Useful Links
Main Chakras in the Body
News & Events
- Form 5A – Branch Details / Extract (EPFO Compliance)
नाशिक – ‘निरामय – आपलं आरोग्य, आपलं नाशिक’ या उपक्रमाअंतर्गत 18 जुलैला नाशिकमध्ये आरोग्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. गंगापूर रोडवरील कुर्तकोटी शंकराचार्य सभागृहात आयोजित ह्या कार्यक्रमाला नाशिककरांची उपस्थिती लक्षणीय होती. या कार्यक्रमामध्ये निरामय वेलनेस सेंटरचे संचालक आणि स्वयंपूर्ण उपचारांचे प्रणेते योगेश चांदोरकर व सौ. अमृता योगेश चांदोरकर ह्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या ह्या संवादात या दाम्पत्याने आजार आणि आरोग्य यातील फरक विशद केला. उपस्थितांना मार्गदर्शन करताना सौ. अमृता चांदोरकर यांनी आजाराचे मूळ कारण सर्वांना सांगितले. आजार हा शरीराला होतो. पण त्याची बाह्य कारणे काहीही असली तरीही आजाराचा संबंध हा मुळात मनाच्या आरोग्याशी निगडित असतो. हल्लीच्या परिस्थितीत माणूस आपल्या मनातलं दुसऱ्याला सांगू शकत नाही. नात्यांमध्ये संवाद नाहीत. अगदी रागवायचे असेल तरीही माणसं राग दाबून ठेवतात. मनातल्या ह्या अशा अनेक अव्यक्त भावना आपल्या शरीरावर विपरीत परिणाम घडवितात. शरीर आणि मनाचा अगदी जवळचा संबंध आहे. भीती जरी मानसिक असली तरीही पोटात येणारा गोळा खराच असतो. भयंकर घटना ऐकली आपला हात आपोआप छातीवरच जातो. रागाने आपलं डोकं गरम होतं. याशिवाय मोठ्यांसोबतच अगदी लहान मुलांनाही आजच्या काळात छोट्याछोट्या गोष्टींचा ताण येतो. या ताणाचा अत्यंत वाईट असा परिणाम शरीरावर होत असतो आणि त्यातूनच एखादा आजार हा उद्भवत असतो.
आजारी पडण्याचं दुसरं एक प्रमुख कारण म्हणजे आपला आहार. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनशैलीत माणसाकडे जेवायलासुद्धा वेळ नाही. पुन्हा आपण जो आहार घेतो तो प्रामुख्याने नित्कृष्ट स्वरूपाचा असतो. आपल्या आहारातील जंक फूडचे वाढते प्रमाण हे अनेक आजारांना निमंत्रण देत असते. आजार होण्याला कारणीभूत असणारा आणखी एक घटक म्हणजे आपला विहार. आपण सगळेचजण प्रदूषणयुक्त वातावरणात वावरत असतो. तसेच ज्या लोकांमध्ये वावरत असतो, त्यांच्या बिघडलेल्या मानसिकतेचाही आपल्यावर दुष्परिणाम होत असतो. यासाठी निसर्गाचा सहवास, ध्यानधारणा करणे आवश्यक आहे. आपल्या पूर्वजांनी जतन केलेली हिंदूसंस्कृती व परंपरांचे पालन करायला हवे. या सर्वांचा परिणाम आपल्या एकूणातच जीवनावर आणि आरोग्यावर होत असतो. जेव्हा आपण आरोग्य असे म्हणतो, तेव्हा ते शरीर-मन आणि ऊर्जा यांचे योग्य संतुलन होय. हेच संतुलन जेव्हा बिघडते, तेव्हा एखादा मनुष्य आजारी पडतो. आपले मॉडर्न सायन्स हे केवळ शरीरापुरते मर्यादित आहे पण आपले प्राचीन आरोग्यशास्त्र याहीपुढे जाऊन सूक्ष्म देहापर्यंत सर्व बाबींचा विचार करते. पंचमहाभूते, सप्तचक्रे आणि ऊर्जा यांवर विशेष उपचार आपल्या प्राचीन आरोग्यशास्त्राने सांगितलेले आहेत.
हे प्राचीन आरोग्यशास्त्र, योगशास्त्र, नाडी शास्त्र आणि मुद्रा शास्त्र यावर विशेष संशोधन करून निरामय वेलनेस सेंटरने स्वयंपूर्ण उपचार पद्धती विकसित केलेली आहे. यामध्ये विनाऔषध-विनास्पर्श ऊर्जा उपचार केले जातात. हे उपचार करण्यापूर्वी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रुग्णाची ऑरा तपासणी केली जाते. यामध्ये जिथे जिथे असंतुलन किंवा बिघाड आढळून येतो, तिथे ऊर्जा उपचारांद्वारे रुग्णाला आजारमुक्त करण्यात येते. या उपचारांचे वैशिष्ट्य म्हणजे रुग्णाला दूरस्थ पद्धतीने म्हणजेच फोनवरून ट्रीटमेंट घेता येते. आतापर्यंत निरामय वेलनेस सेंटरने साध्या सर्दी-पडशापासून ते कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांपर्यंत हजारो रुग्णांवर प्रभावी उपचार करून त्यांचा त्रास दूर केलेला आहे.
निरामय वेलनेस सेंटरच्या या तब्बल 15 वर्षांच्या कार्याची दखल समाजातील अनेक प्रतिष्ठित संस्था व माध्यमांनी घेत त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे. एवढंच नव्हे तर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलच्या सहयोगाने स्वयंपूर्ण उपचारांनी पीसीओडीतून मुक्त झालेल्या महिलांची क्लिनिकल ट्रायल घेण्यात आली. हा शोधनिबंध आंतरराष्ट्रीय सायन्स जर्नलमध्ये अलीकडेच प्रकाशित करण्यात आलेला आहे. तसेच वंध्यत्व, डायबेटिस यावर क्लिनिकल ट्रायल्स झाल्या असून तेही शोधनिबंध लवकरच प्रकाशित होतील. हे लक्षात घेता मॉडर्न सायन्सच्या सर्व निकषांवर उतरत स्वयंपूर्ण उपचारांनी आपले प्रभावीपण सिद्ध केल्याचे दिसून येते.
नाशिकमधील या आरोग्यसंमेलनात नाशिककरांच्या मनातील अनेक प्रश्नांना आणि शंकांना योगेश चांदोरकर यांनी प्रभावी उत्तरे दिली. त्यामुळे औषधं घेणं म्हणजे आजार दूर करणं आणि आरोग्यप्राप्ती नव्हे याबद्दल उपस्थितांची खात्री पटली. यातील अनेकांनी निरामयचे स्वयंपूर्ण उपचार घेण्यास संमती दर्शविली आहे. आपला समाज हा औषधमुक्त आणि आरोग्यदायी व्हावा, हेच निरामय वेलनेस सेंटरचे उद्दिष्ट आहे.