Copyright 2021 @ Niraamay Wellness Center | All Rights Reserved
Third Eye Chakra
आज्ञा चक्र
आज्ञा चक्र भ्रूमध्य म्हणजेच दोन्ही भुवयांच्या मध्ये असते. मानसशक्ती, इच्छाशक्तीचे हे केंद्र आहे. याचा रंग फिक्कट जांभळा आहे. आज्ञा चक्राकडे मेंदू, डोळे व कान यांचे नियंत्रण असते. मेंदूतील पिच्युटरी ग्रंथी, एण्डोक्राइन ग्रंथींचे नियंत्रण, तसेच सर्व प्रमुख चक्रांचे नियंत्रण या चक्राकडे असते.
माणसाचे विचार हे आज्ञा चक्रावर अवलंबून असतात. आज्ञा चक्र हे मनःप्रेरणेचे केंद्र आहे. प्रबळ इच्छाशक्ती हा याचा गुण आहे. ज्याचे आज्ञा चक्र सक्षम असते ती व्यक्ती दृढ निश्चयी, कणखर, ठरविलेल्या गोष्टी तडीस नेणारी असते.
ध्यान - आज्ञा चक्र
आज्ञा चक्राच्या कार्यकारिणीमधील दोष
ज्या वेळी आज्ञा चक्राच्या कार्यकारिणीमध्ये दोष उत्पन्न होतात, तेव्हा कॅन्सर, पार्किन्सन्स, सेरेब्रल पाल्सी, मोटर न्यूरॉन डिसिज, मल्टीपल स्क्लेरोसिस, मेनिंजायटिस, फिटस्, कोमा, गतिमंदत्व, पक्षाघात, अल्झायमर, डिमेन्शिया, ऑटीझम, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, तोतरेपणा, स्मृतिभ्रंश, कंपवात, तसेच मोतीबिंदू, काचबिंदू, मॅक्यूला डिजनरेशन, रेटीनोपॅथी, बहिरेपणा, टीनिटस, कानाच्या पडद्यातील दोष, व्हर्टिगो इ. शारीरिक व्याधी उद्भवू शकतात.
तसेच, मानसिक ताणतणाव, चिडचिड, नैराश्य, निरुत्साह अशा मानसिक व्याधी उद्भवू शकतात.
सप्तचक्रे

मूलाधार चक्र
मूलाधार चक्र मेरुदंडाच्या तळाशी असते. याचा रंग लाल आहे...

स्वाधिष्ठान चक्र
स्वाधिष्ठान चक्र लिंगस्थानाजवळ असते. याचा रंग नारिंगी आहे...

मणिपूर चक्र
मणिपूर चक्र नाभी/बेंबीवर असते. याचा रंग नारिंगी पिवळा आहे...

अनाहत चक्र
अनाहत चक्र छातीच्या मध्यभागी म्हणजेच हृदयाजवळ असते...

विशुद्ध चक्र
विशुद्ध चक्र कंठस्थानी असते. याचा रंग निळा आहे....

आज्ञा चक्र
आज्ञा चक्र भ्रूमध्य म्हणजेच दोन्ही भुवयांच्या मध्ये असते...

सहस्रार चक्र
सहस्रार चक्र ब्रह्मरंध्र म्हणजेच टाळूवर असते.हे प्राणशक्तीचे...