ध्येय आणि लक्ष्य

ध्येय

प्राचीन भारतीय शास्त्राचे ज्ञान आणि जीवनपद्धतीच्या माध्यमातून, प्रत्येक मनुष्याचे जीवन संपूर्ण आरोग्याच्या सुखाने समृद्ध करून पूर्णत्वाच्या आनंदाकडे घेऊन जाणे, तसेच आपले हे प्राचीन ज्ञान आणि जीवनपद्धतीचा अखिल विश्वात प्रचार – प्रसार करणे.
ध्येय 01

उद्देश्य

  • स्वयंपूर्ण उपचारांच्या माध्यमातून प्राप्त होत असलेल्या आरोग्याचा जनसामान्यांमध्ये प्रचार – प्रसार करत, प्रत्येक व्यक्तीला याचा लाभ मिळवून देणे.
  • विविध संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच इतर माध्यमांचा योग्य वापर करून या प्राचीन भारतीय ज्ञानाचा संपूर्ण विश्वात प्रचार आणि प्रसार करणे.
  • आरोग्यसंस्थांकडून मान्यता मिळवण्यासाठी आणि शिक्षण संस्थांनी त्यांच्या अभ्यासक्रमात या विषयाचा अंतर्भाव करण्यासाठी प्रयत्नशील रहाणे.
  • स्वयंपूर्ण उपचारांच्या माध्यमातून निरामय संस्थेने दाखवलेला प्राचीन भारतीय जीवनशैलीशी निगडित हा मार्ग संपूर्ण मानवजातीपर्यंत पोहोचवणे.
  • प्राचीन भारतीय ज्ञानाची जोपासना, संस्कृतीचे संवर्धन आणि विकासासाठी समर्पणभावाने प्रयत्नशील असलेल्या प्रत्येक व्यक्ती आणि संस्थांना प्रोत्साहन देणे.

आमचे लक्ष्य

आमचा उद्देश प्राचीन भारतीय आध्यात्मिक ज्ञान, आरोग्यविषयक ज्ञान आणि संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या गैरसमजांना दूर करून, या ज्ञानाचे वैज्ञानिक स्वरूप पुन्हा समाजासमोर आणून, मनुष्याला त्याच्या क्षमतांची ओळख करून देणे हे आहे. आमची संस्था आणि संस्थेचा प्रत्येक सदस्य आपल्या सेवांच्या माध्यमातून स्वस्थ आणि सशक्त समाजाची रचना करण्यासाठी कटिबद्ध आहे.

निरामय आदर्श

आमचे लक्ष्य 01
Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!