Niraamay Parivar

निरामय मधील डॉक्टरांचा अनुभव

Kalpana Potdar

सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया।

सौ.कल्पना संतोष पोतदार

निरामय वेलनेस सेंटर येथे काम करण्याची संधी मला मिळाली. त्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करीत असताना रोज नवे नित्य अनुभव येत आहेत. रुग्णाच्या मानसिक आणि शारीरिक रोगांवर उपचार करताना आपण निमित्तमात्र आहोत ही निरामायची शिकवण कायम स्मरणात असते. उपचारांचा परीणाम रुग्णाच्या चेहऱ्यावर दिसतो आणि ब्रह्मांडातील शक्तीपुढे… तेथे कर माझे जुळती। असे म्हणावेसे वाटते. सप्तचक्रांचे सप्तक जुळून लोकांना निरोगी करताना सप्तसुरांचे स्वर पंचमहाभूतात सामावले जातात. निरामयमध्ये येणाऱ्या पेशंटसना त्यांच्या गरजेप्रमाणे आम्ही उपचार करतो. स्वयंपूर्ण उपचारांमध्ये शरीर व मन दोहोंवर उपचार होतात त्यामुळे रुग्ण बरा होतोच, पण महत्वाचे म्हणजे त्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. निरामयमुळे मला ‘मी’ कळले, आत्मविश्वास मिळाला. अशीच सेवा माझ्या हातून घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व यातून अनेकांचा ऊर्जारूपी आशीर्वाद माझ्या पाठीशी राहील ह्याची मला खात्री आहे.
Ashwini Wankhede 1

निरामय बरोबरचा माझा प्रवास

अश्विनी वानखेडे

आज मी जी काही आहे, ती फक्त निरामयमुळेच. 2011 मध्ये मी प्रथम निरामय सेंटरमध्ये उपचार घेण्यासाठी आले होते. माझा लहानपणापासूनचा सर्दीचा विकार, जो कधीच कोणत्याही उपचारांनी बरा होत नव्हता, तो पूर्णपणे बरा झला. त्या वेळी मी ऊर्जेविषयी बऱ्याच गोष्टी ऐकत होते, वाचत होते. हिलिंग संदर्भात काही कोर्सही केले होते. विपश्यना केली होती. तोपर्यंत मी जे काही शिकले ते फक्त स्वतःपुरते होते. पण निरामयमध्ये आल्यानंतर इतरांसाठी काहीतरी करावे ही भावना जागृत झाली. तो माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा निर्णय ठरला. योगेश सर आणि अमृता मॅडमकडून बरेच शिकायला मिळाले. शांत राहून निरीक्षणातून मी अनुभवसमृद्ध होत गेले. ‘ऊर्जा’ हेच सत्य आहे, तिचा योग्य वापर केला तर आपण खऱ्या अर्थाने निरोगी होऊ शकतो हे समजले. सगळ्याचा कर्ता करविता आपले मन आहे. जसा विचार, तसा परिणाम होत असतो. त्यामुळे आपल्याला हवं असलेलं आरोग्य, संपत्ती, वैभव, समाधान हे सगळं मिळू शकतं, जर तसा विचार केला तर… ही शिकवण इथेच मिळाली. अमृता मॅडम आणि योगेश सर यांचे व्यक्तिमत्व आकाशासारखे विशाल आहे. ते वायूसारखे प्रवाहित आहेत, अग्नीसारखे तेजस्वी आहेत, त्यांचे मन समुद्रासारखे अथांग आहे. निरामयची स्थापना ही संपूर्ण समाजाला निरामय करण्यासाठीच झाली आहे. या प्रवासात आम्ही तुमच्यासोबत आहोत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
Nihaal Shirke

