पित्ताशयातील खडे म्हणजे ते पित्ताचेच असणार हे तर सर्वांनाच ठाऊक आहे. पण हे खडे का होतात? यासाठी आपली (चुकीची) जीवनशैली जबाबदार आहे. यात वेळी-अवेळी जेवणं, शरीराला जे त्रासदायक ते खाणं, पोषक तत्वांचा अभाव अशी अनेक कारणं सांगता येतील. सध्या सर्वांचेच जीवन इतकं गतिमान झालंय की आपण इच्छा असूनही स्वतःची जीवनशैली बदलू शकत नाही. यातच रासायनिक खतांमुळे अन्नामध्ये आधीच खूप उष्णता असते. त्यामुळे सध्या दिसणार्या त्रासांमध्ये 90% पित्ताच्या समस्या दिसत आहेत.
आता पित्ताशयामध्ये खडे कसे तयार होतात? तर अन्न पचविण्यासाठी आपलं शरीर पित्त निर्माण करत असतं. आपलं लिव्हर म्हणजे रसायन तयार करणारा कारखाना आहे. अन्नातील उष्णतेमुळे आणि आपल्या नित्कृष्ट आहारामुळे आपल्या शरीरात जरा जास्तीचं पित्त निर्माण होत असतं. आता हे वाढीव पित्त शरीर साठवतं कुठं तर ते स्टोअरेज म्हणजे आपलं पित्ताशय. ह्या साठलेल्या पित्ताचा वापर खरं तर अन्न पचविण्यासाठी व्हायला हवा. पण इथंच थोडी गडबड होते. कारण आपण रोज वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खातो. त्यासाठी परत नवीन पित्त शरीराला तयार करावं लागतं. त्यामुळे पित्ताशयात साठलेलं पित्त तसंच पडून रहातं आणि शरीरातील उष्णतेमुळे कालांतराने त्याचे खडे होतात.
आता ह्यावर मॉडर्न सायन्सकडे उपाय काय तर ऑपरेशन करून ते पित्ताशयच काढून टाकणे. पण हा उपचार म्हणजे आजारापेक्षाही जालीम ठरतो. कारण पित्ताशय काढल्यावर वाढीव पित्त शरीराने साठवायचे कुठे? त्यामुळे तुम्ही बघितलं असेल की, असं ऑपरेशन झालेल्या व्यक्तिला 2-3 वर्षात पुन्हा त्रास सुरू होतात.
स्वयंपूर्ण उपचारांच्या नजरेतून हा आजार पाहायचं झालं तर अशा वेळेला शरीरातील जलाचं प्रमाण कमी होतं. द्रवरूप पित्ताचं घनामध्ये रूपांतर झालेलं असतं. याचाच अर्थ त्या ठिकाणी पृथ्वीतत्व प्रचंड प्रमाणात वाढलेलं असतं. त्यामुळे इतर ठिकाणचं पृथ्वी तत्व कमी होतं आणि स्नायू शिथिल झालेले दिसतात. एकूणात तर शरीरातील पाच तत्वांचे संतुलन बिघडलेले असते. या सर्वांचे आम्ही निरामयमध्ये ऊर्जा परिक्षण करत असतो. तसेच रूग्णाचे वैद्यकीय रिपोर्ट्सही पाहतो. त्यावरून जिथे जिथे अनावश्यक ऊर्जा साठलेली असते ती बाहेर काढतो आणि आवश्यक तिथे ऊर्जा पुरवितो. ट्रीटमेंट घ्यायला सुरूवात केल्यानंतर पुढे जेव्हां वैद्यकीय रिपोर्ट्स काढले जातात, त्यामध्ये पित्ताच्या खड्यांचे प्रमाण हळूहळू कमी झाल्याचे आपल्यालाही कळते.
उषा कानेटकर ह्या आजींना 30 वर्षांपासून पित्ताशयाच्या खड्यांचा त्रास होता. त्याचबरोबर त्यांची हार्निया आणि अपेंडिक्सची ऑपरेशनंही झालेली होती. पण पित्ताच्या खड्यांचा त्रास मात्र कोणत्याही औषधांनी जाईना. आजींना भूक लागत नव्हती. पोटात दुखायचं. रिपोर्ट्स काढावे तर ते नॉर्मल. असं बर्याच रूग्णांच्या बाबतीत होतं. त्यामुळे मॉडर्न सायन्स इथे काही करत नाही किंवा औषधांचे प्रयोग करते. पण आजाराचा आणि औषधांचा त्रास मात्र त्या बिचार्या रूग्णाला भोगावाच लागतो. कानेटकर आजी जेवूच शकत नव्हत्या. साहजिकच अंगात उभं रहायची ताकदही नव्हती. शेवटी बेड रिडन झाल्या. त्यांच्या सेवेसाठी एक मदतनीस बाई पगार देऊन ठेवण्यात आली. पण त्याचबरोबर आजींचे आणखी एक दुखणे होते. जसा आजींचा त्रास डॉक्टरांना कळत नव्हता, तसंच घरच्यांनाही त्यांची ती ‘नाटकं’ वाटू लागली. घरच्यांचे असे मत कोणत्याही व्यक्तिला अतिशय वेदनादायी ठरते. त्या जेव्हां निरामयमध्ये आल्या, तेव्हां आम्ही त्यांचे तर कौन्सेलिंग केलेच, त्याचबरोबर त्यांचा परिवाराचे कौन्सेलिंग केले. आजींच्या त्रासाबद्दल त्यांना नीट समजावून सांगितले. अशा प्रकारे रूग्णासोबतच कुटुंबाचे देखील मानसिक समुपदेशन करणारे आमचे निरामय वेलनेस क्लिनिक आहे, हे सांगताना आम्हांला अभिमान वाटतो. तर कानेटकर आजींची ट्रीटमेंट सुरू झाली. त्यांना पायाच्या नखापासून डोक्याच्या केसांपर्यंत आम्ही ऊर्जा देत होतो. त्यानंतर त्यांच्या पित्ताशयातील खडे हळूहळू कमी होत गेले आणि तशा त्या उभ्या राहू लागल्या. जेवू लागल्या. आज त्यांच्या मदतनीस आल्या नाही तर त्या स्वतःची कामं स्वतः करतात, इतपत त्यांची प्रकृती सुधारलेली आहे.
