मायग्रेन(अर्धशिशी) घालविण्यासाठी स्वयंपूर्ण उपचार पध्दती!

ह्या जगात प्रत्येकाच्या मागे काही ना काही डोकेदुखी असतेच असते. पण जेव्हां शारीरिक पातळीवर खर्‍या अर्थानं डोकं दुखू लागतं तेव्हां अक्षरशः आपलं डोकं उठतं. असह्य डोकेदुखीचा असाच एक प्रकार म्हणजे अर्धशिशी किंवा मायग्रेन. हा त्रास वर्षभरात हळूहळू सुरू होतो आणि नंतर तो महिन्यांवरून आठवड्यांवर केव्हां येऊन पोहचतो हे आपल्याला कळत नाही. ह्यावर आपण औषधं घेतली तर तेवढ्यापुरतं बरे वाटते. पण परत त्रास आहेच. तर असं का?

ह्यासाठी मायग्रेनच्या मुळाशी जावं लागतं. मुळात हा आजार म्हणजे पित्त किंवा शरीरातील वाढलेली उष्णता ह्यांचा दुष्परिणाम आहे. मॉडर्न सायन्स ह्याच्या लक्षणांवरून उपचार ठरवतं. पण स्वयंपूर्ण उपचार पध्दतीमध्ये आम्ही ह्या आजाराचे आतून संपूर्ण परिक्षण करतो. जेव्हां आपल्या शरीरातील आज्ञाचक्र अतिप्रमाणात काम करत असते, तेव्हां तिथे अधिक ऊर्जा खर्च होत असते. त्याचबरोबर विशुध्द चक्रही जेव्हां कमकुवत होते तेव्हां त्यातून ही उष्णता वरच्या भागात जाऊन डोके, डोळे, कान व मेंदू अशा विविध अवयवांचे त्रास सुरू होतात.
काहीवेळेला ह्या मायग्रेनची तीव्रता इतकी असते की, रूग्णाला जरासा प्रकाश देखील सहन होत नाही. बारीकसारीक आवाजांचाही प्रचंड त्रास होतो. डोकं अगदी घण घातल्यासारखे ठणठणते, तो त्रासही असह्यच! आणि ह्या आजाराचे स्वरूप असे आहे की, आपल्याला मायग्रेन झाला आहे, हेच अनेकांच्या लवकर लक्षातही येत नाही.

असाच त्रास असणार्‍या वैशाली बेंगळे. त्यांचं डोकं इतकं ठणकायचं की त्या झोपून रहायच्या. मुलांना शाळेत डबा देखील देऊ शकत नव्हत्या. पण ही साधी डोकेदुखी आहे असंच त्या समजायच्या. एकदा एका मेंदूविकारतज्ञांकडून त्यांना हा त्रास मायग्रेनचा आहे हे समजलं. त्यानंतर त्यांची औषधं वैशाली ताईंनी सुरू केली. पण त्यांचे साईड इफेक्ट्स जाणवू लागले. शिवाय त्यांना स्पाँडिलायटिसचा त्रासही होता. अशा अवस्थेत त्या निरामयमध्ये आल्या आणि त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली. पहिल्या महिन्यातच त्यांना मायग्रेनचा त्रास कमी झाल्याचे जाणवले. त्या पुढे 6 महिने उपचार घेत राहिल्या आणि नंतर त्यांचा मायग्रेनचा त्रास कायमचा थांबला.

ह्या केसमध्ये वैशाली ताईंना केवळ शारीरिक त्रास नव्हता तर ह्या असह्य डोकेदुखीमुळे त्यांच्या मनावरही दुष्परिणाम झाला होता. एवढंच नव्हे खांदेदुखी, पाठदुखी देखील होती. निरामयच्या स्वयंपूर्ण उपचारांनी त्यांच्या शरीरातील दूषित ऊर्जा बाहेर काढून त्यांना सकारात्मक ऊर्जा दिली. त्याचा चांगला परिणाम त्यांच्या शरीरावरच नव्हे तर मनावरही झाला. हेच मॉडर्न सायन्समध्ये मायग्रेन व स्पाँडिलायटेससाठी त्यांना वेगवेगळी औषधे घ्यावी लागली असती. पण स्वयंपूर्ण उपचार पध्दती इतकी परिपूर्ण आहे की, तुम्ही कोणत्याही त्रासासाठी या, तुमचे इतर आजारही त्यामध्ये दूर होतात. याचं मुख्य कारण म्हणजे आम्ही शरीरातली सर्व चक्र व पंचतत्वे ह्यांच्यामधील असंतुलन शोधून तिथं ऊर्जेचं संतुलन साधतो. तेही विनाऔषध-विनास्पर्श !