मला आकार देणारे निरामय

निहाल शिर्के

माझा निरामयचा प्रवास बऱ्याच उशिरा सुरू झाला. म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते. तसेच माझ्या बाबतीत झाले. पण निरामयमध्ये आजवर आलेल्या अनेक अनुभवांनी मी एकदम थक्क झाले आहे. सततच्या सकारात्मक विचाराने परमेश्वर माझ्यासोबत आहे आणि तो पूर्णपणे माझी काळजी घेत आहे हे स्पष्ट झाले. मी खूपच छान परिवारात जन्माला आले आणि त्याबद्दल ईश्वराचे  आभार मानावे? हा विचार निरामयमुळे मनात पेरला गेला. राग, चिडचिड करून काहीच साध्य होत नाही. माफ करणे आणि नकळतपणे आपण केलेल्या चुकीच्या कर्माची ईश्वराकडून माफी मागणे हा एकमेव पर्याय आहे. विशेष म्हणजे नंतरच्या काळात हे जमलेदेखील. निरामयमुळे मी अंतरीचा आनंद अनुभवू लागले आहे आणि इतर सगळ्यांनाही ते पटवून देण्याचा प्रयत्न करते आहे. आयुष्य हा सुख-दुःखाचा एक अविरत प्रवाह आहे. आपल्याला प्रत्येक वेळेस त्यांचे स्वागत करून समाधानाने त्या मार्गावर मार्गक्रमण करत रहायचे हे या काळात समजले. हातून काहीतरी चांगलं घडावं यासाठीच परमेश्वराने माझा निरामयपर्यंतचा प्रवास घडवला आहे. नाहीतर दूरदूरवर मी ह्या आध्यात्मिक मार्गात कधी येईन असे वाटले नव्हते. निरामय मला घडवत आहे आणि मी घडत आहे. निरामयचे शतश: आभार.
Pratik Suryavanshi

तिमिरातून तेजाकडे...

प्रतिक सूर्यवंशी

तिमिरातून तेजाकडे… असाच आहे माझा निरामयमधला प्रवास. आयुष्यात कोणतीच गोष्ट विनाकारण घडत नाही यावर असणारा माझा विश्वास निरामयमध्ये येऊन अजून दृढ झाला. निरामयमधल्या कामाचा अनुभव बाहेर कुठे उपयोगी येत नाही, असे बऱ्याच जणांचा पूर्वग्रह आहे. पण निरामयमध्ये मिळणारे ज्ञानच आयुष्यात पुढील वाटचालीस उपयोगी पडते, हा माझा अनुभव आहे. आई-वडिलांनी संस्कारक्षम बनवले, शाळेने सुशिक्षित केले, पण आयुष्यात कसे वागायचे आणि आयुष्य कसे जगायचे, याचे संस्कार निरामयने केले. ते निश्चितच आयुष्यभर उपयोगी पडणार आहेत. ‘निरामय जीवन’चा अर्थ आहे निरोगी आणि आनंदी जीवन. पण याचबरोबर याचा अर्थ असाही कि, इतरांसाठी काही देण्याची भावना मनात ठेवून निःस्वार्थ भावनेने फक्त आणि फक्त देत राहणे. आयुष्यात सर्वांत मोठी संपत्ती कोणती असेल तर ती असते आशीर्वाद आणि केलेल्या कामाचे समाधान आणि लोकांचे आशीर्वाद हे कायमच मला इथे मिळत राहिलेत. ते मला कायम ऊर्जा देऊन जातात. ऊर्जेच्या क्षेत्रात सर्वांपेक्षा एका वेगळ्या वाटेवर आम्ही सर्वजण चालत आहोत. वाट थोडी खडतर आहे, पण या प्रवासाचा अनुभवसुद्धा तितकाच रोमहर्षक आहे. या प्रवासात आलेली प्रत्येक जबाबदारी मला सर्वार्थाने घडवते आहे आणि समाजाचा एक भाग म्हणून मी समृद्ध होत आहे. निरामयमध्ये येणारे रुग्ण ज्या परिस्थितीत इथे येतात आणि काही दिवसांनी त्यांच्यामध्ये जो आमूलाग्र बदल होतो, तो मी खूप जवळून पाहिला आणि अनुभवला आहे. आपल्या घरातील जसा कोपरा न कोपरा आपल्या ओळखीचा असतो, तो आपल्याशी बोलतो, तसे काहीसे माझे निरामयबाबत आहे. योगेश सर आणि अमृता मॅडम यांनी जे स्वप्न पाहिले ते आम्ही सर्वजण प्रत्यक्ष जगत आहोत. आज एकविसाव्या शतकात निरामयच्या माध्यमातून प्राचीन भारतीय संस्कृती आणि निरोगी आरोग्य यांतला एक दुवा बनण्याची संधी आम्हाला मिळते आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
Pallavi Patil

