म्हणजे स्वतःचे नाव, पत्ता, फोन नम्बर विसरेपर्यंत ठीक होतं, पण प्रभाकरपंतांनी जेव्हा, “आपण कोण?” असा प्रश्न विचारला, तेव्हा मात्र सुशीलाबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली. असे काही होईल, अशी त्यांना सुतराम कल्पना नव्हती.
खरं तर डॉकटरांनी ‘अल्झायमर्स’ असं निदान केल्यापासून, सुशीलाबाईच त्यांचं सगळं पाहत होत्या. सगळं म्हणजे सगळं. प्रभाकरपंतांना मधुमेह सुद्धा असल्यानं सारखं सारखं जावं लागे, पण त्याची सुद्धा त्यांना शुद्द नव्हती. अगदी प्रात:कर्म करतानाही त्यांना मदत लागत होती. ओळख-पाळख तर ते केव्हाच विसरले होते.
एकदा तर ते घराबाहेर पडून कुठे कोण जाणे, चालू लागले. महत्प्रयासाने, त्यांना अक्षरशः धरून परत आणावं लागलं होतं. अनेक डॉकटर, अनेक दवाखाने आणि शेकडो प्रयत्न करून झाले होते, पण गूण काही येईना. पुढे तब्येत इतकी खालावली कि त्यांना दवाखान्यात दाखल करावं लागलं. हळूहळू त्यांना साधी हालचाल करणेही जमेनासं झालं.
शेवटचा पर्याय म्हणून, आमच्याकडे, म्हणजे पुण्याच्या निरामय वेलनेस सेंटर मध्ये उपचार घ्यावेत असं त्यांची कन्या सुचेतानं सुचवलं . तिला या संस्थेबद्दल, संस्थेच्या यशाबद्दल तसेच विना औषध, विना स्पर्श दिल्या जाणाऱ्या ऊर्जा उपचारांची माहिती होती. तो पर्यंत बहिरट कुटुंबीयांचा धीर पूर्णतः खचला होता. आता कुठलाही पर्याय नाही असे त्यांना वाटू लागले होते. त्यांचा विश्वास जिंकून, अजूनही आशा असल्याचे त्यांना पटवून देणे माझे कर्तव्य होते. त्यात मी यशस्वी झाले आणि प्रभाकरपंतांच्या आयुष्यातला एक नवा अध्याय सुरु झाला.
आमच्या उपचार पद्धतीनुसार मी सुचेताजींना त्यांचा ताजा फोटो घेऊन यायला सांगितलं. तसा तो हैद्राबादवरून आणला गेला. प्रभाकरपंत तिथे त्यांचे चिरंजीव जगदीश यांच्याकडे राहात होते. खरं तर, कुठलेही औषध न देता, किंवा स्पर्शही न करता, उपचार होऊ शकतात यावर जगदीश यांचा विश्वास बसेना. परंतु सगळे प्रकार करून थकल्यानंतर आणि हा पर्याय फार खर्चिक नसल्याने, ते तयार झाले. प्रभाकरपंतांना हैद्राबादहुन पुण्याला आणणे शक्य नव्हते. त्यामुळे, फोनवरून, तेही जगदीशच्या माध्यमातून उपचार द्यायचे ठरले. याचे कारण म्हणजे, प्रभाकरपंतांना स्वतः उपचार घेणे शक्य नव्हते, म्हणून मग जगदीशच्या मार्फत ते द्यावेत असं ठरलं.
ठरल्याप्रमाणे, जगदीश दिवसाला तीन वेळा निरामय संस्थेत फोन करून उपचार घेत असे. पूर्ण खात्री नसली तरी, दुसरा पर्याय नसल्याने, आणि हा पर्याय फार खर्चिक नसल्याने जगदीश तयार झाला होता.
उपचार सुरु होऊन जेमतेम ५-६ दिवस झाले असावेत. तर दवाखान्यात असलेल्या प्रभाकरपंतांमध्ये सुधारणा दिसू लागली. प्रथमतः ही सुधारणा दिल्या जाणाऱ्या औषधामुळे असू शकते असे बहिरट कुटुंबियांना वाटले. पण तरीही त्यांनी निरामयचे ऊर्जा उपचार सुरु ठेवले. नेमक्या कोणत्या उपचाराचा सकारात्मक परिणाम होतो आहे हे त्यांना कळत नव्हते. परंतु सुधारणा दिसत होती यामुळे ते आनंदले होते.
त्यानंतर साधारण आणखी एक आठवडा गेला आणि तीन-चार वर्षात पहिल्यांदा प्रभाकरपंतांनी भूक लागल्याचं सांगत जेवायला मागितलं. तोपर्यंत त्यांना पेज करून बळेबळे भरवावी लागे. आपल्या मूत्रमार्गात त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितल्या नंतर, त्याचा इलाजही आम्ही आमच्या पद्धतीने केला. बहिरट कुटुंबासाठी ही आणखी एक आनंदाची बाब होती.
पुढे सन २०१२ मध्ये प्रभाकरपंतांना देवाज्ञा झाली, परंतु तो पर्यंत ते सगळ्यांना ओळखू लागले होते, त्यांच्या स्मृती पुर्ववत झाल्या होत्या. इतकंच नव्हे, तर ते स्वतःच्या पायांवर उभे राहून कुठल्याही आधाराशिवाय चालू लागले होते.
बहिरट कुटुंबासाठी ही एक अत्यानंदाची आणि समाधानाची गोष्ट होती. तर निरामयच्या शिरपेचातला आणखी एक तुरा.