आपल्याला जर 5-10 सेकंदही नाक बंद ठेवायचं म्हटलं तर आपला जीव घाबराघुबरा होतो. शरीरातले सगळेच अवयव महत्वाचे आहेत. पण त्यातही अत्यंत महत्वाची असणारी संस्था म्हणजे आपली श्वसनसंस्था. देवानं आपलं शरीर इतकं विचारपूर्वक घडवलेलं आहे की, त्याबद्दल आपल्याला तीळाएवढंच माहिती आहे असं म्हणता येईल. आता जेव्हां आपण श्वास घेतो म्हणजे जो प्राणवायू आत येतो, तर तो कुठे कुठे जात असेल? त्याक्षणी आपला मेंदू पूर्ण शरीराचे स्कॅनिंग करून डोक्यापासून पायापर्यंत शरीरातल्या ज्या पेशींना ऑक्सिजनची गरज आहे, तिथं तो पाठवला जातो. तिथला दूषित वायू उचलून त्याचे कार्बन डाय ऑक्साईडमध्ये रूपांतर करून तो शरीराबाहेर टाकला जातो. एक सगळं प्रत्येक सेकंदाला घडत असतं. आणि हे घडवून आणणारे मुख्य अवयव म्हणजे आपलं हृदय आणि आपली फुफ्फुसे ! जेव्हां ह्याच हृदयाची किंवा फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होते तेव्हां श्वसनसंस्थेचे वेगवेगळे आजार डोकं वर काढू लागतात.
बालदम्याविषयी सर्वांनाच ठाऊक असेल. जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाला दमा असणारच. कारण आईच्या पोटात 9 महिने गर्भजलात वाढलेल्या बाळाचा जन्माला आल्यावरच हवेशी संपर्क येतो. त्यावेळी हवेतील चांगले व दूषित दोन्ही घटक बाळाच्या फुफ्फुसात प्रवेश करतात. आता फुफ्फुसे पुरेशी विकसित झालेली नसतात, त्यामुळे बालदमा होतोच. पण नंतर मूल जसंजसं मोठं होऊ लागतं, तेव्हां फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढून बालदमा निघूनही जातो. बालदम्यासाठी पोहण्याची थेरेपीही हल्ली उपयुक्त पडताना दिसते. तसेच आजच्या काळात बाळाची डिलीव्हरी देखील पाण्यात केल्याचं तुम्ही वाचलं-ऐकलं असेलच. कारण बाळाला पाण्याची चांगली सवय असते. त्यामुळे ते पाण्यात सहज पोहू शकतं. पोहताना कष्ट होतातच. त्यातून ऑक्सिजन देखील आत खेचण्याची क्रिया होत असते.
आता मोठ्यांना होणार्या दम्याबाबत एक गैरसमज आहे की, तो आनुवांशिक असतो. पण आपल्या प्राचीन आरोग्यशास्त्राला ते मान्य नाही. बाळाच्या डीएनएमध्ये आईवडिलांचे घटक जरी असले तरी त्या बाळाची प्रकृती निराळी असू शकते. मुळात चांगला आहार, चांगला विहार आणि चांगला विचार असेल तर माणसाला कोणताच आजार किंवा त्रास होणार नाही. अथवा उद्भवला तरीही तो त्यातून लवकर बरा होऊ शकतो. आईवडिलांना आपल्या शरीरातले गुणदोष चांगले ठाऊक असतात. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या बाळावर चांगल्या आहार-विहाराचे संस्कार केले तर त्या बाळाला आईवडिलांमध्ये त्रास होण्याची शक्यता कमी होते.