सेवेची संधी देणारे निरामय

पल्लवी पाटील

निरामयमध्ये साडेपाच वर्षांपूर्वी माझा प्रवेश झाला. योगेश सर आणि अमृता मॅडम हे दोघेजण अक्षरश: अखंड ऊर्जेचा स्रोत आहेत. सर नेहमी विचारांना चालना द्यायचे त्यामुळे त्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्याची धडपड, प्रयत्न व्हायचे. सतत शोध घेण्याची, जाणीव जागृत ठेवायची सवय लागली. शिवाय येणारा प्रत्येक रुग्ण हा काहीतरी नवीन शिकवून जायचा. सर आणि मॅडम नेहमी ‘निरामय परिवार’ असे संबोधतात. ते प्रत्येकाला समजून घेतात, मार्ग काढतात, पाठीशी भक्कमपणे उभे राहतात. सर आणि मॅडमनी अतिशय उत्तम रीतीने या उपचार पद्धतीची मांडणी, आखणी केली आहे. मन, शरीर, ऊर्जा, विचार, उपचार ह्या सर्वांचा सुरेख संगम साधला आहे. रुग्णाला बोलते करून हळुवारपणे, आपुलकीने, मोकळेपणाने, उपचार देऊन त्याला त्रासातून मुक्त करण्याचे हे कामच मुळात अभिमानास्पद आहे. हे काम मला खूप आवडले आणि त्यावर माझा जीव आहे. काम तर प्रत्येक माणूस करतोच पण त्यातून जे समाधान मिळते, रुग्णांचे आशीर्वाद मिळतात हे फक्त निरामयमध्येच मिळू शकतात. साक्षात श्रीकृष्णाने सांगितले आहे की प्रत्येक वेदनेमध्ये माझे अस्तित्व आहे आणि अशा परमेश्वराची सेवा करण्याचे भाग्य मला मिळते आहे. दाही दिशांना यत्र-तत्र-सर्वत्र संस्थेची कीर्ती, प्रसिद्धी, प्रचार, प्रसार आणि भरभराट होण्यासाठी मला जितके आणि जेवढे करता येईल त्यासाठी मी तत्पर आहे आणि असेन.
Jyoti Chandorkar 1

शून्यातून निरामयतेकडे...

ज्योती चांदोरकर

माझा निरामय सोबतचा प्रवास म्हणजे वाढत्या आलेखासारखा आहे. हा प्रवास शून्यातून सुरू झाला. मी निरामयला जन्म घेताना पाहिलंय… पण लांबून. त्या वेळी या उपचारपद्धतीवर माझा काडीमात्र विश्वास नव्हता. मी पूर्णपणे अॅलोपथी अनुयायी होते. नंतर अॅलोपथीचा तोकडेपणा खूप जवळून बघितला आणि माझ्यातली मी हलले! विचारचक्र चालू झाले. अॅलोपथीव्यतिरिक्त उपचारपद्धतींचा शोध सुरु झाला. एक दिवस अचानक साम टीव्हीच्या माध्यमातून घरचीच स्वयंपूर्ण उपचारपद्धती समोर आली.

देर आए दुरुस्त आए !… असाच काहीसा माझा निरामय सोबतचा प्रवास सुरू झाला. या प्रवासाला बघता बघता कधी ५ वर्षे पूर्ण झाली कळलेच नाही. निरामयमुळे स्वतःमधले बदल मी तटस्थपणे पाहू लागले. दृष्य म्हणजेच दिसणाऱ्या जगापेक्षाही न दिसणारे (अदृश्य) शाश्वत जग खूप मोठे आहे, हे समजून घेऊन, समजावून देणे सुरू झाले. त्यातून नवनवीन रहस्य उलगडू लागली. निर्भेळ आनंदही मिळू लागला. रोज नवे अनुभव, नवे ज्ञान, नवा आनंद, असा खेळ सुरू झाला. याचे पूर्ण श्रेय माझे सहकारी आणि अर्थातच निरामयचे सर्वेसर्वा श्री. योगेश चांदोरकर आणि सौ. अमृता चांदोरकर यांनाच!

