न्यूमोनिया व विषाणूजन्य आजारांसाठी प्रभावी स्वयंपूर्ण उपचार पध्दती !

न्यूमोनियासारखे ताप ज्यांना ज्वर असे म्हटले जाते ते मुख्यतः संसर्गातून होत असतात. वातावरण बदललं किंवा शरीराला न चालणार्‍या गोष्टींच्या संपर्कात आलं की हा संसर्ग म्हणजेच इन्फेक्शन होतं. यातून जेव्हां बाहेरचे विषाणू शरीरावर आक्रमण करतात तेव्हां त्यांच्याशी लढा देण्यासाठी आपल्या शरीरात पांढर्‍या सैनिक पेशी तयार होतात. त्यामुळे जिथे संसर्ग झालेला असतो तो शरीराचा भाग किंवा पूर्ण शरीर मोठ्या प्रमाणात तापतं. ह्यालाच आपण ताप असे म्हणतो.
आता न्यूमोनिया म्हणजे फुफ्फुसावर झालेलं विषाणूंचं आक्रमण. फुफ्फुसाचं काम किती महत्वाचं हे आपण मागे पाहिलंच. संपूर्ण शरीराला प्राणवायूचा पुरवठा करणारा हा अवयव जर बाधित झाला तर तो हल्ला परतवून लावण्यासाठी संपूर्ण शरीर कामाला लागतं. ह्यासाठी शरीराची बरीच ऊर्जाही खर्च पडते. ह्या न्यूमोनियासाठी मॉडर्न सायन्सकडे तसा प्रभावी उपाय नाही. एक तर औषधांचा मारा केला जातो किंवा काही वेळा तर डॉक्टर्स हात वर करून मोकळे होतात. परंतु स्वयंपूर्ण उपचारांद्वारे त्या भागातील दूषित ऊर्जा काढून शरीराला शुध्द ऊर्जा पुरविला जाते व कुठलेही औषध न घेता, त्या विषाणूंचा हल्ला शरीराद्वारेच परतवला जातो.

आता न्यूमोनिया होऊ नये यासाठी कुठली काळजी घ्यावी तर शरीराला जे बाधतं ते करू नये. समजा, त्या गोष्टी करायची वेळ आलीच तर आवश्यक ती काळजी घ्यावी. आता विदर्भासारख्या उष्ण प्रदेशात लोक उष्माघातापासून बचाव करण्यासाठी कांदा वापरतात. अशा पध्दतीने काही प्रमाणात आपण बचाव करू शकतो. त्याचबरोबर आपण पौष्टिक आहाराची काळजी घ्यायला हवी. सध्याच्या काळात हॉटेलिंग ही आपली गरज बनलेली आहे. त्या चुकीच्या आहारातून शरीरामध्ये उत्कृष्ट रसनिर्मिती होत नाही. त्यामुळे सप्तधातू व इतर गोष्टीही नित्कृष्ट दर्जाच्या बनत जातात. याचा परिणाम म्हणजे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती इतकी कमी होत जाते की, विषाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता वाढत जाते.
तसं पाहिला गेलं तर सर्दी-ताप हे आजार नाहीत. वातावरणातील बदलांमुळे शरीर स्वतःचं संरक्षण करण्यासाठी हे आजार निर्माण करत असतं. सर्दीमुळे बाहेरचे विषाणू शरीरात घुसू शकत नाही. कुठलंही औषध न घेता 2-3 दिवसात सर्दी-ताप आपोआप बरा होतो, याचा अनुभव आपल्यालाही आला असेलच. पण आपण काय करतो, जरा सर्दी झालं की, औषधांचा मारा सुरू करतो. अँटिबायोटिक्स व केमिकलमुळे आजार बरा होतो पण रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ लागते. असं जर वारंवार होत असेल तर पुढे पुढे औषधंही जास्त मात्रेची घ्यावी लागतात. नंतर औषधंही काम करेनाशी होतात. कारण शरीर आतून पोकळ झालेलं असतं. तेव्हां 2-3 दिवसात जर सर्दी-ताप कमी होत नसेल तरच औषधोपचार सुरू करावेत किंवा स्वयंपूर्ण उपचार घ्यावेत.