पचनक्रिया बिघडल्यावर होणारा आणखी एक त्रास म्हणजे वात. शरीराला क्रॅम्प येणे हा देखील वाताचाच एक प्रकार आहे, हे कित्येकांना ठाऊकही नसते. जेव्हां पचन नीट होत नाही तेव्हां शरीरातील वात बिघडतो. त्यात बाहेरचा वारा लागला की त्रास सुरू. निरामयमध्ये आलेल्या पांडुरंग नाडकर्णी यांचा अनुभव म्हणजे अत्युच्च वाताचा त्रास काय असतो, हे सांगणारा. नाडकर्णींना 10 वर्षांपासून क्रॅम्प येत असत. घरात किंवा गाडीत एसी, अगदी साधा पंखा जरी लावला तरी त्यांना इतका त्रास होत असे की, एखाद्याला वाटावे, ह्यांना हार्ट अॅटॅक आलाय. त्यावेळेला त्यांचे शरीर इतके तडफडत असे, यावरून तुम्हांला त्यांच्या त्रासाची कल्पना येऊ शकते. त्यानंतर ते निरामयमध्ये आले आणि ट्रीटमेंट घेऊ लागले. ह्या ट्रीटमेंटचा फरक त्यांना 6 महिन्यात चांगलाच जाणवला. एसी किंवा पंखा लावूनही त्यांचे क्रॅम्प येणे कमी झाले. त्यांनी पुढे उपचार सुरूच ठेवले. दहा वर्षांचा त्रास दहा महिन्यात कायमचा बरा झाला. नाडकर्णींची ही केस वैद्यकीय भाषेत ‘एक्स्ट्रीम केस’ म्हणू शकतो. पण त्यावरही इतक्या कमी कालावधीत पूर्णपर्ण बरे करण्याची क्षमता केवळ ह्या स्वयंपूर्ण उपचारांमध्ये आहे, हे आम्ही सिध्द करून दाखवलेले आहे.
प्राचीन आरोग्यशास्त्रावर आधारित हे उपचार करताना आम्ही प्राचीनशास्त्राचाही आधार घेतो. शरीरातील प्राण ह्यांची काळजी घ्यावी, ह्यासाठी आपल्या प्राचीनशास्त्राने नैवेद्य दाखविताना ‘ॐ प्राणाय स्वाहा…अपानाय स्वाहा’ हा मंत्र आपल्याला दिलेला आहे. ह्या मंत्रात सांगितलेले प्राण, अपान, व्यान, उदान व समान हे आपल्या शरीरातील पंचप्राण आहेत. ह्या प्राणांना नैवेद्य दाखवून आपल्या शरीरातील प्राणही संतुलित होऊ शकतात. तसेच जेवणापूर्वी जी ‘पंचाहुती’ म्हणजे पाच घास ताटाबाहेर काढून ठेवायला सांगितलेले आहेत. हे करतानाही तोच मंत्र म्हणायचा असतो. ह्या सर्वांचा आपल्या शरीराला नक्की फायदा होतो. शरीरातील प्राण संतुलित असेल तर वात बिघडत नाही. भावपूर्ण मंत्रोच्चारातून अन्नामध्ये ऊर्जा उतरते आणि शरीराला खर्या अर्थाने जीवनरस मिळून शरीराचे उत्तम पोषण होते. ह्याचा प्रत्यक्ष प्रयोग आमच्या ऑफिसमधल्या एका मुलाने करून पाहिला आणि दुसर्याच दिवशी त्याचा वाताचा त्रास गेला. आपले पूर्वज हे थोर ज्ञानी होते. या ज्ञानातूनच ते निरोगी जीवनाचा आनंद दीर्घकाळापर्यंत घेऊ शकले. त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर आपणही चाललो तर त्याचा आजच्या काळातही निश्चित फायदा होईल, याची आम्हांला पूर्ण खात्री आहे.
पित्ताशयातील खड्यांच्या त्रासासंदर्भात मार्गदर्शन करणारा हा व्हिडीओ जरूर पाहा आणि इतरांनाही शेअर करा.