विशेष नमूद करण्यासारखे म्हणजे सरांनी कधीही स्पून फीडिंग केले नाही. त्यामुळे विचार करण्याशिवाय पर्यायच नव्हता. ज्यातून विचार प्रगल्भ होत गेले. वागण्यात ठामपणा आला. आलेला प्रत्येक उपचारार्थी (पेशन्ट) म्हणजे नवीन धडा, जो खूप काही शिकवून जातो. त्यांचे अनुभव आश्चर्यचकित करणारे असतात. निरामयबद्दल एका शब्दात सांगायचे झाल्यास ‘निरामय’ म्हणजे असा ‘कल्पवृक्ष’ आहे, ज्याच्या सावलीत तुम्ही ज्या धारणेने याल, तेच तुम्हाला लाख पटीने मिळेल. हा वृक्ष नुसता लांबून जरी पाहिलात तरी डोळ्यांना, मनाला तृप्तता, शांतता लाभेल.

निरामय मधील स्टाफचा अनुभव

Rupali R Kadam

आयुष्याला कलाटणी

रूपाली र. कदम

आईच्या आजारपणात माझी निरामयशी ओळख झाली. उपचार सुरू झाल्यानंतर तिच्यात बरेच चांगले बदल दिसून आले. संपूर्णतः जायबंदी झालेली माझी आई घरातल्या घरात छान वावरू लागली. मात्र परमेश्वराच्या ईच्छेपुढे  कुणाचे चालते? डिसेंबर २०१५मध्ये तिला देवाज्ञा झाली. आई गेल्याचे कळविण्यासाठी आणि घेतलेल्या उपचारांचे पैसे देण्यासाठी मी सौ. अमृता चांदोरकरांना परत भेटले. मॅडमनी ते पैसे स्वीकारले नाहीत. निरामायचे हे तत्व आहे की, जर रुग्ण वाचू शकला नाही तर त्याचे कितीही बिल राहिले असले तरी ते घेतले जात नाही. हा खरेपणा मनाला स्पर्शून गेला आणि एप्रिल २०१६पासून माझा निरामयबरोबरचा प्रवास सुरू झाला.

स्वयंपूर्ण उपचारपद्धतीची ओळख झाली. सततच्या मार्गदर्शनातून समज वाढली, बुद्धीची कक्षा रुंदावली. सिव्हील इंजिनीयर असणारी मी वेगळ्याच प्रतलातील या ज्ञानाने आणि अनुभवाने समृद्ध होत गेले. मार्च २०२०मध्ये पहिला लॉक डाऊन सुरू झाला. अशा वेळेस निरामय एक संस्था म्हणून नाही तर भक्कम आधार बनून पाठीशी उभी राहिली. याच काळात रुग्णांसाठी ऑनलाइन ओ.पी.डी. सुरू झाली. वाईटातूनही काहीतरी चांगले निष्पन्न होत असते हा दृष्टीकोन त्या दिवसांनी दिला.

आईच्या जाण्याने निर्माण झालेली रिक्तता स्वीकारण्यासाठी निरामयच्या कुटुंबाची साथ फार मोलाची ठरली. या समृद्ध करणाऱ्या प्रवासात सहा वर्षे बघता बघता कशी निघून गेली हे कळलेच नाही. जे आहे ते सर्व छान आहे, निरामयचा सर्वदूर प्रचार होवो. आम्हाला या कामात असेच समाधान आणि रुग्णांचे आशीर्वाद मिळत राहो हीच ईश्वराकडे प्रार्थना. धन्यवाद.

Apoorva Joshi 1

माझा निरामयमधील प्रवास

अपूर्वा जोशी

मी निरामयमध्ये आले तेव्हा ऊर्जाशास्त्र या विषयी पूर्णपणे अनभिज्ञ होते. हा जड विषय खूप सोपा करून शिकवला गेला. पेशंटच्या अडचणी समजून त्याला मार्गदर्शन किंवा समुपदेशन करणे आवडू लागले. आजही हे शिक्षण सुरू आहे. निरामयमध्ये मिळणारे मार्गदर्शन मला वैयक्तिक पातळीवरदेखील उपयुक्त ठरते आहे. मॅडम व सरांकडून सर्व विषयांची सखोल माहिती मिळते. विचार कसे असावेत? शब्दोच्चार कसा असावा? त्याचा कसा परिणाम होतो? हे खूप महत्वाचे तंत्र निरामयमध्ये शिकता आले. रोज होणारे मेडिटेशन मला वेगळीच शांतता देते. माझ्या मनात कायम एक इच्छा होती की, लोकांसाठी काहीतरी चांगलं काम करता यावं. ती इच्छा निरामयमुळे पूर्ण झाली. एक वडीलधारी व्यक्ती म्हणून सरांचा नेहमी आधार वाटतो. सर नेहमी म्हणतात, जे काम कराल ते आनंदाने करा. प्रत्येक कामात आनंद शोधा. निरामयमध्ये आल्यावर माझ्यामध्ये अमूलाग्र बदल होत गेले. माझी आई म्हणते की, निरामयमध्ये येण्याआधीची मी आणि आताची मी यांत खूप फरक आहे. यापेक्षा अजून काय पोहोचपावती पाहिजे? येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीवर कशी मात करायची हे निरामयने शिकवलं. निरामयचे कार्य आता सगळ्या जगात पोहोचवायचे आहे. निरामय हा एक परिवार आहे आणि या परिवारासाठी प्रयत्न करणे हे आम्हा सर्वांचेच कर्तव्य आहे. मला दिलेल्या संधीसाठी मी योगेश सर व अमृता मॅडम यांची ऋणी आहे.
Pallavi Jadhav Pawar