शरीरात वाढलेलं पित्त बाहेर काढण्यासाठी अनेकजण रोज सकाळी मुद्दामहून उलटी काढतात व पित्त बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. पण हे अत्यंत अनैसर्गिक असून शरीरासाठी हानीकारक आहे. ह्यामुळे त्रास कमी होण्याऐवजी वाढल्याची अनेक उदाहरणे आम्ही पाहिलेली आहे. यामध्ये अन्ननलिकेला सूज येणे, छिद्र पडणे, घशात जळजळ. तोंड येणे ह्यासारखे विकार होतात आणि जर हे प्रमाण वाढत गेलं तर नंतर पाणी देखील पचवणं शरीराला जड जातं. लक्षात घ्या, पित्त कितीही असू द्या, त्याचा भार सहन करण्याची ताकद केवळ आपल्या पोटातच आहे. इतर अवयवांना पित्तामुळे दुखापतच होते.

आमच्या ठाणे क्लिनिकमध्ये अशाच एक पेशंट आल्या होत्या. सकाळी उठून उलटी काढण्याच्या सवयीमुळे त्यांचं सतत तोंड आलेलं असायचं, घसा खराब झालेला होताच. तिखट तर सोडा त्या खारट-आंबटही खाऊ शकत नव्हत्या. तांदूळ-मुगाची डाळ एवढाच आहार त्या वर्ष-दीडवर्षापासून घेत होत्या. ह्या त्रासामुळे त्यांना इतकं नैराश्य आलं होतं की, आता आपल्या जगण्याला अर्थ काय? इतक्या टोकाच्या भूमिकेला त्या गेल्या होत्या.

ह्या एकट्याच नाही तर आमच्याकडे असे अनेक पेशंट येतात की, जे आपण मरणार ह्या विचारानेच येतात. तेव्हां आम्हांला त्यांचं कौन्सेलिंग अर्थात मानसिक समुपदेशन करावं लागतं. मृत्यू कोणाला चुकलेला नाही. तो यायच्या वेळेला येईलच. पण शेवटच्या क्षणापर्यंत आपण मात्र निरोगी रहाण्याचा विचारच करायला हवा. आपण मेंदूला ज्या सूचना देतो, त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होत असतो. त्यामुळेच कौन्सेलिंग करताना आम्ही पेशंटच्या मनात सकारात्मकता जागृत करत असतो.

तर ह्या ठाण्याच्या बाईंनाही आम्ही असेच समुपदेशन केले आणि त्यांनी स्वयंपूर्ण उपचार सुरू केले. त्यांचा त्रास हळूहळू कमी झाला. 3 महिन्यांनी त्यांचा फोन आला. त्या एका नातेवाईकाच्या समारंभात श्रीखंड-पुरी खाऊन आल्या होत्या आणि एक तास झाला तरी त्यांना कोणता त्रास झालेला नव्हता. हे सांगण्यासाठी त्यांनी खास फोन केला होता आणि ते सांगताना त्यांच्या बोलण्यात आनंद मावत नव्हता. श्रीखंड खाणं ही गोष्ट आपल्याला छोटीशी वाटली तरी दीड वर्ष मुगाची डाळ खाणार्‍यासाठी ती किती मोठी असेल ह्याची कल्पना आपण नक्कीच करू शकतो.
शेवटी जगणं म्हणजे असेच आनंदाचे छोटे छोटे क्षण आनंदात उपभोगणं. तो आनंद तुम्हांला घेता यावा ह्यासाठी तुमचं शरीर व मनातले सर्व आजार-विकार आम्ही दूर करतो आणि मुख्य म्हणजे तुम्हांला औषधांपासून दूर ठेवतो. हाच आनंद तुम्हीही उपभोगावा…ह्यासाठीच आमचे सारे प्रयत्न !

Share this post

Facebook Comments: Please enter a valid URL
Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!