या कार्यक्रमात ‘निरामय जीवन-सूत्र’ ही अनोखी दैनंदिनी उपस्थितांना देण्यात आली. यामध्ये पारंपारिक भारतीय शास्त्रोक्त दिनचर्येची सखोल माहिती देण्यात आली आहे. त्याचे प्रत्यक्ष पालन करून नोंदी ठेवल्यास आरोग्यविषयक लाभ झालेल्या निवडक पाच लोकांना निरामयतर्फे सन्मानित करण्यात येणार आहे. या वेळी सौ. सन्मिता धापटे-शिंदे व श्री. गणेश शिंदे यांनी संत ज्ञानेश्वरांच्या स्वास्थ्यविषयक अभंग व ओव्यांवर संगीतमय निरुपण सादर केले. सकाळ स्वास्थ्यम् संघाच्या या संपूर्ण उपक्रमाचा ऊर्जा पार्टनर म्हणून निरामय वेलनेस सेंटर महत्त्वाची भूमिका बजावित आहे.
धारणा व ध्यानातून मिळवा संपूर्ण स्वास्थ्य
सकाळ स्वास्थ्यम् संघाच्या कोल्हापूरातील परिसंवादात अमृता चांदोरकर यांचे ध्यानातून सकारात्मकता निर्माण करण्यावर मार्गदर्शन
सकाळ स्वास्थ्यम् संघातर्फे कोल्हापूर येथे केशवराव भोसले नाट्यगृहात दि. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी सौ. अमृता चांदोरकर यांचे धारणा व ध्यानातून मिळणारे आरोग्य यावर व्याख्यान व सामुहिक उपचार प्रात्यक्षिक संपन्न झाले. कोल्हापूरकरांचा उदंड प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमात त्यांनी संपूर्ण स्वास्थ्य मिळविण्यासाठी शांत, तृप्त व स्थिर मनाचे महत्त्व अधोरेखित केले. मनाने केलेला निश्चय किंवा संकल्प हीच आपली धारणा बनते आणि त्यानुसार सकारात्मक किंवा नकारात्मक प्रत्यय येतात. ध्यानाच्या स्थितीत लक्ष केंद्रित झाल्यावर मिळणारी अनुभूती स्वास्थ्य राखण्यासोबतच चिरकाल टिकणारा आनंद प्रदान करते. त्या पुढे म्हणाल्या की आपल्याला काय हवंय हे निश्चित झाले की ध्यानाचे विलक्षण लाभ दिसू लागतात!