अत्यंत उपयुक्त तंत्र

पल्लवी जाधव पवार

निरामयसोबत काम करायला सुरुवात करून तीन वर्षे पूर्ण झाली. रीतसर ट्रेनिंग झाले आणि कामाला सुरुवात झाली. सुरूवातीला फार वेगळे वाटत होते, कारण हा विषय माझ्यासाठी पूर्ण नवीन होता. पेशंटचे स्कॅनिंग, ट्रीटमेंट करणे, अनुभव सांगणे हे प्रशिक्षण सुरूच होते. हळूहळू बारीकसारीक बदलांची, सुधारणांची जाणीव होत होती. फोनवरून ट्रीटमेंट द्यायला लागल्यानंतर, आपण कोणासाठी तरी आनंद निर्माण करतोय ही भावनाच खूप आनंद देणारी होती. या भावनेतून मग पेशंटची ट्रीटमेंट करताना उत्साह वाढत गेला. कोरोनाच्या काळात जेव्हा समोरून प्रतिक्रिया यायच्या की, आम्हाला तुमच्या ट्रीटमेंटची खूप मदत झाली. आम्हाला निरामय माहिती नसतं तर आमचं काय झालं असतं? तेव्हा आपण निरामयमध्ये काम करतो याचा अभिमान वाटायचा. आता मला स्वतःला जरी काही अडचणी आल्या, तरी सोडवता येतात. हे कुठेही शिकता आले नसते. कोणताही नकारात्मक विचार मनात आला की, लगेच तो सकारात्मकतेत परिवर्तीत करायची कला इथल्या प्रत्येकाला अवगत झाली आहे. मॅडमच्या आणि सरांच्या मार्गदर्शनामुळे आता प्रत्येक गोष्ट विचारपूर्वकच केली जाते. कायम निरामयसोबत राहून मनाने व ज्ञानाने प्रगल्भ होत जावे हीच देवाकडे प्रार्थना.
Apeksha Nikam 1

अभिमान निरामय

अपेक्षा निकम

मी २०१७ पासून निरामयसोबत आहे. सुरूवातीला आपण खाल्लेल्या अन्नातून ऊर्जा मिळते इतकेच माहिती होते. ऊर्जादेह, पंचतत्व, सप्तचक्र, सप्तकोश हे नवीन शिकायला मिळाले. तोपर्यंत जगात इतके वेगवेगळे आजार असतात, याचा कल्पनाही नव्हती. अवयवामध्ये साठलेली अनावश्यक ऊर्जा हळूहळू स्वच्छ करता येते आणि त्याने पेशंटला त्रासामधून रिलीफ मिळतो हे शिकायला मिळाले. पेशंटची ट्रीटमेंट केल्यानंतर जेव्हा ते म्हणतात की, मला पहिल्यापेक्षा खूप बरे वाटते आहे, तेव्हा आम्ही कृतकृत्य होतो. मिळणाऱ्या या आशीर्वादाचे मोल दुसऱ्या कशातच होऊ शकत नाही असे मला वाटते. निरामयमध्ये आल्यावर एक सुंदर संकल्पना मी शिकले, ती म्हणजे ‘क्षमायाचना’. यामुळे आपण कितीतरी व्याधींतून मुक्त होऊ शकतो. वेळोवेळी होणाऱ्या चर्चा आणि ट्रेनिंगमुळे, ट्रीटमेंट करण्यामध्ये तर सुधारणा झालीच. पण पेशंटची ट्रीटमेंट करताना त्याचा चांगला परिणाम माझ्या शरीरावर, मनावरदेखील होत गेला. निरामयमध्ये आल्यापासून माझे छोटे-छोटे त्रास पूर्णपणे निघून गेले. ही ट्रीटमेंट आपण पेशंटला तर देतोच, पण स्वतःला व आपल्या कुटुंबियांनासुद्धा उपचार देऊ शकतो, हा खूप मोठा लाभ झाला. निरामयमुळे आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीशी जोडले गेलो याचा आनंद आहे. मी निरामयचा एक भाग आहे, याचा अभिमान वाटतो.
Rutuja Battul 1

