गौरव विद्यार्थ्यांचा, सन्मान प्राचीन शास्त्राचा !
आपले प्राचीन शास्त्र व अभ्यासतंत्रावर आधारित निरामय विद्या प्रोग्रॅमचे हे दुसरे वर्ष ! यामध्ये सहभागी झालेले दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा गौरव सोहळा आज संपन्न झाला. या सोहळ्यास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणूताई गावस्कर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी निरामय वेलनेसच्या संचालिका सौ. अमृता चांदोरकर मॅडम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. यावेळी रेणूताई गावस्कर यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. या सोहळ्यातील ही काही क्षणचित्रे…