गॅलरी

गॅलरी

निरामय दिवाळी – अंधाऱ्या मनांना तेजाची झळाळी

आपला स्वतःचा उद्धार करीत असताना समाजभान असायला हवे ही भारतीय परंपरेची शिकवण आहे. समाजात असे अनेक घटक आहेत ज्यांना भावनिकदृष्ट्या मदतीचा हात व प्रेमाचा शब्द हवा असतो. निरामय परिवाराने मागील वर्षीप्रमाणे यंदाही आगळ्या-वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली. जनसेवा फाउंडेशनतर्फे चालविल्या जाणाऱ्या पुनर्वसन केंद्रातील कौटुंबिक प्रेमापासून वंचित अशा मुलांसोबत ही दिवाळी पुण्यात साजरी करण्यात आली.

या चैतन्यमयी सोहळ्यात उपस्थित लहानग्यांचे निरामयच्या सर्व कर्मचाऱ्यांतर्फे अगत्याने स्वागत करण्यात आले. तदनंतर या सर्व मुलांचे आस्थेने औक्षण करण्यात आले. सकारात्मक वैश्विक स्पंदनांना आकर्षित करणाऱ्या या पारंपरिक उपचारानंतर करमणूक व ज्ञानाचा सुंदर मिलाफ असलेला कठपुतल्यांचा कार्यक्रम या बालचमूसाठी सादर करण्यात आला! त्यापुढील वेळ मनमोकळ्या गप्पागोष्टी व स्नेहभोजनात कसा गेला हे उपस्थितांना कळलेच नाही. जाण्यापूर्वी सर्व बालगोपाळांना नवीन कपडे व फराळ सोबत देण्यात आला. या निष्पाप मुलांच्या जीवनात एक आशेचा दीप व आनंदाचा झरा निर्माण करण्याचा हा निरामयचा छोटासा प्रयत्न होता.

आपणा सर्वांच्या साथीने निरामयच्या ऊर्जा प्रवासाला 11 फेब्रुवारी रोजी एक तप पूर्ण होते आहे. आपण दिलेले उदंड प्रेम आणि दाखविलेल्या विश्वासामुळेच हा प्रवास आज या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. या आनंदाच्या क्षणी आनंदाचाच उत्सव करण्याचे आम्ही योजले आहे. जगभर पसरलेल्या आपल्या ‘निरामय परिवाराने’ एकत्र येऊन या सोहळ्याचा आनंद घ्यावा, यासाठी YouTube, Facebook, Instagram या social media platform वरून कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.११ ते १७ फेब्रुवारी, रोज रात्रौ ८ ते ९ या वेळेत घरी राहूनच आपण या ‘तपपूर्ती सप्ताहाचा’ आस्वाद घ्यायचा आहे. प्रत्येक कार्यक्रम २४ तास चॅनेलवर उपलब्ध राहील. भेटूया तर मग…

Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!