निरामयमुळे सकारात्मकता आली

ऋतुजा बत्तुल

मी निरामयमध्ये नोकरी करायच्या आधी अहमदनगर येथे एका मेडिकल एजन्सीमध्ये नोकरी करायचे. मेडिकलमध्ये आयती गोळी देणे खूप सोपे असते. पण निरामयमध्ये समजलं की विनाऔषधसुद्धा मुळासकट आजार बरा होऊ शकतो. निरामयमुळे मी कायम सकारात्मक राहायला शिकले. मला सप्तचक्र, नाड्या, पंचतत्त्व यांची ओळख निरामयमध्ये आल्यामुळेच झाली. आॅरा स्कॅनिंग काय असते? हे समजायला लागले. उपचार केल्यानंतर पेशंट जेव्हा आम्हाला आशीर्वाद देतात, ते ऐकून खूप प्रसन्न वाटते. माझ्या घरामध्येसुद्धा माझा मुलगा आणि मुलीची ट्रीटमेंट मी सहजरित्या करते. सासूबाईंचे पण गुडघे दुखायचे, स्वयंपूर्ण ट्रीटमेंट करूनच त्यांचे गुडघे दुखणेही कमी झाले आहे. मी अशा ठिकाणी नोकरी करते, जिथे पैसे कमविणे नाही तर लोकांची सेवा करणे हे ध्येय आहे, याचा मला खूप अभिमान वाटतो. जिथे सर्वांनी जीवन कसे जगावे? हे शिकवले जाते. मॅडमची शांत वृत्ती आणि सरांचे समृद्ध विचार यांची सांगड घालून हे कुटुंब उभारले आहे. या कुटुंबाची वाढ करण्याची जबाबदारी आता आमची आहे.
Jyotsna Dhavade

विश्व निरामय होवो

ज्योत्स्ना धावडे

६ वर्षं एका कुटुंबाप्रमाणे निरामयसोबतच्या प्रवासात मला अनेक अनुभव आले. नवनवीन जबाबदाऱ्या पार पाडता आल्या. त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. ‘निरामय’मुळे माझे आयुष्य घडत गेले, जे मला माझ्या रोजच्या आयुष्यातही फार उपयोगी ठरले. सर्वप्रथम अमृता मॅडमनी मला विश्वास दिला की, प्रत्येक अडचणीवर उपाय आहे. मात्र तो आपल्याला शोधावा लागतो. अडचणी आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतात, त्यातून योग्य ते शिकायचं आणि घटना सोडून द्यायच्या. निरामयमधील काम हे मला आत्मिक समाधान देणारे आहे. बरेचदा इतरांना होणारे त्रास पाहून आपण इतरांच्या मानाने खूप सुखी आहोत याची जाणीव होते. मी मनातल्या मनात ‘निरामय’ आणि देवाचे आभार मानते. निरामयचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे शिस्तीबरोबर इथे संस्कार पण जोपासले जातात. देवाने मला अनेक अडचणी दिल्या पण त्या सर्वावर पर्याय होता ‘निरामय’. सर, मॅडम दोघेही आमच्यासाठी सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहेत. भविष्यात निरामयची खूप प्रगती होवो. अगदी प्रत्येक घराघरात, विश्वात निरामय पोहोचो ही सदिच्छा. धन्यवाद!
Sandhyarani Nikalje 1

कठीणकडून सहजतेकडे...

