‘त्या 4 दिवसांसाठी’ आयुुष्यभर प्रभावी ठरणारी स्वयंपूर्ण उपचार पध्दती !

प्रत्येक स्त्रीला महिन्यातले ‘ते 4 दिवस’ जरा त्रासदायकच ठरतात. पण असं काय घडतं त्या 4 दिवसात, ज्यामुळे आपल्याला त्रास होतो? तर ह्याचं सोप्या भाषेतलं उत्तर म्हणजे आपल्या शरीरातील प्रजनन संस्थेवर जो ‘ओव्हरलोड’ येतो, ते शरीर बाहेर टाकून देतं. आता हा ‘ओव्हरलोड’ कशामुळे येतो तर आपल्याच चुकीच्या जीवनशैलीमुळे ! आपण जे दूषित अन्न खातो, पोषक आहार घेत नाही आणि हल्ली एकमेकांबद्दल आपल्या मनात प्रेम किंवा आपुलकीही राहिलेली नाही. ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होणे, अंगावरून जाणे, पाळी नियमित नसणे अशा विविध समस्या, ज्या केवळ शरीरचक्र बिघडल्यामुळे घडतात.

बाहेरचं निसर्गचक्र बिघडलं म्हणजे झाडं तोडली जात आहे आणि ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे. निसर्गात जर असंतुलन झालं तर विविध समस्या आपल्याला जाणवतात तसंच शरीरचक्राचंही गणित आहे. अग्नितत्व वाढलं की त्याचा विपरित परिणाम जलतत्वावर होणारच. हीच उष्णता वाढल्यामुळे हल्ली जवळपास प्रत्येकाला पित्ताचा काही ना काही त्रास आहेच. मासिक पाळीच्या चक्रात जलतत्वाचं संतुलित असणं अत्यंत महत्वाचं आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. शरीरवर फक्त खाण्याचा परिणाम होत नाही तर वाईट विचारांचा, संस्कारांचाही परिणाम शरीरावर होत असतो. आज नातेसंबंध इतके ताणले गेलेले आहेत की प्रत्येक शरीराला स्ट्रेस म्हणजे तणाव आहेच. ह्या तणावातील स्त्रीची मासिक पाळी कशी नीट असेल?

मुरूड जंजिराच्या नीता पाटील ह्या 35 वर्षांच्या गृहिणीला मासिक पाळीत इतका त्रास व्हायचा की त्या झोपून असायच्या. एवढंच नव्हे तर वेदनांमुळे अक्षरशः लोळायच्या. अशा परिस्थितीत त्या निरामय सेंटरमध्ये आल्या आणि स्वयंपूर्ण उपचार घेऊ लागल्या. त्यानंतर थोड्याच काळात त्यांचे हे त्रास हळूहळू कमी होत गेले आणि त्याचबरोबर त्यांचा चष्माही कायमचा गेला.
ओटीपोटात प्रचंड दुखणे किंवा कंबर दुखणे असा त्रास प्रत्येक महिलेला प्रत्येक महिन्याला जाणवतो. पण तो का होतो तर जलतत्व व अग्नितत्वांमधील असंतुलन. निरामय सेंटरमध्ये आम्ही ह्या असंतुलित तत्वांवर उपचार करतानाच सर्व चक्रांवरही काम करत असतो. त्यामुळे तुमची मूळ समस्या तर दूर होतेच शिवाय पाटील ताईंसारखा चष्म्याचा त्रासही कायमचा जातो. कारण ह्या उपचारांनी तुमच्या शरीरातील अवयवांना ताकद मिळते आणि ते पुन्हा कार्यक्षम होऊ लागतात.

नीतिशा ही पीचडी करणारी तरूण मुलगी. मासिक पाळी सुरू झाली की ह्या मुलीला थेट दवाखान्यात अ‍ॅडमिट करावे लागत असे. कारण तिला त्यावेळेस इतके जुलाब होत असत की, तिच्या अंगात त्राणच उरत नसे. काहीही खाल्ले की पचत नसे आणि शेवटी सलाईनवर तिला रहावे लागे. एक दिवस तिच्या आईने तिला हॉस्पिटलमधून थेट निरामय सेंटरमध्ये आणले. आमच्या डॉक्टरांनी तिच्या सर्व चक्रांवर एकाच वेळी स्वयंपूर्ण उपचार सुरू केले. कालांतराने तिचा त्रास हळूहळू कमी होत गेला. तसे आम्ही तिला थोडे थोडे खाण्याचा सल्ला दिला. जे ती खाईल ते पचते की नाही हे पाहण्याचा उद्देश होता. जसजसे अन्न पचताना दिसत गेले तसे तसे आम्ही तिचा आहार वाढवत गेलो. आता तिची मासिक पाळी नियमित येते, तिला त्रासही कमी आहे आणि मुख्य म्हणजे हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करण्याची आता गरज राहिलेली नाही.

