स्वयंपूर्ण
ध्यान
ध्यान - मनाची शुद्धी व विश्वरूप दर्शन
ध्यान – कर्ममार्गावर असतानाच शाश्वत आनंदाकडे जाणे हे मनुष्य जन्मात शक्य आहे असे आपले प्राचीन शास्त्र सांगते. ध्यानातून षड्रिपूंवर विजय मिळवून ऐहिक व आध्यात्मिक प्रगती दोन्ही शक्य आहेत. मनाचे शुद्धीकरण करून त्या दिशेने जाणारा मार्ग आज शोधूया. तुमच्या आराध्य देवतेच्या भव्य व रम्य मंदिरात मिळालेली अनुभूती आठवतेय का? मंत्रमुग्ध करणारा तेथील धीरगंभीर घंटानाद आठवतोय का?
वैश्विक चैतन्याचे साधन म्हणून कार्य केल्यास नेमकी कोणती शक्ती प्राप्त होते? स्वतःमधील मीपणा परमेश्वराला पूर्णपणे समर्पित केल्याने आयुष्यात काय जादू होते? अशा प्रकारे मिळालेल्या आत्मिक आनंदातून सत्कर्मात रत झाल्याने काय होते? निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर यांच्या समवेत ध्यान करताना जीवा-शिवाच्या विस्मयकारक भेटीचा मागोवा घ्या. सदर व्हिडीयो नक्की पहा व शाश्वत आनंदाच्या शोधात असलेल्या सर्वांना पाठवा!