संध्याराणी निकाळजे

मी निरामय मध्ये आले तेव्हा स्वयंपूर्ण उपचारपद्धतीविषयी अगदीच अनभिज्ञ होते. खरंच अशी काही उपचारपद्धती असते का? आपण हे करू शकू का? असे अनेक प्रश्न मनात होते. मॅडम आणि सर सतत मार्गदर्शन करत गेले, ज्यामुळे मी अधिक प्रगल्भ होत गेले. निरामयमध्ये श्री. योगेश सर आणि सौ.अमृता मॅडम यांनी सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलेले आहे. जसे की, मधमाशा एकत्र येऊन मधाच्या पोळ्यात उत्तम मधाची निर्मिती करतात. तसेच निरामयमधील सर्व सहकारी एकाच छताखाली पेशन्टला बरं होण्यास मदत करतात आणि शेवटी मधाप्रमाणे प्रत्येक पेशंटच्या आयुष्यात स्वयंपूर्ण उपचाराने गोडी निर्माण करतात. कित्येक वेळा निरामय ग्रुपवर कोणीतरी कोणा गरजूच्या ट्रीटमेंटसाठी मेसेज करतो आणि कोणीही कुठेही असले तरी सगळे मिळून त्या पेशंटची ट्रीटमेंट करतात. सर्व उपचारकांनी केलेल्या उपचारांमुळे त्या पेशंटला लवकर बरे वाटते. इथे प्रत्येक जण इतरांच्या आनंदासाठी आनंदाने काम करतो, हे निरामयचे वेगळेपण आहे. आयुष्यात अनेक प्रश्न आहेत. पण निरामयमुळे माझा प्रवास कठीण ते सहज असा होत आहे, जो अतिशय सुलभ, सुंदर आहे. मॅडम-सरांचे मार्गदर्शन मला सतत मिळत राहो, ज्ञानात आणखी भर पडत राहो, माझे जीवनही निरामय होवो हीच सदिच्छा…

Rushikesh Pandit

आत्मविश्वास निर्माण झाला

ऋषिकेश पंडित

मी निरामयमध्ये येण्याआधी खूप वेगळा होतो. पण अध्यात्माची आवड मात्र होती. त्यामुळे मी येथे आनंदाने कामाला सुरुवात केली. मला दिसायचे की, डॉक्टरांना भेटण्याआधी पेशंट खूप दुःखी असायचे आणि नंतर डॉक्टरांना भेटल्यानंतर, उपचार घेतल्यानंतर एक प्रकारचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचे. फोनवर पेशंट्स सांगायचे की सर आणि मॅडम हे आमच्यासाठी देव आहेत. हे ऐकून मनोमन वाटायचे की आपण खूप चांगल्या ठिकाणी जॉब करतो आहोत. खूप छान अनुभव येत गेले, ज्ञानात भर पडत गेली. केवळ मॅडम आणि सरांचे युट्यूबवरील विविध व्हिडिओ बघून पेशंटच्या मनःस्थितीत अमुलाग्र बदल होत होता, तसाच माझ्यातही झाला. कुठल्याही संकटामुळे हातपाय गाळून न बसता, त्यातून मार्ग काढायचा आत्मविश्वास माझ्यात निर्माण झाला. कोरोना काळात प्रत्येक चक्रावरची माहिती आणि मेडिटेशन, त्यानंतर सर्वांना येणारे अनुभव खूप चांगले होते. निरामयच्या सान्निध्यात आल्यानंतर सर्व दुःख विसरणे शक्य होते. माझ्यासोबत निरामयची इच्छाशक्ती आणि निरामयचे सकारात्मक विचार कायम असतात. मोठी संकटे नष्ट करण्याचे सामर्थ्य आपल्या मनामध्ये असते हे निरामयमध्ये आल्यानंतर मला कळले. इथे फक्त पैसा कमवणे हे उद्दिष्ट नाही तर पेशंटला आरोग्य मिळवून देणे इप्सित आहे. मला इथे खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत आणि मिळत राहणार आहेत, याबद्दल मी निरामयचा ऋणी आहे.
Nitin Shinde 1