आता दमा होतो म्हणजे काय? ऊर्जा शरीरामध्ये श्वासाशी संदर्भित शरीरातील हृदयचक्र किंवा अनाहत चक्र समजले गेलेले आहे. त्याचबरोबर पंचतत्वांमधील वायूतत्वाचा इथे संबंध येतो. जेव्हां हा वायू गडबडतो तेव्हां श्वसनाच्या समस्या उद्भवू लागतात. तसेच हृदयचक्रामध्ये आपल्या मनातील भावभावना साठविलेल्या असतात. त्यामुळेच एखादी वाईट घटना घडली किंवा चिंता वाटली तर आपल्या छातीवर दडपण येते. आपण जोराने श्वास घेतो. फुफ्फुसं किंवा हृदयासंबंधित अनेक आजारांचे मूळ ह्याच भावभावनांमध्ये दडल्याची अनेक उदाहरणे आम्ही पाहिलेली आहेत. ऊर्जा उपचारांनी आम्ही हृदयचक्रातील दूषित ऊर्जा बाहेर काढून आवश्यक ती ऊर्जा पुरवितो. तसेच वायू तत्वाचेही संतुलन साधतो.
कल्पना ढोले ह्यांची पाचवीत शिकणारी छोटी मुलगी आकांक्षा हिला दम्याचा त्रास होता. खूप सर्दी, खूप खोकलाही असायचा. त्यात उद्बत्तीचा वास, धूर व धुळीचीही तिला अॅलर्जी होती. कल्पना ताई तिला घेऊन जेव्हां निरामयमध्ये आल्या तेव्हां आम्हांला ह्या मुलीचे खरे दुःख जाणवले. ही मुलगी 2-3 महिन्याची असतानाच तिचे वडिल गेले. त्यानंतर आपल्या पित्याची उणीव तिला सतत भासत राहिली होती. तसेच आईच्या आजारपणामुळे तिच्या मनावर परिणाम झाला होता. ही मुलगी शाळेत जायची म्हणून तिच्यासाठी तिची आई पहिली ट्रीटमेंट घेऊ लागली व उरलेल्या दोन ट्रीटमेंट ती मुलगी स्वतः घेऊ लागली. काही दिवसातच तिच्यावर चांगला परिणाम दिसू लागला व कालांतराने ही मुलगी दम्यातून पूर्णपणे बरी देखील झाली.
निरामयमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्तिंच्या दम्यावर आम्ही स्वयंपूर्ण उपचार करतो. अगदी दम्याचा तीव्र अॅटॅक असणार्या व्यक्तिंनाही ह्याचा विशेष लाभ झालेला आहे. अशातल्याच एक देव आजी. ज्यांच्या घरात कायमस्वरूपी ऑक्सिजनचा सिलेंडर होता. घराचे 3 मजले त्या उतरूही शकत नव्हत्या. निरामयची ट्रीटमेंट सुरू झाल्यावर अवघ्या 3 महिन्यात देव आजी जिने उतरून मुलाच्या टू-व्हीलरवर बसून निरामयमध्ये येऊ शकल्या. कृष्णा नाईक ह्यांना 7-8 वर्षांपासून दम्याचा त्रास होता. रेल्वेचा ब्रीज चढला की त्यांना 15 मिनिटे थांबावे लागत असे. तीच अवस्था कामावरही. निरामयची ट्रीटमेंट सुरू केल्यावर 15 दिवसात ते ब्रीज चढून पुढे चालू लागले. सातारच्या रेणुका ढोबळे ह्या एकट्या रहायच्या. हिवाळ्यात किंवा ढग आल्यावर दम्याची ढास लागायची. पंप घेतल्याशिवाय श्वास घेऊच शकत नव्हत्या. त्यांच्यावरही मानसिक आघात झालेले होते. त्यांनीही अत्यंत विश्वासाने व श्रध्देने निरामयची ट्रीटमेंट घेतली व त्यांचा दमा कायमचा गेला.
त्या एकट्या असायच्या तेव्हां आम्ही सांगितले होते की, काही झालं की इतरांना फोन करण्याआधी निरामयला फोन करा. कोणत्याही वेळेला तुम्हांला उपचार देण्यासाठी आमची टीम कार्यरत असते. जेव्हां त्रास होतो त्याक्षणी आम्ही तुम्हांला फोनवरूनही ट्रीटमेंट देऊ शकतो. आणि तेच सर्वात महत्वाचे ! कारण त्यावेळेला त्रास कमी होणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच निरामयचे स्वयंपूर्ण उपचार हे सर्वात प्रभावी ठरतात.
बालदमा व दम्यासंदर्भात मार्गदर्शन करणारा हा व्हिडीओ जरूर पाहा आणि इतरांनाही शेअर करा.