सामान्यत: मानवी पेशींची झीज झाली, कार्य संपले की त्या मरतात. मरताना नवीन पेशी निर्माण करतात आणि स्वतःचे सर्व ज्ञान त्यांना प्रदान करतात. काही विकृतीमुळे (जसे की, संसर्ग/इन्फेक्शन) काही पेशींचा आकार मूळ पेशीपेक्षा बदलतो. त्यामुळे मेंदूला त्याचे आकलन होत नाही आणि मेंदू त्यांना कोणतीही सूचना देत नाही. मेंदूपासून सूचना न मिळाल्यामुळे त्या कोणतेही काम करीत नाहीत. काम नसल्यामुळे विशेष झीज होत नाही. ज्यामुळे या पेशींचा मृत्युदर कमी असतो. मात्र नवनिर्मितीचा दर सुदृढ पेशींएवढाच असतो. त्यामुळे त्यांच्यासारख्या नवनवीन पेशी निर्माण होत राहतात. स्थिर विकृत पेशींची एकाच जागी अनावश्यक वाढ (गाठ) दिसून येते. अस्थिर/चंचल, विकृत पेशी उती (टिश्यू) मध्ये, रक्ताद्वारे किंवा लसिका संस्थेद्वारे (लिम्फ सिस्टम) शरीरातील इतर ठिकाणी पोहोचून तेथे अनिर्बंध वाढतात, ज्याला कर्करोग म्हणून संबोधले जाते. ज्याचा शरीराच्या अंतर्गत कामकाजावर विपरीत परिणाम होतो.
गाठ म्हणजे अती विचारांमुळे, अती ताणामुळे, अती श्रमामुळे साठून राहिलेली अनावश्यक ऊर्जा. घन स्वरूपाची गाठ पेशींमधील पृथ्वीतत्त्वाची अनावश्यक वाढ दाखविते. अनिर्बंध वाढलेले तत्त्व हे इतर तत्त्वांची जागा व्यापते. ज्यामुळे काही तत्त्वांचे आधिक्य तर काही तत्त्वांची कमतरता निर्माण होते. शरीरातील ऊर्जा नाड्या (मेरिडीयन्स) रोगाच्या ठिकाणी मार्ग बदलतात, दबतात. त्यामुळे योग्य प्रकारे ऊर्जा ग्रहण होऊ शकत नाहीत.
कर्करोग निदान झाले, म्हणजे मृत्यू अटळ असा काहीसा समज आपल्या समाजात अनेक वर्षांपासून आहे. पण रुग्णाची इच्छाशक्ती आणि स्वयंपूर्ण उपचारातील सातत्य यातून अनेक सकारात्मक बदल घडतात. याचे बोलके उदाहरण म्हणजे स्वाती बधे यांचा अनुभव. पहिल्यांदा स्वाती ताईंना काखेत गाठ जाणवली. अगोदर त्यांनी फारसं लक्ष दिलं नाही. पण घरची आई आणि आजीची कर्करोगाची पार्श्वभूमी पाहता त्यांनी चाचण्या केल्या आणि जी भीती होती तेच झालं. त्यांना कर्करोगाच निदान झालं. ऐकीव माहिती आणि नात्यातील लोकांचे आलेले अनुभव यावरून त्यांच्या मनाने देखील हाय खाल्ली. त्या सतत त्याच विचारात राहू लागल्या. मृत्यूचा आणि त्यांचा लपंडावच सुरु आहे असं त्यांना वाटू लागलं. त्यांच्या प्रत्येक दैनंदिन कामात आणि विचारात हा कर्करोग ठाण मांडून बसला. त्यात नवीन भर म्हणजे त्या जिथे उपचार घेत होत्या, तेथील अनेक रुग्ण उपचारादरम्यान दगावले. त्यामुळे तर त्या जास्तच धास्तावल्या.
पुढे त्यांच्या मैत्रिणीने त्यांना निरामय मध्ये आणले. कोणत्याही औषधाशिवाय स्वयंपूर्ण ऊर्जा उपचारांनी त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. फक्त कर्करोग नाही तर यांचे इतर शारीरिक आजार देखील बरे झाले. आज त्या नॉर्मल आयुष्य जगत आहेत.
स्वाती ताईंचा हा सगळा प्रवास ऐकण्यासाठी हा व्हिडीओ जरूर बघा.