मासिक पाळीतला आणखी एक त्रास म्हणजे अंगावरून पांढरे जाणे. हे पांढरे जाणे म्हणजे काय तर शरीरामध्ये असे काही तरी निर्माण होत आहे की जे शरीराला योग्य प्रतीचे वाटत नाही आणि म्हणून शरीरच ते बाहेर टाकून देते. त्यामुळे मात्र महिलांना प्रचंड अशक्तपणा किंवा थकवा जाणवतो. काही वेळा उग्र दर्पही येतो याचा अर्थ काहीतरी जंतू संसर्ग झालेला आहे. निरामयमध्ये आम्ही तुमच्या शरीराचे व मनाचे संपूर्ण विश्‍लेषण करूनच उपचारांना सुरूवात करतो. त्यामुळे उपचार सुरू झाल्यावर ही लक्षणं दिसणं आपोआपच बंद होतं.

पूर्वा फुलंब्रीकर ह्या 30 वर्षीय तरूणीला गेल्या 15 वर्षात नैसर्गिक पाळी आलीच नव्हती. हार्मोन्सच्या गोळ्या देऊन तिचं मासिक चक्र फिरवण्यात येत होतं. पण त्या औषधांचा शरीरावर विपरित तो परिणाम झालेलाच होता. पण पूर्वा जशी निरामय आली आणि स्वयंपूर्ण उपचार घेऊ लागली तसं 3-4 महिन्यात तिची मासिक पाळी नैसर्गिकरित्या आली. आणि आता तिची मासिक पाळी नियमित आहे व त्रासही कमी झालेला आहे. या केसमध्ये आम्ही तिच्या हार्मोन्सच्या गोळ्या आधी पूर्ण बंद केल्या. डॉक्टरांनी तर तिच्या दोन्ही ओव्हरीज निकाम्या झाल्या असून त्या काढून टाकायला हवं असं सांगितलं होतं. मुळात आधुनिक वैद्यकशास्त्र हे शरीराला एक मशीन मानतं. त्यामुळे ‘सब घोडे बारा टक्के’ ह्या न्यायाने सर्व आजारांवर सर्वांसाठी एकच औषध. ह्या उलट आपलं प्राचीन आरोग्यशास्त्र, जे प्रत्येक शरीराची आधी ‘प्रकृती’ तपासतं आणि मगच इलाज करतं. आपल्या प्राचीन आरोग्यशास्त्रात कुठलाही अवयव निकामी नसतो. तर तो कार्यक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातात. हेच आम्ही निरामयमध्ये करतो.

आज मासिक पाळी खूप अलीकडच्या वयामध्ये येताना दिसते तर बहुतांशी मुलींना ती येत नसल्याचेही आढळत आहे. याचाच पुढचा दुष्परिणाम म्हणजे तरूणपणात येणारे वंध्यत्व आणि त्यासाठी मग आयव्हीएफ किंवा टेस्ट ट्यूब बेबी सारखे उपचार ! पण ह्या एका समस्येसाठी एकच प्रभावी सोल्यूशन आपल्याकडे उपलब्ध आहे. विना औषध, विना स्पर्श अशी स्वयंपूर्ण उपचार पध्दती, जिने अनेकजणींना त्या चार दिवसांच्या अनेक समस्यांमधून बाहेर काढलेलं आहे. कारण आम्ही शरीराला मशीन मानत नाही तर प्रत्येक शरीर काही सांगतं, ते आम्ही ऐकतो आणि त्याची दुखणी दूर करतो.

मासिक चक्रातील समस्यांवर मौलिक मार्गदर्शन करणारा हा महत्वपूर्ण व्हिडीओ आवर्जून पाहा.

Share this post

Facebook Comments: Please enter a valid URL
Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!