मूळव्याध हा एक असा आजार आहे, ज्याचा विचार केला तरी नुसत्या विचाराने अंगावर काटा येतो. कारण प्रत्यक्ष मूळव्याध झाल्यावर होणारा त्रास हा सांगता येत नाही आणि सहनही करता येत नाही. कोंब किंवा रक्तपात ह्या दोन प्रकारात आढळणारी मूळव्याध हा पित्ताचाच एक प्रकोप आहे. शरीरातली उष्णता वाढली, पचन बिघडलं अशा वेगवेगळ्या कारणांनी पित्त खवळतं. ते एक तर शरीराच्या वरच्या भागात जाऊन अल्सर सारखे आजार निर्माण करतं आणि हेच पित्त खाली सरकलं की आधी बध्दकोष्ठता आणि नंतर मूळव्याध ! कारण कोणतंही असो, मूळव्याध झालेला माणूस पुढे शौचाच्या त्रासाने खायला देखील घाबरतो. काहीजण द्रवपदार्थ घेऊ लागतात. परिणामी अशक्तपणा आणि हिमोग्लोबिनचं प्रमाणही चांगलंच कमी होऊ लागतं.
यावर मॉडर्न सायन्सकडे एकच उत्तर – ऑपरेशन ! पण ऑपरेशन केल्यावरही अनेकांना मूळव्याधीचा त्रास पुन्हा पुन्हा उद्भवतो. याचं मुख्य कारण म्हणजे मॉडर्न सायन्स लक्षणांवर उपचार करतं. आणि प्राचीन आरोग्यशास्त्रावर आधारित स्वयंपूर्ण उपचार पध्दती ही प्रत्येक रोगाचं मूळ शोधते. यासाठीच निरामयमध्ये रूग्ण आल्यावर आम्ही रूग्णाचे संपूर्ण परिक्षण करतो. आमच्याकडे असलेल्या फॉर्मवर जगातले बहुतेक सर्व आजार आणि त्रास आहेत. त्यावर तुम्ही फक्त ‘टिक’ करायचं असतं. एवढंच नव्हे तर तुमच्या खाण्यापिण्याच्या, झोपण्याउठण्याच्या सवयी देखील आम्ही विचारून घेतो. यातूनच आजाराचे मूळ समजण्यास सोपे होऊ लागते.
आता हेच बघा, मूळव्याधीचे मूळ कारण उष्णता. आता तुम्ही जर रात्री झोपतच नसाल तर तुमच्या शरीरात उष्णता निर्माण होणारच आहे. त्याचप्रमाणे तुम्ही काय खाता, काय पिता हे देखील यासाठीच पाहावं लागतं आणि आम्ही ते समूळ पाहतो.
हल्लीच्या मॉडर्न युगातील तज्ञांनी आणि गुगल नावाच्या काल्पनिक डॉक्टरांनी रूग्णांना नको तेवढी माहिती देऊन एक वेगळाच घोळ घातलेला आहे. म्हणजे, रूग्णाला एखादा त्रास होत असेल तर रूग्ण ह्या माहितीच्या आधारे स्वतःच (डॉक्टर होऊन) ठरवतो की, अमुक एक खाण्यानं मला त्रास होतो, तमुक खाण्यानं त्रास होत नाही. आता तुम्ही म्हणाल यात घोळ काय? तर घोळ हाच की, तुम्ही स्वतः जे ठरवता आणि शरीराला आज्ञा देता, त्याप्रमाणे शरीर वागू लागतं. उलट काहीही खाण्यानं तुम्हांला त्रास होऊ नये, याचं नाव आरोग्य आहे.
मुळव्याधीमध्ये ऑपरेशन करून कोंब काढतात, हे तर अत्यंत चुकीचे आहे, असं आपलं प्राचीन आरोग्यशास्त्र सांगतं. कारण हा कोंब म्हणजे आपल्याच शरीरातला स्नायू आहे, जो त्रासामुळे सैल झालेला आहे आणि गुद्द्वारातून बाहेर आलेला आहे. यावर उपचार असे व्हायला पाहिजे की, त्या भागातले स्नायू पुन्हा कार्यक्षम होऊन तो कोंब म्हणजेच स्नायू पुन्हा त्याच्या मूळ जागेवर गेला पाहिजे. यासाठी केवळ आणि केवळ स्वयंपूर्ण उपचार पध्दतीच प्रभावी आहे, हे आम्ही इथं आवर्जून सांगतो. कारण मूळव्याधीला कारणीभूत ठरणारे अग्नीतत्व-जलतत्व या बरोबर आम्ही पृथ्वी, वायू व आकाशतत्वावरही आम्ही संपूर्ण काम करतो. या तत्वांना संतुलित ठेवून स्नायूंची कार्यक्षमता वाढवतो.