समाजसेवेची जबाबदारी

नितीन शिंदे

निरामयसारख्या एवढ्या मोठ्या संस्थेचा मी एक भाग होईन असे मला कधीच वाटले नव्हते. ट्रेनिंग सुरू झाले तेव्हा कामाचे स्वरूप समजले आणि आश्चर्य वाटले की विनास्पर्श, विनाऔषध रुग्णांना नैसर्गिक ऊर्जेचा वापर करून कसे बरे केले जाते. यावर सुरुवातीला माझा विश्वास बसत नव्हता, कारण यापूर्वी असे काही ऐकलेच नव्हते. जेव्हा जगावर कोरोनासारख्या महामारीचे संकट आले, तेव्हा निरामयने पेशंटसाठी संजीवनीसारखे काम केले. सर्व काही बंद असताना पेशंटला ट्रीटमेंट मिळावी यासाठी अनेक जणांनी २४ तास सेंटर मध्ये राहून सेवा देत होते. कोरोनाशी लढण्यासाठी मानसिक व शारीरिक ताकत ही ऊर्जेच्या स्वरूपात दिली जात होती. त्यामुळे त्यांच्या प्रतिकारशक्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन, ते कोरोनाशी सामना करू शकले. लोकमत तसेच साम वाहिनीतर्फे कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ‘निरामय वेलनेस सेंटर’ला स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरवले गेले. या पुरस्काराचे श्रेय सर आणि मॅडमनी आम्हा सर्वांना दिले, त्यावेळी खूप अभिमान वाटला. निरामयला लोकांचा उदंड पाठींबा आहेच पण, साम टीव्ही, युट्युब, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, आकाशवाणी इत्यादी सोशल मीडियाच्या माध्यमातून निरामय जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचत आहे. यापुढेही निरामयकडून असेच समाजकार्य व सेवा घडत राहावी आणि आम्हीही त्यामध्ये आमची जबाबदारी पार पाडावी हीच इच्छा…
Shruti Saundattikar

अमुलाग्र बदल घडविणारे निरामय

श्रुती सौंदत्तीकर

माझ्या भावाच्या आजारपणात निरामयची ओळख झाली. त्याच्यात पडलेला आश्चर्यकारक फरक पाहून मी अवाक् झाले. अशा कामात आपणही सहभागी व्हावे असे वाटले आणि २०१५ साली मी निरामय परिवाराचा एक भाग झाले. इथे आल्यावर सर्वप्रथम ऊर्जाविश्व, पंचतत्त्व, सप्तचक्र यांविषयी खूप नवीन माहिती मिळाली. आयुष्यात आजारांना रामराम केला, भीती कमी झाली, कुठलीही परिस्थिती आली तरी ती स्वीकारायला शिकले. प्रत्येक गोष्टीचा दोन्ही बाजूने विचार करायला शिकले. त्यामुळे आयुष्यात आलेली दुःख पचवायला आणि पुन्हा नव्याने उभी राहायला शिकले. मूळ भित्र्या स्वभावाची, सतत चिंता-काळजी करणारी मी, निरामयमध्ये येऊन पूर्णपणे बदलून गेले. निरामय हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पाॅईंट ठरला. धन्यवाद.
Amruta Magdum 1

ताजेतवाने करणारा नवीन अनुभव

अमृता मगदूम

माझी आई निरामयची ट्रीटमेंट घेत होती, तेव्हा तिच्या सांगण्यावरून मी निरामयला नोकरीसाठी विचारणा केली आणि २०१५ मध्ये रुजू झाले. इथे आल्यावर माझ्यासाठी एक विलक्षण असे नवीन विश्व खुले झाले, ज्याचा मी कधीही विचार केला नव्हता. रिसेप्शनला असल्याने रुग्णांशी थेट संवाद होत होता. त्यामुळे रूग्णांना येणारे नवनवीन अनुभव जवळून बघता आले. निरामयप्रती त्यांची असणारी कृतज्ञतेची भावना, आमच्याबद्दल वाटणारा आपलेपणा, स्नेह पाहून, आपण निरामयचा एक भाग आहोत या विचारानेच ऊर भरून येत असे. मला स्वतःला कोविड झाला तेव्हा, केवळ निरामयचे सकारात्मक विचार आणि उपचार यामुळे मी त्यातून सुखरूप बाहेर पडले. निरामय परिवार हे खरंच एका कुटुंबाप्रमाणे आहे, त्यामध्ये डॉक्टर, उपचारक, इतर स्टाफ आणि रुग्णदेखील समाविष्ट आहेत हे विशेष. या ऊर्जामय प्रवासाचे सहयात्री असण्याचा आम्हा सर्वांनाच सार्थ अभिमान आहे.
Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!