काहीवेळा तर हॉस्पिटलच्या एसीमुळे किंवा औषधांमुळेही न्यूमोनिया झाल्याच्या अनेक केसेस आम्ही निरामयमध्ये बर्‍या केलेल्या आहेत. यातलंच एक गंभीर उदाहरण म्हणजे वर्षा कुलकर्णी यांचं. बाथरूममध्ये शॉक बसून एकदा त्या बेशुध्द पडल्या आणि त्याचवेळी त्यांना उलटी झाली. घाईघाईने दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरांनी वेगळंच सांगितलं. त्यांच्या मते ती उलटी फुफ्फुसात जाऊन त्यांना न्यूमोनिया झाला आणि त्यापेक्षाही गंभीर म्हणजे त्या विषाणूंनी फुफ्फुसं खाल्ल्यामुळं छिद्र पडायला सुरूवात झाली होती. एवढंच नव्हे तर वर्षा कुलकर्णींना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. डॉक्टरांचं तर स्पष्ट म्हणणं होतं की, त्यांना आयुष्यभर ऑक्सिजन सिलेंडरवर रहावं लागेल. अशा गंभीर परिस्थितीत त्यांच्या पतींना एका मित्रानं निरामयचं नाव सुचवलं. वर्षांचे पती मोरेश्‍वर हे नेमके सुट्टीच्या दिवशी निरामयमध्ये आले. पण नंतर त्यांनी फोन केला व त्यांच्या पत्नीचा फोटो व डिटेल्स ईमेलवर आम्ही मागवून घेतली. पतीच्या माध्यमातून वर्षा कुलकर्णींवर फोनद्वारे ट्रीटमेंट सुरू झाली. ट्रीटमेंट सुरू झाल्याच्या काही दिवसातच वर्षा कुलकर्णींना फरक जाणवू लागला. त्यांचा ताप हळूहळू कमी होऊ लागला. वाढलेला बीपी खाली येऊ लागला. वाढलेल्या पांढर्‍या पेशीही खाली येऊ लागल्या. त्यानंतर डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनाही इन्फेक्शन कमी झाल्याचे आढळले. अवघ्या 1 महिन्यानंतर त्यांच्या तब्येतीत चांगलीच सुधारणा दिसू लागली. ऑक्सिजनचा सिलेंडरही काढला गेला. श्‍वसन उत्तम सुरू झाले. इतकंच नव्हे तर त्यांच्या फुफ्फुसातील छिद्रही भरून निघालं. मोरेश्‍वर कुलकर्णीच्या शब्दात सांगायचं झालं तर ‘‘निरामयमुळे माझी पत्नी अक्षरशः मरणाच्या दारातून परत आली.’’
आता इथे पुन्हा ऊर्जा उपचारांविषयी थोडं सांगावंसं वाटतं. या उपचारांमध्ये कुठलंही औषधं नाही, स्पर्श नाही. आम्ही सप्तचक्र व पंचतत्वांवर ऊर्जा उपचार करतो. यासाठी रूग्ण स्वतः येऊ शकत नसेल तर त्याच्या जवळचे नातेवाईकही त्याच्यासाठी उपचार घेऊ शकतात.

सर्दी पाठोपाठ खोकला येतोच येतो. काहीवेळा खोकल्याबरोबर येणारा कफही त्रासदायक होऊ शकतो. याचं मूळ बर्‍याचदा पचनामध्ये दडलेलं असतं. यामध्ये मुख्यतः सप्तधातूच्या निर्मितीची समस्या असते. तसं कफाकडे सुरूवातील दुर्लक्ष केलं जातं. त्यात मॉडर्न सायन्सच्या औषधांनी हा कफ वाळतो. खरं तर हा कफ बाहेर पडायला हवा. वातावरणातील बदलांमुळे तात्पुरता कफ निर्माण होणं हे स्वाभाविकच आहे. पण हा कफ जर सतत निर्माण होत असेल तर त्यामुळे शरीरात विविध दोष निर्माण होत रहातात. काहीजणांना तर हा त्रास इतका होतो आडवं झोपणंही अवघड झालेलं असतं. एवढंच नव्हे तर श्‍वास घेणं, अन्न गिळणे, छातीत दुखणे सारखे त्रास वारंवार उद्भवू लागतात. हे आजार नंतर तर औषधांमुळेही बरे होत नाही.

पराग वरळीकरांना तर 6 महिने कफाचा इतका त्रास होता की, डोकंदुखी, अंगदुखी प्रचंड होती. चालणं अवघड झालेलं होतं. कफ फुफ्फुसाला चिकटून बसला होता. यानंतर सगळ्या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखवून झालं. रिपोर्ट्स सगळे नॉर्मल ! त्यानंतर वरळीकरांचे आयुर्वेदाचे भस्म, चूर्ण, काढे घेऊन झाले. त्यानेही फरक पडेना. नंतर ते होमिओपॅथीकडे वळले. त्या गोळ्यांनी अंगावर फोड आले, खाज सुटू लागली. नंतर फोडातून पाणी येऊ लागलं. अशात होमिओपॅथीच्या डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांना चक्कर आली. तेव्हां ते डॉक्टर म्हणाले की, ताबडतोब अ‍ॅडमिट व्हा. तुमच्या शरीरातील पाणी कमी झालेय. हे ऐकून वरळीकर अ‍ॅडमिट झाले. त्रास तर कमी झालाच नाही उलट पन्नास हजारांचा भुर्दंड सोसावा लागला. त्यानंतर टीव्हीवरचा कार्यक्रम पाहून ते निरामयमध्ये आले. आल्या आल्या त्यांचा पहिला आणि स्पष्ट प्रश्‍न होता की, तुमच्या उपचारांनी मी खरंच बरं होणार का? ह्या त्यांच्या प्रश्‍नाचं काही दिवसातच त्यांना मिळालं. त्यांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा दिसू लागली. त्यांचा कफ कमी होत गेला. ट्रीटमेंट सुरू ठेवल्यावर कालांतरांने त्यांना इतका फरक जाणवला की, त्यांना भूक लागू लागली आणि तीन तीन मजलेही ते चढू लागले.
जे कुलकर्णींच्या बाबतीत घडलं, जे वरळीकरांच्या बाबतीत घडलं. कुठलंही औषध न घेता त्यांचे गंभीर आजार दूर झाले. जे त्यांच्या बाबतीत घडलं ते तुमच्या बाबतीत घडू शकतं. हवं तर वरळीकरांचा प्रश्‍न घेऊन या, ‘मी खरंच बरं होईन का?’ तुमच्या ह्या प्रश्‍नाचं उत्तर तुम्हांला स्वतःलाच मिळेल, इतकी क्षमता निरामयच्या स्वयंपूर्ण उपचारांमध्ये आहे, हे निश्‍चित!

न्यूमोनिया व कफाविषयी मार्गदर्शन करणारा हा व्हिडीओ जरूर पाहा आणि इतरांनाही शेअर करा.

Share this post

Facebook Comments: Please enter a valid URL
Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!