बाळंतपणानंतरही घेतली जाणारी औषधे व डिंक-मेथी लाडू सारख्या पौष्टिक आहारामुळे नवमातांच्या शरीरातील उष्णता वाढून त्यांना मूळव्याधीचा त्रास जाणवतो. पण बाळंतपणानंतरचा पौष्टिक आहार अत्यंत महत्वाचा आहे. तो टाळण्यापेक्षा आहारात जर तुपाचा वापर वाढविला तर कोटा मुलायम रहातो, हे आपण लक्षात घ्यायला हवं.
मेधा पेशवे ह्या मध्यमवयीन गृहिणीला दोन-अडीच वर्षांपासून मुळव्याधीचा त्रास होता. अॅलोपॅथी व होमिओपॅथीची अनेक औषधे घेऊन फरक नव्हता. तेव्हां बहिणीच्या सासूचा अनुभव पाहून त्या निरामयमध्ये आल्या. ट्रीटमेंट घेऊ लागल्यावर काही काळातच त्यांचा त्रास कमी होत गेला. सर्व वयोगटातील स्त्री-पुरूषांच्या मूळव्याधीवर आम्ही उपचार करतो. तेही विनास्पर्श, विनाऔषधं !
आमची ह्या उपचारपध्दतीवर अनेकांचा विश्वास नसतो. त्यातलेच एक अकोल्याचे निवृत्त शासकीय अधिकारी शारंगधर हातेकर. त्यांना दहा वर्षांपासून मूळव्याधीचा त्रास होता. अनेक ठिकाणी उपचारांवर खर्च करून झाला आता निरामयकडेही जाऊन पाहू, या अविश्वासानेच ते निरामयमध्ये आले. पहिल्याच भेटीत डॉ. चांदोरकरांनी त्यांना सांगितले की, तुमचा आजार तर फार किरकोळ आहे. हे ऐकूनच हातेकर साहेबांना स्फुरण चढले. त्यानंतर निरामयची स्वयंपूर्ण उपचार पध्दती म्हणजे काय तर पाच मिनिटे ध्यान करायचं. नंतर फोन करूनही अशाच ट्रीटमेंट घ्यायचा. पाश्चिमात्य (चुकीच्या)विचारांमध्ये वाढलेल्या आपल्याकडच्या सुशिक्षित पिढीला असं काही असतं ह्याबद्दल माहिती नसतेच. पण ते त्यावर थट्टा करूनही मोकळे होतात. हातेकर साहेबांच्या घरी देखील असंच झालं. पोरं-नातवंडं त्यांच्यावर हसायची. पण हातेकर साहेबांना पहिल्या आठ-दहा दिवसातच आतून बदल घडल्याचे जाणवत होते. त्यामुळे घरच्यांच्या चेष्टामस्करीकडे दुर्लक्ष करून त्यांनी ट्रीटमेंट घेणं सुरूच ठेवलं. 2-4 महिन्यात त्यांचा मूळव्याधीचा त्रास बराच कमी झाला. मूळव्याधीमुळे त्यांनी तिखट खाणं सोडलं होतं. कालांतराने ते तिखटही खाऊ लागले. एवढंच नव्हे तर स्वयंपूर्ण उपचारांनी त्यांचे वजन 84 वरून 66 किलोवर आणून ठेवलं तेव्हां मात्र फक्त हातेकर साहेबच नव्हे तर त्यांच्या घरातल्यांनाही ह्या उपचार पध्दतीवर विश्वास ठेवायलाच लागला.
स्वयंपूर्ण उपचार पध्दती ही प्राचीन आरोग्यशास्त्रावर आधारित आहे. यामध्ये ऊर्जेद्वारे स्थूल व ऊर्जा शरीराला बरे केले जाते. यावर तुमचा विश्वास असेल किंवा नसेल. अनुभव हीच खात्री असे आम्ही वारंवार सांगतो. आणि डॉक्टरांचे मुख्य कामही हेच आहे की, ‘‘विश्वास ठेवा की तुम्ही पूर्ण बरे होणार आहात’’ निरामयमध्ये आल्यावर हा विश्वास आम्ही प्रत्येकाला देतो.
मूळव्याधीवर संपूर्ण मार्गदर्शन करणारा हा व्हिडीओ जरूर पाहा आणि इतरांनाही शेअर करा.