गुडघे दुखायचे थांबले आणि प्रत्यारोपण टळले

आपल्या शरीराला कोण बरं करतं? औषधं? ऑपरेशन? की शरीर स्वतः?
या प्रश्‍नाचं उत्तर तर तुम्हांला पुढे मिळणारच आहे. पण त्याआधी आपण शरीराची रचना पाहूयात. आपलं शरीर म्हणजे हाडांचा सांगाडा. आपण म्हणतो ना, हाडांचा सापळा झालाय. तर याच सापळ्यात आपलं शरीर बांधलं गेलंय. आणि कशानं बाधलं तर…स्नायूंनी. निर्मात्यानं या हाडांच्या सापळ्यात हृदय, फुफ्फुसं, यकृत असे सगळे अवयव अगदी चपखलपणे बसवलेत आणि स्नायूंनी सर्व काही अगदी नीट बांधून टाकलंय. बरं…हादर्‍यांनी अवयव हालू नयेत म्हणून ठिकठिकाणी कुर्च्या आहेत. हे जणू काही शॉक अ‍ॅब्सॉर्बरच !

आपल्या प्राचीन आरोग्यशास्त्रानुसार ही हाडं म्हणजे अस्थि, स्नायू आणि कुर्च्या हे पृथ्वीतत्वाच्या अधिपत्याखाली येतं. जेव्हां हाडांचे किंवा सांध्यांचे कोणतेही दुखणे सुरू होते याचा अर्थ तिथल्या पृथ्वीतत्वाचं असंतुलन झालेलं असतं. या दुखण्यावर आपण ‘पेन किलर’ घेतो तेव्हां त्याचा अंमल असेपर्यंत दुखणं थांबलेलं दिसतं. पण नंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या ! त्यासाठीच जेव्हां हाडं किंवा सांधे कुरकुरायला लागतात, तेव्हां आपण त्यांचं हे कुरकुरणं समजून घेतलं पाहिजे. शरीर आपल्याला नेहमी सूचना देत असतं. दुखणं वाढल्याशिवाय आपल्या ते लक्षात येत नाही, हा भाग वेगळा.

जेव्हां तुम्ही निरामयमध्ये ट्रीटमेंटसाठी येता, तेव्हां आम्ही आधी शरीर काय म्हणतंय हे ऐकतो. म्हणजेच त्या दुखर्‍या भागाचं परिक्षण करून तिथं उर्जा कमी झाली की वाढलीये, कोणत्या तत्वाचे असंतुलन झालंय यांचं बारीक परिक्षण व निरिक्षण करतो. पाठ, मान, कंबर, गुडघे काहीही दुखतंय म्हणजे तिथल्या उर्जावाहिन्यांच्या कार्यात काहीतरी अडथळा, असंतुलन झालंय हे निश्‍चित असतं. आता अस्थि किंवा सांधेदुखी हे पृथ्वीतत्वाच्या अधिपत्याखाली असल्यामुळे त्याचे शरीरातील चक्र म्हणजे मूलाधार चक्र. या चक्रावर आम्ही उर्जेवर आधारित उपचार करतो. त्यामुळे या उर्जावाहिन्या पूर्ववत कार्यरत होतात आणि तुमचे दुखणे कमी कमी होत जाऊन कालांतराने पूर्णतः थांबते.

संगीता पाठक ह्या 73 वर्षांच्या आजी. गुडघेदुखीमुळे उभं रहाणंही मुश्कील. डॉक्टरांनी सांगितलं की, गुडघे प्रत्यारोपण करावे लागेल. आता या वयात ऑपरेशन नको म्हणून पाठक आजी निरामयमध्ये आल्या. उपचार घेतले. 6 महिन्यात गुडघेदुखी थांबली. या घटनेला आज 2 वर्षे झालीत. आजही त्या जिने चढू-उतरू शकतात. म्हणजे निरामयमधले उपचार हे कायमस्वरूपी परिणामकारक ठरतात हे तुमच्याही लक्षात आलेच असेल. पाठक आजींच्या वयोगटातल्या अनेकांना ह्या समस्या जाणवतात. पण चिंतेची बाब म्हणजे हल्ली अगदी तरूणवयातले अस्थि-सांधेदुखीचे अनेक रूग्ण निरामयमध्ये येत आहेत. गुडघेदुखी, टाचादुखी, कंबरदुखी या तरूण वयोगटात वाढलेली दिसते. याचं मुख्य कारण म्हणजे व्यायामाचा अभाव आणि त्यामुळे स्नायूंमध्ये आलेली ताठरता.

विलास शिरसाठ हे तरूण केटरिंग व्यावसायिक. सतत उभं रहाणं, अनियमित जेवणाच्या वेळा याचा परिणाम त्यांच्यावरही झाला. डावा गुडघा इतका दुखू लागला की चालणं अवघड होऊन बसलं. पेनकिलर, हाडवैद्य, लेप, प्लॅस्टर असं सगळं करून झाल्यावर शिरसाठ निरामयमध्ये आले. पहिल्याच सीटींगमध्ये मी त्यांच्यावर उपचार करून त्यांना मांडी घालायला सांगितलं. तेव्हां शिरसाठाचं दुखणं 5-10% कमी झालेलं होतं. हे पाहून त्यांचा आत्मविश्‍वास वाढला आणि त्यांनी उपचार सुरू केले. एक-दोन महिन्यात बरं वाटायला लागलं आणि सहा महिन्यातच त्यांची गुडघेदुखी थांबली. आता हे का घडतं?

निरामयमध्ये आम्ही संपूर्ण उर्जा देतो. पण तुमचं शरीर किती उर्जा वापरतं यावर परिणाम अवलंबून असतो. तुम्ही जर मेंदूला नकारात्मक सूचना दिल्या तर आम्ही कितीही उर्जा दिली तरी त्याचा उपयोग होणार नाही. याउलट तुम्ही सकारात्मक भावनेनं उर्जा स्वीकारली तर शरीरही त्या उर्जेचा वापर करून निरोगी बनतं. कारण शरीरच शरीराला बरं करतं. हेच पहिल्या ओळीतल्या प्रश्‍नाचे उत्तर आहे आणि तेच सत्य आहे. आम्ही केवळ निमित्य !

अस्थी-सांधेदुखीबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ अवश्य पाहा.

Share this post

Facebook Comments: Please enter a valid URL
Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!