांना उर्जा उपचार देऊन सर्वात आधी उर्जावाहिनी नाड्या सरळ रेषेत आणतो. त्या सरळ रेषेत आल्या की मणकेही सरळ रेषेत येऊ लागतात. शरीरातला सर्व आजार जर दूर करायचे तर उर्जावाहिनी नाड्या सुस्थितीत हव्यात हे आपल्या प्राचीन आरोग्यशास्त्राचे साधे व सरळ सूत्र आहे. याच सूत्राचा वापर करून आपण उर्जा शरीराचे दोष दूर करतो आणि मग पेशंटला तो बदल शरीरात जाणवू लागतो.

रश्मी इनामदार या मध्यमवयीन गृहिणीला 6 वर्षांपासून स्पाँडेलायटिसचा त्रास होता. त्यातच त्यांचे गर्भाशयही काढले. त्यानंतर त्यांच्या शरीरातील डाव्या बाजूस इतक्या वेदना होत असत की त्या अक्षरशः रडत असत. एकाच बाजूचे डोकं, मान, कान, गाल, गळा, हात आणि पाय भयंकर दुखत असे. त्यावर त्यांनी एमआरआयही काढून पाहिला. पण रिपोर्ट्स नॉर्मल ! आपल्याला काय होतंय, हे न कळलेल्या आणि वेदनांमुळे अगदी घायकुतीला आलेल्या रश्मीताई अखेरीस निरामयमध्ये आल्या. त्यांनी आत्मविश्‍वासाने उर्जाउपचार घेतले आणि काही महिन्यातच त्यांचे सर्व त्रास कमी झाले. त्यांची तीव्र डोकेदुखी आता खूपच कमी झालेली आहे आणि त्या आता इतक्या खूष आहेत की, त्यांना मागचे काही आठवायची इच्छा देखील नाही.

त्यांच्या अनुभवावरून एक गोष्ट सांगाविशी वाटते. ती म्हणजे रिपोर्ट नॉर्मल असलेले अनेक लोक निरामयमध्ये येतात. रिपोर्ट नॉर्मल असल्यामुळे औषधांचे प्रयोग सुरू असतात आणि त्या औषधांचे साईड इफेक्ट्स सहन करत ही मंडळी आमच्याकडे येतात. तेव्हां आम्ही सर्वात आधी त्यांना धीर देतो. कारण आता आपल्याला भयंकर काहीतरी झालेले आहे, या धास्तीनेच ते घाबरून गेलेले असतात. काहींच्या बाबतीत इंटरनेटवरचे ज्ञानही त्यांच्या पोटात गोळा आणणारे ठरते. असे रूग्ण हे केवळ वेदनाच बघत असतात. म्हणजे मानसिक भीतीने त्यांची इतकी पकड घेतलेली असते की शरीरही तसेच वागू लागते. आणि यामुळे होतं काय की, आजार आणखीनच बळावत जातो. यासाठीच आम्ही सांगतो की, तुम्ही मनाने सकारात्मक रहा. आपण बरे होणारच ही खात्री बाळगा. वेदनांकडे लक्ष देऊ नका तर थोडा का होईना जो फरक पडतोय, त्याकडे लक्ष द्या. या आत्मविश्‍वासानेच जयदीप नावाच्या तरूणाने आमच्याकडे उपचार घेतले आणि त्याचा फ्रोझन शोल्डर बरा होऊन तो 6 महिन्यात पुन्हा गाडी चालवू लागला.

रूग्णांची सकारात्मक वृत्ती असेल तरच त्याचे शरीर वैश्‍विक उर्जा ग्रहण करू शकेल आणि आजारातून बरे होईल. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, सूर्य रोज उगवतोच. पण तुम्हीच खिडक्या-दारं बंद करून बसलात तर प्रकाश कुठून येईल? यासाठीच बी-पॉझिटीव्ह. बाकी उपचारांसाठी निरामय आहेच !

मणक्यांच्या आजारासंदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ अवश्य पाहा.

Share this post

Facebook Comments: Please enter a valid URL
Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!