आयसीयूतून आणि आजारातूनही सुटका

आपण प्रत्येकजण आजारी पडतो तेव्हा काय करतो? डॉक्टरकडे जातो, गोळ्या घेतो आणि अनेकदा बरेही होतो. पण मुळात प्रश्‍न हा आहे की, आपण आजारी का पडतो? आता तुम्ही म्हणाल, इन्फेक्शनने, थंड खाल्लं म्हणून, खूप फिरलो म्हणून. पण ही झाली निमित्तं. शरीर आजारी कसं पडतं यासाठी शरीराबद्दल थोडंसं समजून घ्यायला हवं.

आपलं शरीर हे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. यामध्ये अदृश्य अशी सप्तचक्रं देखील असतात. आध्यात्मिक माणसांना याबद्दल ठाऊक असेल. पण अदृश्य आहेत म्हणून नाहीतच असा विज्ञानवादी विचार करणं योग्य नाही. कारण विज्ञानातले अणु-रेणू तरी कुठे डोळयांना दिसतात? आणि अगदी घरगुती उदाहरण द्यायचं झालं तर, रेडिओ किंवा मोबाईल लहरी किंवा ध्वनी तरंग दिसतात कुठे? तशीच आपल्या शरीराला ही जीवनउर्जा कार्यरत ठेवते. आता या पंचमहाभूतांच्या मिश्रणातून बनलेलं हाडं-मांस-रक्त-पेशी-स्नायूंच्या या शरीरात कुठेही पंचमहाभुतांचं असंतुलन झालं की, माणूस आजारी पडतो. आणि यावर उपचार तोच…जीवनउर्जेचा. हे खूप प्राचीन आरोग्यशास्त्र आहे. विज्ञानाला न गवसलेली कित्येक आरोग्य रहस्ये आहेत. जी आम्ही शोधून काढली आणि निर्माण केली एक स्वयंपूर्ण ऊर्जा उपचार पध्दती!

ही उपचार पध्दती इतकी प्रभावी आहे की साध्या सर्दीपडश्यापासून ते कॅन्सरपर्यंतचे अनेक जीवघेणे आजार बरे होऊ शकतात. याची अनेक उदाहरणे आज आम्ही तुम्हांला देऊ शकतो. असेच एक उदाहरण म्हणजे सौ. काळे यांचे. त्यांचा मधुमेह इतका बळावला की साखर 1000 पर्यंत पोहचली. या बाईंच्या संपूर्ण वर्ष हॉस्पिटलमध्ये वाऱ्या सुरू होत्या आणि त्यातही तीन महिने आयसीयूमध्ये. श्वास कमी पडत होता, आठवड्यातून तीन वेळा डायलीसिस सुरू होते. एवढंच नव्हे तर दोनदा सेमी कोमा ! अखेर डॉक्टरांनाही हात टेकले आणि त्यांचे पती श्री. नयन काळे निरामयमध्ये आले. तेव्हा स्वयंपूर्ण ऊर्जा उपचारांचा अवलंब करून आम्हीही सौ. काळेंवर उपचार केले आणि त्यानंतरचे त्यांचे मेडिकल रिपोर्ट्स पाहून डॉक्टरही ‘मिरॅकल’ म्हणाले. एवढी सुधारणा झाली की, सौ. काळे आठ दिवसात हॉस्पिटलमधून परत घरी आल्या आणि त्या आज ‘नॉर्मल’ आयुष्य जगत आहेत.

पण हा चमत्कार निश्‍चितच नाही. निसर्गनियमातच सारे काही घडते. तिथे पोहचायला विज्ञानाला अजून थोडा वेळ लागेल.

आपल्या डॉक्टरांकडे ज्या विश्‍वासाने तुम्ही जाता, त्याच विश्‍वासाने निरामयमध्ये यायला हवे. ‘जेव्हां आमच्या हातात काही नाही’ असे डॉक्टर सांगतील, तेव्हां तरी आमच्याकडे या. विनाऔषध, विनास्पर्श असे स्वयंपूर्ण ऊर्जा उपचार येथे होतात. आपले प्राचीन आरोग्यशास्त्र महान आहे. त्यात अशक्य ते शक्य घडविण्याचे सामर्थ्य आहे. आणि आम्ही निरामयमध्ये ते आजच्या विज्ञानवादी काळातही सिध्द करून दाखवले आहे. दाखवत आहोत.

याच विषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ अवश्य पाहा.

Share this post

Facebook Comments: Please enter a valid URL
Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!